उन्हाळा व उन्हाळ्यातील समस्या

या वेळच्या उन्हाळ्याने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.एक म्हणजे यावर्षी  येवढे तपमान कसे वाढले याचा  शोध  घेतला गेला पाहिजे.एक काळ असा होता की, पाउस येणे आणि न येणे ही ईश्वरी कृपा किवा अवकृपा वाटायची आणि हा विषय उपासनेच्या मार्गाने सोडवायचा प्रयत्न व्हायचा.पण आता मान्सूनचा नेमका अंदाज अचूकपणे व्यक्त केला जातो, भारतीयांनी  सोळा पॅरॅमीटर्स आता जगभर गाजू लागले आहेत.त्यामुळे निसर्गाचा अंदाज आता नीट व्यक्त केला जावू शकतो.त्यामुळे मान्सूनचा अंदाज जसा अचूकपणे व्यक्त केला जातो, त्यामुळे उन्हाळ्याचे तपमान सरासरीपेक्षा अधिक झाल्याचे कारणही समजले पाहिजे आणि शक्य झाल्यास पुढील वषपासून त्याचा पूर्वअंदाज व्यक्त करता आला पाहिजे.साधारणपणे असे मानले  जाते की,मान्सून सीझन हाच महत्वाचा सीझन असल्याने अन्य ऋतुकाळाचा गांभिर्याने  विचार करण्याची गरज नाही.पण यावेळी  उन्हाळा सरसकट तीन ते चार अंश सेल्सिअसने जादा होता.त्याचा प्रत्यक्ष परिणाम जरी आंध्रात एक हजारापेक्षा जादा लोक गेले आणि भारतात की संख्या  दोन हजाराच्या पुडे गेली. पण  अनेक मजली घरे बांधून पंखे,एसीमध्ये राहणार्‍या माणसांच्या अंगाची जर लाही लाही होते तर जनावरे, कीटकजीवन, वनस्पती जीवन, कृमीजीवन आणि भूपृष्ठावरील  रासायनिक जीवन यांची काय हानी झाली ,याचा अंदाज लागलेला नाही.माणूस साधारणपणे सार्‍या समस्या या माणसाच्या दृष्टीकोनातून बघत असल्याने पुढील वर्षी पिकावर आणि स्वास्थ्यावर काय परिणाम होईल,या दृष्टीकोनातून विचार करेल.त्यामुळे मोसमी पावसाप्रमाणे कडक उन्हाळ्याचाही अंदाज व्यक्त करता आला पाहिजे.

अमेरिकेतील ९।११ च्या हल्ल्यानंतर प्रत्येक घटनेला अनैसर्गिक कारण आहे का, यांचा अंदाज घेतला जावू लागला आहे.दोन महिन्यापूर्वी अमेरिकेतील टेक्सास राज्यात पर्यावरण या क्षेत्रात काम करणारे डॉ अनिरूद्ध भटकर यांचा भारतात मुक्काम होता.अनिरुद्ध भटकर हे सुप्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर यांचे बंधू.त्यांचे म्हणणे असे होते की,यापुढे निसर्गाचे चक्र आपल्या फायद्यासाठी आणि शत्रूच्या तोट्यासाठी करण्याचा शास्त्रज्ञांचा कल राहील.त्यात प्रामुख्याने पावसाच्या प्रयोगाचा समावेश होता. या विषयाचा उल्लेख करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की,साप म्हणून भुई धोपटणे किवा कोणत्याही बाबीत शत्रूच्या आक्रमणाचा संशय व्यक्त करणे या यादीत मोडणारी ही शंका नाही.कारण ढगावर क्षारांचा  मारा करून पावसाच्या वेळा आणि तो पडण्याच्या  जागा बदलता येवू शकता येतात. अनेक प्रयोगही यशस्वी स्वरुपात पूर्ण झाले आहेत.आगामी काळात पाऊस हे अस्त्र म्हणून वापरता येईल का, असा संशयही व्यक्त झाला आहे.अर्थात हा संशय विद्यमान भारतीय स्थितीला लावणे योग्य ठरेल असे वागत नाही कारण सार्‍या उपखंडासाठी असे क्षारांचे मारे करायचे झाले तर त्यासाठी फार मोठी यंत्रणा लागेल.पाउस वेळेवर पडण्याचे जे सोळा निकष आहेत,त्यापैकी एखादा निकष हा त्याचा फिजिकली ताबा घेण्यासारखा आहे यावर या निमित्ताने विचार झाला पाहिजे.या निकषावर लक्ष ठेवणे ही कदाचित आगामी काळातील गरजच ठरेल.प्रामुख्याने अल नीनो आणि ला निनो हे निकष हे प्रशांत महासागरातील एका कोपर्‍यात ठरतात,अशा ठिकाणी सिल्टींग केले जावू शकते का,अशी रायडर्स सोडविण्यास घेतली पाहिजेत.अलीकडचा काळ संगणकीय प्रोग्रॅमिंगचा आहे.पाच वर्षापूर्वी भारताने राजस्थानच्या वाळवंटात एक अणुबॉम्ब स्पोट केला,त्याच्या रिडिंगच्या आधारे अनेक प्रयोग संगणकाच्या सहाय्याने करण्यात आले, या प्रयोगांची व्याप्ती येवढी मोठी होती की, अनेक स्वरुपाचे प्रयोग केल्याचा अनुभव एका स्फोटामुळे मिळाला आहे,असे मानले जाते.असा प्रयोग जर अणुबाँबस्फोटासाठी केला जातो तर उन्हाळा आणि मोसमी पावसासाठी त्याचे मॉडेल करणे आणि त्याच्या पॅरॅमीटरच्या आधारे मागे जात जात काही मागोवा घेणे हे आज शक्य झाले पाहिजे.

यावषींच्या उन्हाळ्यावर अजूनही एका पैलूतून विचार होण्याची गरज आहे.ती म्हणजे भारतातील हजारो संगणक तंत्रज्ञ अमेरिकेतील सिलिकॉन कंपन्यातून यश मिळवत आहेत.भारतातही असे अनेक जण या क्षेत्रात यश मिळवत आहेत.जगातही त्यांची ख्याती मोठी आहे.या मंडळींनी भारतातील उन्हाचा उपयोग करून घेण्याचा विचार का नाही केला. गेल्या दोन महिन्यात उन्हातून आलेली अब्जावधी मेगावॅट उष्णता ही काही प्रमाणात तरी पकडणे आवश्यक होते.

उन्हातून वीज मिळवणे ही तशी खर्चिक बाब आहे.तरीही सार्‍या बाबी हाताशी असल्यावर हे संशोधन होणार की, गरज ही शोधाची जननी आहे,अशा पद्धतीने हे काम करणार हा खरा प्रश्न आहे.

Leave a Comment