मालेगाव स्फोटाचा नव्याने तपास

महाराष्ट्र मोक्का न्यायालयाने मालेगाव बोंबस्फोटाचा तपास नव्याने करण्याचे आदेश दिले आहेत.मालेगावंमध्ये २००६ झालेल्या बॉम्बस्फोतामागे हिंदुत्ववादी संघटनेचा सभासद असीमानंद याचा हात असल्याचे उघडकीस आल्यानंतर फेरतपासणीची सीबीआयची मागणी कोर्टाने मान्य केली.असीमानंदने दिलेल्या जबाबानुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक सुनील जोशी व अन्य काही मालेगाव स्फोटाशी निगडित होते. या खळबळजनक जवबानंतर सीबीआयने या तपासाच्या फेरतपासणीसाठी कोर्टाला विनंती केली होती. ८ सप्टेंबर २००६ ला नाशिकमधील मालेगाव इथे झालेल्या बॉम्बस्फोतात ३७ लोक मृत्युमुखी व १०० अधिक लोक जखमी झाले होते.त्यावेळी विशेष दहशतवादविरोधी पथक (ATS ) ने २२०० पानांचा गुन्हा डिसेंबर २००६ ला दाखल केला होता.त्यानंतर सीबीआयकडे तपास सोपवण्यात आला.

Leave a Comment