प्रभाकर पणशीकर यांचे निधन

पुणे – तीन दशक मराठी रंगभूमी गाजवणारे  ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर (वय ७९ ) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले.त्यांच्या अनेक नाटकांचे हजारो प्रयोग मराठी रंगभूमीत अजरामर झाली आहेत.”तो मी नव्हेच”, “इथे ओशाळला मृत्यू”, “अश्रूंची झाली फुले” ही त्यांची सर्वात गाजलेली नाटक.

पणशीकर यांना एक जानेवारी रोजी श्‍वसनाचा त्रास होऊ लागला होता.त्यांना दि. ३ रोजी हृदयविकाराचा तिसरा धक्का बसला. त्याना उपचारार्थ येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी पणशीकर बायपास शस्त्रक्रियेला सामोरे गेले होते.  रात्री सव्वानऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर हे त्यांचे चिरंजीव आहेत.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या प्रांगणात दुपारी दीड वाजता पणशीकर यांचे पार्थिव शुक्रवारी टिळक स्मारक मंदिर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी तीननंतर त्यांची अंत्ययात्रा निघणार असून, वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Comment