जर्मन बेकरीस्फोटानंतर आजही पुण्याच्या संरक्षण व्यवस्थेत पंधरा हजाराची जादा सशस्त्र दले

पुण्यात एक वर्षापूर्वी म्हणजे १३ फेब्रुवारीरोजी जर्मन बेकरीत झालेल्या जेहादी स्फोटानंतर पुण्यातील शिक्षणसंस्था, विद्यापीठे, मॉल्स, चित्रपट गृहे, ठरेल्वे, एसटी, महापालिका, विमानतळ, हॉस्पिटल्स, यानाच काय पण पोलीस आयुक्त कार्यालय, संरक्षण विभागाची संशेाधन केंद्रे दारुगोळा निर्मिती केंद्रे या सर्वांना जे छावणीचे स्वरुप आले आहे ते अजून बदलले नाही.त्यात १७ जण ठार झाले व ६५ जखमी झाले. तरी आजही शंभरहून अधिक घरी या हल्ल्याच्या जखमा ओल्या आहेत.  गेल्या पन्नास साठ वर्षांच्या अनुभवाने आपल्या देशाचा जो शत्रू निश्चत झाला आहे त्या देशाची सीमा एक हजार किमीवर असताना सुद्धा येथे जेंव्हा पोलीस आयुक्त कार्यालय, लष्करी मुख्यालये आणि वायुदलाचे विमान तळ येथे जर खोदलेले बंकर्स, निरीक्षण टॉवर्स आणि गराडा दिलेला पोलीसपहारा द्यावा लागत असेल तर आपल्या संरक्षण धोरणात गंभीर उणीव आहे असेच म्हणावे लागेल. शत्रू गटाने येथे लीलया स्फोट घडवून आणले पण गेल्या एका वर्षात आपण शत्रूच्या पोटात असे कृत्य न करण्याबद्दल जर धडकी निर्माण करू शकलो नसलो तर शंभर कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या देशावर वारंवार असेच हल्ले होणार असे मानावे लागेल.

गेले वर्षभर तरी पुण्यात येणारांचा अनुभव असा की, अनेक ठिकाणी वाळूची भरलेली पोती उभी करून बंकर्स उभे केले आहेत. एनडीए म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही तर गेली पन्नास वर्षे सेनाधिकार्यां ना प्रशिक्षण देणारी संस्था. तेथे प्रवेशद्वारापासूनच तेथे असे बंकर्स दिसू लागतात. फार मोठ्या प्रमाणावर तेथे बंदोबस्त असतो. एसडीएचे फ्लाईट लेफ्टनंट श्रीप्रकाश यांनी सांगितले की, आमची ही संरक्षण विषयक संस्था असल्याने येथे नेमेहीपेक्षा अधिक काळजी घेतली जाते. याबाबतची माहीती मिळाली की आम्ही त्यावर त्वरीत कारवाई करत असतो.एनडीएमध्ये सध्या सहा मोठे निरीक्षण मनोरे उभे केले आहेत. त्याच प्रमाणे अजून दहा मनोरे उभे करण्याचे काम सुरु आहे. सर्वत्र छोटे कॅमेरे लावले आहेत. येथे येणार्यान प्रत्येकाची कसून तपासणी केली जाते व मगच त्याला आत प्रवेश दिला जातो. एनडीएप्रमाणे पुण्यात जवळ जवळ वीसपेक्षा अधिक संरक्षण विभागाची महाविद्यालये आहेत. पुणे मुंबईरस्त्यावर दापोडीला अुजवीकडे सीएमई म्हणजे कॉलेज ऑफ मिलीटरी इंजिनिअरिंग आहे. त्यांनी त्यांच्या महाविद्यालयाला प्रचंड मोठी भित घालून घेतली आहे. सीमेवर जसा पहारा ठेवला जातो त्या प्रमाणे येथे रात्रंदिवस पहारा ठेवला आहे. पुण्यातील सेनेचे सर्वात मोठे केंद्र म्हणजे भारतीय सेनेचे दक्षिण विभागाचे मुख्यालय. याला सदर्न कमांड असे नाव आहे. गुजरात पासून तामीळनाडूपर्यंतचा बराचसा भाग त्यांच्या नियंत्रणाखाली येतो. पुण्यात या विभागाचे एकूण पन्नास उपविभाग आहेत. तेथे त्यांनी रात्रंदिवस जागता पहारा ठेवला तर आहेच पण स्थानिक पोलीस आणि सेना दलाचे अन्य विभाग यांच्याशी त्यांनी अधिक संपकंर् ठेवला आहे. पुण्यात दारुगोळा निर्मितीचे मोठे कारखाने आहेत आणि अतिविध्वंसकारी दारुगोळ्याचाही कारखाना आहे. ब्रिटीशांच्या काळात ब्रिटीशांच्या म्हणजे कॉमनवेल्थ कंट्रीजच्या ७२ देशांना येथून अतिस्फोटक दारूगोळा येथून पुरवला जात असे. गेल्या वर्षीच्या हल्ल्यापासून पासून या कारखान्याला सर्व बाजूला बरुजांची तटबंदी आहे. काही ठिकाणी खंदक तर आहेतच पण अतिसंवेदनाशील इलेक्ट्रोनिक सुरक्षा यंत्रणा बसविली आहे. पुण्याचे विमानतळ हे प्रामुख्याने वायुसेनेचे केंद्र आहे. जग्वार, मिग, सुखोई यांचे मुख्यालय हे पुणे मानले जाते. तेथे मोठ्या प्रमाणावर प्रवासी विमानांना उतरण्याची परवानगी दिली जाते. त्याची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सुरक्षा आहे. तेथे प्रत्येक प्रवाशाला किमान पाच तपासण्यातून जावे लागते.

पुणे स्टेशनला एकूण पाच प्रवेश द्वारे आहेत. त्या सर्व ठिकाणी बंकर्स आहेत. मध्यरेल्वेचे एक मुख्यालय पुण्यात आहे. त्याची दोन कार्यायले मुख्यस्टेशनपासून काही अंतरावर आहेत. तेथे तर ही स्थिती आहेच पण प्रत्येक ठिकाणी येणारी व्यक्ती व प्रवासी यांची त्यांच्या प्रत्येक सामानासह क्षकिरण तपासणी येथे होणे अपेक्षित आहे. जादा गर्दी झाली की याकडे पूर्ण दुर्लक्ष होताना दिसते. पुण्याला सध्या एसटीचे पाच डेपो आहेत. तीन डेपो पुण्यात आहेत व दोन उपनगरात आहेत. तेथेही पोलीसांची तपासकेंद्रे वाढली आहेत. बंकर्स आहेत तपासणी पथकेही बरीच दिसत असतात. जर्मन बेकरी स्फोटानंतर पुणे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर बराच ताण आला आहे. प्रत्येक ठिकाणी नागरिकांच्या वेळा कमी करण्यात आल्या आहेत. शहरातील महापालिका  शंभरपेक्षा ठिकाणाची सुरक्षा खाजगी सुरक्षा कंपन्यांना दिली आहे.पुण्यात शिक्षणसंस्था, आयटी कंपन्या आणि अन्य औद्योगिक क्षेत्रे हे फार मोठचे क्षेत्र आहे. तसेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजे राष्ट्रीय केमिकल लॅबोरेटरी अशा पद्धतीच्या दहापेक्षा मोठ्या संस्था आहेत. तसेच स्वतःच एक विद्यापीठाची व्याप्ती आहे,अशा एमआयटी, सिबायोसिस, सिहगड भारती विद्यापीठ, फर्गसन, एसपी असा संस्था आहेत. तसेच सी -डॅक, आयुका, उष्णकटीबंधीय हवामान संशोधन संस्था, सेलसायन्स लॅब, राष्ट्रीय विषाणुसंशोधन संस्था, इंटरनॅशनल कन्व्हेन्शनसेंटर अशी केंद्रे आहेत. प्रत्येक ठिकाणी पोलीस पहारे किवा खाजगी सुरक्षा कंपन्यांचे सशस्त्र पहारे आहेत. पुण्यात दहाहजारापेक्षा अधिक मोठ्या गृहरचनासंस्था आहेत त्या लवासा, मगरपट्टा, डीएसकेविश्व अशा छोट्यामोठ्या आकाराची पन्नासपेक्षा मोठी नगरे आहेत. तेथे तर संरक्षणासाठी खाजगी सेनाच तैनात आहे. पुण्यात फार मोठ्या प्रमाणावर विदेशी विद्यार्थी आणि आयटीचे तरुण यांची संख्या आहे. त्यांची स्वतंत्र वसतीगृहे अशी कमी आहेत. ही संख्या एका निरीक्षणाच्या आधारे पन्नास हजारापेक्षा अधिक आहे. हॉटेले, मॉल्स आणि मोठी चित्रपट गृहे यांना तर हे नियम लागू आहेतच

एकट्या पुणे शहरात आज पंधरा हजारापेक्षा अधिक जवान, पोलीस आणि खाजगी सुरक्षा सेवक जर्मन बेकरीनंतर सुरक्षा कामाला लागले आहेत. पण हा सारा सुरक्षा खर्च आहे. शत्रुने अशा हल्ल्याचा प्रयत्न करू नये म्हणून काही केले नाही तर शत्रूची हल्ल्याची फक्त पद्धती बदलेल, असे म्हणावे लागेल.

अलिकडे बरीच वर्षे असे दहशतवादी हल्ले हे काही नवे प्रकरण राहिलेले नाही. मुंबईत तर दर दोन वर्षांनी असे हल्ले होतात असाच अनुभव आहे. आधीचा हल्ला हा विस्मरणात जाण्याची वेळ आली की, नवा हल्ला होतो. त्या विषयावर प्रसारमाध्यमात चर्चा होते. त्याला जुनेपणा येवू लागला की सर्वसाधारणपणे नवा हल्ला होतो. पण असे छोटे छोटे हल्ले हेच हे दहशतवाद्यांचे धोरण आहे याची आपल्याला कल्पना येत नाही. जुने सारे विसरा अशा भूमिकेतून आपण या भूमिकेकडे बघत असता. पण गेल्या तेराशे वर्षापासून जगावर जेहादी आक्रमण सुरु आहे पण या काळात ज्यांना या जेहादी आक्रमणाचे प्रमाणीकरण करता आले तेच त्याच्यापासून सुरक्षित राहू शकले आहेत. पुण्यातील जर्मन बेकरीवरील हल्ला हे काही युद्ध नव्हे तो सीमेवरील त्यांना अपेक्षित असलेले युद्ध सोपे करण्याच्या सततच्या प्रयत्नाचा भाग होता. असे हल्ले हेही त्यांचे एक युद्धतंत्र आहे. पण चीन, इस्राईल, फान्स, रशिया, जर्मनी, मोठ्या प्रमाणात ब्रिटन आणि अमेरिका यांनी अशा पद्धतीच्या हल्ल्याच्या सामना करण्याची बरीच तयारी ठेवली असल्याने  तेथे असे हल्ले करताना अनेकवेळा विचार केला जातो.आपल्याकडे या विषयाकडे आपण राजकीय कारणांनी या डिफेन्सिव्ह भूमिकेतून बघतो पण रशियात प्रवदा किवा चीनमधील पीपल्स डेली ही इंटरनेटवर दिसणारी वृत्तपत्रे बघितली तर हा विषय तेथे आक्रमक पद्धतीने हाताळताना दिसतो.प्रवदा दैनिक तर ‘जगात अशा पद्धतीने तिसरे महायुद्ध सुरु झाले आहे व जगाला संघटित होअून त्याचा सामना करावा लागेल’ अशी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे.  तेथे अशा हल्ल्याच्या प्रतिकारात अगदी वॉर्डस्तरावर संरक्षण समित्या स्थापन  आहेत आणि दरमहा किवा दर आठवड्यालाही त्यावर चर्चा व कृतीसत्रे होताना दिसत असतात. जगातील कोणत्याही देशाच्या जेहादी गट इस्लाम नसलेल्या भारतावरच छोटे आणि मोठे हल्ले अधिक करतात कारण येथे प्रतिकारासाठी फारसे काही केले जात नाही, अशी त्यांची ठाम समजूत आहे.या विषयावर जाहीर चर्चाच होअू दिली जात नाही, ही आपल्याकडील वस्तुस्थिती आहे. पाकिस्तानमध्ये जर या विषयावर जाहीर चर्चा होअू शकते व एक संघटनाही जर भारतासारख्या महाकाय देशाला युद्धासाठी ललकारते तर मग येथे त्यावर जाहीर चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे. यातील सर्वात नाजूक मुद्दा आहे तो अशा आक्रमणाचा सामना कसा करायचा यावर आपले जाहीर धोरणच नाही. आपल्याला असे वाटते की, अशा चर्चेने येथील अल्पसंख्यांक समाज नाराज होईल पण अल्पसंख्यांक समाजातील मोठ्या गटासही याबाबत चिता वाटतच असते.त्याना विश्वासात घेअून यावर चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे. दहशतवादी हल्ल्याचे प्रमाणीकरण ही यातील सर्वात नाजूक बाब आहे. जगात अनेक ठिकाणी हा प्रकार यशस्वीपणे हाताळला गेला आहे आणि  या आक्रमणाचे प्रमाणीकरण जमले असे वरील उल्लेख केलेले जसे अनेक देश आहेत तसे गेल्या काही दिवसात दूरचित्रवाणीच्या वाहिन्यावर दाखविले गेलेले राजा शिवछत्रपती व थोरले बाजीराव यांच्यावरील मालिकाही पुरेशी प्रतिबंधात्मक भूमिका घ्यायला उपयोगी पडणार्याी आहेत. यावर अधिक चर्चा होणे गरजेचे आहे.

मुंबईत गेल्या पंधरा वर्षात दर दोन वर्षनी मोठे हल्ले झाले आहेत पण हा हल्ला मुंबईच्या २६।११च्या म्हणजे दि. २६ नाहेंबर २००८ रजी झालेल्या मोठया हल्ल्यानंतरचा अगदी सव्वा वर्षातीलच मोठा हल्ला आहे. या हल्ल्याचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याला अनेक देशांचे संदर्भ आहेत.  हा हल्ला जरी पाकिस्तानमुख्यालय असलेल्या गटाचा असला तरी त्याची तयारी पाश्चात्य देशातील प्रगत तंत्राने केली होती. त्यात अल् कायदाचा हस्तक  त्याचे निरीक्षण करून गेला. त्यांने येथील जागा निश्चत केली व नंतर येथे तयारी सुरु झाली. ती तयारी बरीचशी नांदेडयेथे झाली आणि तो हल्ला झाला. या हल्ल्यानंतर ठिकठिकाणची सुरक्षा वाढविणे येवढेच झाले तुलनेनेतपासाची यंत्रणाही सावकाश हालली आणि प्रतिबंधात्मक म्हणजे जेथून हे हल्ले होतात त्यावरच हल्ला करणे यादृष्टीने तर फारसे झाले नाही. वास्तविक या विषयाला या आठवड्यातच नवे वळण मिळाले आहे. ते म्हणजे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांनी तर सरळ सरळ धमकी दिली आहे की भारताने  काश्मीरवरील हक्क सोडावे किंवा युद्धाला तयार व्हावे. सर्वसाधारणपणे पाकिस्तानही युद्ध हे जर्मनबेकरीसारख्या हल्ल्यातूनच करत असल्याने त्यावर देशात अनियंत्रित प्रतिक्रिया व्यक्त होण्यापूर्वी त्या वर या देशात चर्चा होणे आवश्यक आहे.

जोपर्यंत अशा हल्ल्याच्या प्रतिबंधात्मक प्रक्रियेत जनतेला सामावून घेतले जात नाही तोपर्यंत यातून फारसे काही निर्माण होणार नाही. सर्वसाधारणपणे सध्या पुण्यात असलेली पंधरा हजाराची सुरक्षा यंत्रणा अजून काही दिवसांनी फक्त उपचारापुरती अुरते. कारण प्रत्येक व्यक्तीच्या तपासातून काही मिळत नाही, असे लक्षात आल्यावर येणार्या् जाणार्या् व्यक्तीच्या खिशाभोवती मेटलडिटेक्टर फिरवणे येवढाच काय तो उपचार राहतो. पण जेथे जेथे अशी दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे आहेत त्याची माहिती काढणे आणि त्याच्यावर उपाय शोधण्याचा मार्ग सुचविण्याचे आवाहन केले तर अनेक तरुण त्यात पुढे येतील. गेल्या वर्षी त्यावेळचे पोलीस आयुक्त डॉ  सत्यपाल सिग यांनी प्रत्येक महाविद्यालयात व शाळेत जागृती वर्ग सुरु केले होते. त्यांच्या बदलीनंतर ते काम  मागे पडले आहे. पुण्यात ले. जनरल दत्तात्रय शेकटकर यांच्यासारखे अनेक नामवंत व अनुभवी सेनाधिकारी आहेत. त्यांचा आणि तरुण पिढीचा जर संवाद वारंवार घडवून आणला तर यातून मार्ग काढणे फारसे कठीण नाही. जगातील बहुतेक देशांनी निवृत्त सेनाधिकार्यांवच्या आधारेच अशा विषयांची परिणामकारक रचना केली आहे. पुण्यात तसे करणे कठीण तर नाहीच पण अन्यत्र कोठे असे प्रत्यक्ष हल्ले होण्यापूवीं तरुणांना देशाच्या आंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत सहभागी करून घेणे आवश्यक आहे.

………………….

मोरेश्वर जोशी, पुणे

 

 

Leave a Comment