चंद्रपूर : यचमुविचा १७ वा दिक्षांत समारंभ १ मार्च रोजी

चंद्रपूर, दि. २० फेब्रुवारी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या  १ मार्च २०११ रोजी होणार्‍या १७ व्या दिक्षांत समारोहात नागपूर विभागातील चंद्रपूरच्या रामसिग चव्हाण याला दोन सुवर्णपदके जाहीर झाली आहेत अशी माहिती मुक्त विद्यापीठाचे नागपूर केंद्र समन्वयक प्रा. सुभाष बेलसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चंद्रपूर पॉलिटेक्निकच्या रामसिग चव्हाणला बी.टेक (इले.) मध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल हा सन्मान प्राप्त झाला आहे. याशिवाय कला शाखेत भंडार्‍याची मेघा डोंगरे प्रथम, नागपूरचा फिरोज खान द्वितीय  तर नागपूरचाच किशोर डोंगरे तृतीय आला आहे.

१७ व्या दिक्षांत समारोहात एकूण ५६४१८ विद्यार्थी पदव्या स्वीकारणार आहेत. विशेष म्हणजे यंदा पदवी घेणार्‍यात विविध तुरुंगात शिक्षा भोगणार्‍या ५७ कैद्यांचाही समावेश आहे. यावेळी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एन.राजशेखरन मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कुलपती आणि राज्यपाल के.शंकरनारायणन, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे उपस्थित राहणार आहेत असे बेलसरे यांनी सांगितले.

Leave a Comment