जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा अहवाल मुख्यमंत्र्याकडे सादर

मुंबई – जैतापूर येथील अणुउर्जा प्रकल्पाबाबत स्थानिक लोकांच्या भावना जाणून घेण्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी प्रदेश कॉंग्रेसचे पदाधिकारी व कोकण विभागातील लोकप्रतिनिधी यांचीएक समिती नियुक्त केली होती.समितीने तयार केलेला अहवाल बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समितीने सह्याद्री अतिथीगृहात जाऊन सादर केला.यावेळी समितीचे सदस्य आ. सुभाष चव्हाण प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, आ. अलका देसाई,निर्मला सामंत प्रभावळकर,पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम,कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

समितीने जैतापूर येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निरसन करण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी व संबंधित सर्व प्रकल्पग्रस्तांची याबाबत शासनाने त्वरित बैठक बोलवावी.केंद्र व राज्यशासनाने याबाबत प्रकल्पग्रस्तांच्या शंकेचे निराकरण करावे, असे मुख्यमंत्र्यांना सुचविले.मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत १८ जानेवारीरोजी बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे.

1 thought on “जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा अहवाल मुख्यमंत्र्याकडे सादर”

  1. NEHA MAHALUNGKAR

    ha prakalpa nakkic zala pahije. tyane fakt maharashtra chach nave tar sampoorna deshacha vikas hoil

Leave a Comment