नामुष्की

आपला मुलगा अमेरिकेत असतो असे सांगताना आई बापाचा चेहरा किती फुललेला असतो ! आई वडिलां इतकाच मुलांनाही आपण फॉरेन मध्ये राहातो किवा तिथे शिकतो याचा विलक्षण अभिमान असतो. भारतातले शिक्षण कमी दर्जाचे आणि अमेरिकेतले शिक्षण म्हणजे उच्च दर्जाचे असे मानण्याची तर आपल्याकडे पद्धतच आहे पण या वेडापायी लोक काय काय करीत असतात हे पाहिले की नवल वाटते. खरे तर आपल्या देशातले शिक्षण सरसकट वाईट आणि सगळ्या परदेशांतले शिक्षण सरसकट चांगले असे काही म्हणता येत नाही पण तसे मानणारांना काही काही वेळा फसवणुकीला तोंड द्यावे लागते. अमेरिकेत काही भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकार्यां नी कॉलरला ट्रेकर लावून फिरण्याची शिक्षा फर्मावली हा प्रकार या वेडातूनच निर्माण झाला आहे. परदेशातल्या काही विद्यापीठांतले शिक्षण फारच दर्जेदार असते पण तिथे सामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. मग काही निकृष्ट दर्जाची विद्यापीठे गाठून ते तिथे प्रवेश घेतात. आपला मुलगा परदेशात शिकतो याचा असे सांगण्याची पालकांची सोय होते पण मुलांना चांगले शिक्षण मिळेलच याची काही खात्री नाही.

अशा या शिक्षणाच्या बाजारात काही अपप्रवृत्तीही  शिरलेल्या असतात. परदेशी शिक्षणाच्या वेडाचा गैरफायदा घेऊन ही बनावट विद्यापीठे त्यना अक्षरशः लुबाडत असतात. काही विद्यार्थी नोकरीसाठी परदेशी जातात. काहीही करून परदेशात नोकरी करण्याचे फॅड त्यांच्या मनात असते. खरे तर भारतात अनेक नोकर्याह निर्माण होत आहेत आणि त्यातल्या काही क्षेत्रात कुशलच काय पण अकुशल कामगारही मिळणे दुरापास्त झाले आहे. पण आपल्या देशातल्या या नोकर्यार सोडून काही तरुण अमेरिकेत डॉलरमध्ये पगार देणारी नोकरी मिळवण्यास आतुर झालेले दिसतात. त्यांची ही महत्त्वाकांक्षा जितकी तीव्र असते तेवढीच नोकरी मिळणे अनेकांना कठीण असत. असे तरुण तिथे विद्यार्थी म्हणून जातात आणि एखाद्या विद्यापीठात नाममात्र प्रवेश घेऊन प्रत्यक्षात कोठेतरी नोकरी करीत असतात. अशा बेकायदा विद्यार्थ्यांना मदत करणारी काही विद्यापीठेही अमेरिकेत आहेत. ट्राय व्हॅली विद्यापीठ हे त्यातलेच एक होय. या विद्यापीठात शिकणार्यात आंध्र प्रदेशातल्या काही विद्यार्थ्यांनी बाहेर नोकर्याह करून या संबंधातला कायदा मोडला म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली.

 

या घटनेचा भारताने कितीही कडक शब्दात निषेध केला असला तरी हे कथित विद्यार्थी स्थलांतर विषयक काही कायद्याखाली आरोपी होते. त्यामुळे त्यांना मिळालेली ही शिक्षा योग्यच आहे असे स्पष्टीकरण अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने केले आणि भारत सरकारला गप्प बसावे लागले. अशा प्रकारच्या युक्त्या करणारे असे अनेक लोक परदेशांत आहेत. यूरोपात बेकायदा रित्या काही लोक जातात पण काही देशात नागरिकत्वाचे काही नियम आहेत. तिथल्या मुलीशी विवाह केला तर ते देश त्या जावयाला आपल्या देशाचे कायमचे नागरिकत्व देतात. केवळ या एका गोष्टीसाठी विवाह करणारे काही भारतीय आहेत. असाच हा प्रकार होता. आपण नोकरी करीत नसून शिकतच आहोत असा या विद्यार्थ्यांचा दावा होता. तो खोटा असल्यामुळे त्यांना हा ट्रेकर लावावा लागला. हा ट्रेकर लावला नसता तर त्यांना अटक करण्यात आली असती. ते खरेच नोकरी करीत नसतील तर त्यांचा ट्रेकर ते दिवसभर विद्यापीठाच्या परिसरातच आहेत असे दिसेल. ट्रेकर लावणे हा एक प्रकारे  आपण गुन्हेगार आहोत हे जगाला सांगणे आहे पण या लोकांचा अपराधच असा आहे की त्याला काही इलाज नाही. 

कॅलिफोर्नियाच्या ट्राय व्हॅली विद्यापीठात हा प्रकार घडला. या निमित्ताने या विद्यापीठाची चौकशी केली असता हे विद्यापीठ केवळ याच एका कामात गर्क असल्याचे समजले. या विद्यापीठात प्रवेश घेताना काही विद्यार्थ्यांना ते कसले विद्यापीठ आहे हे माहीतही असेल. जे विद्यार्थी जाणून बुजून शिकण्याच्या नावाखाली नोकरी करण्यासाठीच तिथे जातात त्यांच्या फसवणुकीचा काही प्रश्नच नाही पण,   काही विद्यार्थी खरोखरच शिकण्याच्या पवित्र हेतूने या विद्यापीठात आले असतील त्यांची मात्र फसवणूकच झाली असणार. असे जेव्हा जेव्हा घडते तेव्हा तेव्हा आपल्या त्या त्या देशातल्या परराष्ट्र  कचेर्यां नी या मुलना वस्तुस्थितीची माहिती दिली पाहिजे असे म्हटले जाते. आपण प्रवेश घेत असलेले प्रतिष्ठित नाही तेव्हा जाहिरातीवर भाळून आपणया विद्यापीठात प्रवेश घेणे उचित नाही असा सल्ला आपल्या त्या त्या देशातल्या वकिलातींनी दिला पाहिजे. पण आपल्या वकिलाती काय करीत असतात हा एक मोठा संशोधनाचा विषय झाला आहे. विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनीही परदेशी शिक्षण किवा नोकरी ही बाब प्रतिष्ठेची असते हे वेड आपल्या डोक्यातून काढून टाकावे. आपला देश काही अमेरिकेपेक्षा फार मागे नाही आणि कोणत्याही क्षेत्रातल्या  तरुणांना वाटेल त्या संधी देण्याची क्षमता आता आपल्याही देशात आहे.

 

Leave a Comment