विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील संहार

विसावे शतक हे महायुद्धांचे होते तर एकविसावे शतक हे नरसंहाराचे असेल की काय असे वाटू लागले आहे. विसाव्या शतकाने दोन महायुद्धे पाहिली आणि छोट्या मोठ्या शंभर लढाया पाहिल्या. आता लढाया आणि महायुद्धे या कल्पनापेक्षा नरसंहार ही संकल्पनाचे सोयीची वाटू लागली आहे की काय, असे वाटू लागले आहे.एकविसावे शतक नरसंहाराचे वाटण्यासाठी नवी कांगो मध्ये घडलेली घटना आहे.तेथे गेल्या काही वर्षात तीस लाख लोक मारले गेले आहेत. ते ज्या पद्धतीने मारले गेले आहेत, ते बघता हा प्रकार जगभर होणार आहे की काय अशी शंका यावी.कांगोच्या शेजारी असलेल्या असलेल्या रवांडा या देशात दहा वर्षापूर्वी असेच दहा लाख लोकांचा नरसंहार अवघ्या एका महिन्यात झाला. तो कोणी केला,हे समजायला दहा वर्षे लागली आणि आरोपी कळाला तरी आरोपपत्र तयार करायला कोणी तयार नाही. त्याचे आरोपी केवळ खुलेआम फिरत आहेत येवढेच नव्हे तर सत्ता आणि मोठमोठ्या सत्ता भोगत आहेत. युनो मानवता हक्क समित्या यावर मूग गिळून बसलेल्या आहेत. जगभर कोठे ना कोठे जागतिक परिषदा चालू असतातच, पण रवांडातील या नरसंहारावर कोणी अजून एखादाही अश्रू गाळल्याचे ऐकवात नाही.दहा वर्षापूर्वी या घटना घडून गेल्या तेंव्हा नाही म्हणायला वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या पण त्यालाही मर्यादा होती. नंतर चार वर्षनी त्या नरसंहारात किती माणसे मेली त्याचे आकडे आणि भीषणता यांचे वर्णन आले. तो नरसंहार येवढा भयानक होता वारुळाला भगदाड पाडून दिसणार्‍या सर्व मुंग्या दिसेल त्या हत्याराने माराव्या. अगदी एकही मुंगी जिवंत राहणार नाही, याची काळजी घ्यावी.असा रवांडातील नरसंहाराचा प्रकार होता. हा सारा नरसंहार तेथील बिशप मुसबियामाना याने केला असे नंतर चार वर्षांनी उजेडात आले. संडे टाईम्सने याला वाचा फोडली म्हणून निदान आरोपीचे नाव तरी जगाला कळाले.

रवांडानंतर दहा वर्षांनी आता त्याच्या शेजारी असलेल्या कांगोचा क्रमांक आहे.तेथे आरोपी कोण आहे,हे अजून कोणाला माहीत नाही. रवांडाच्या नरसंहाराला संडे टाईम्सने वाचा फोडली तसे कांगोतील नरसंहाराला न्यूयॉर्क टाईम्सने वाचा फोडली.संडे टाईम्सने रवांडाला वाचा फोडायला घेतली तेंव्हा त्या वृत्तपत्राला हेही माहीत नव्हते की त्याचा आरोपी हा त्यंाचा शेजारी आहे.सार्‍या संशयाच्या सुया आर्चबिशप ऑफ कँटरबरी यांच्या दिशेने स्थिरावत आहेत.न्यूयॉर्क टाईम्सने अजून कोणाला आरोपी केलेले नाही.

कांगो तसा शांत देश आहे.संगणक चीप बनवायला लागणारा कोल्टान हा खनिज धातू आणि सोने यांच्या खाणी हे कांगो खोर्‍याचे वैशिष्ठ्य.पण साडेपाच कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील तेहेतीस लाख लोकसंख्या गेल्या पाच वर्षात अनैसर्गिक कारणाने नष्ट झाली आहे.यातील बरीचशी लोकसंख्या अतिसार किवा तत्सम रोगांच्या साथींनी गेली.पण अलिकडे असे रोगाने जाणे हेही नरसंहाराच्या यादीत मोडते.कारण अशा साथींच्या रोगाचे जंतू मानवीय सेवा या भावनेतून पाठवलेल्या ब्लँकेटस् आणि धान्य, औषधे यातून पाठवले जातात.

कांगोमध्ये हेमा आणि लेंडू असे दोन महत्वाचे मसाज आहेत.सध्या कांगोमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची शांतीसेना आहे.त्यांच्या असे लक्षात आले की, तेथे म्हातारी माणसे आणि लहान मुले यांचे ठार मारलेले मृतदेह कोणीतरी पाण्याचे तलाव आणि नद्या आणि ओढे यात फेकून देत आहे.एक समाज तेथे दुसर्‍या समाजाच्या विरुद्ध उभा रहात आहे.

Leave a Comment