पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

पुणे:  ऑस्कर पुरस्कारांच्या स्पर्धेत आणि एकूणच अमरिकेत ‘हॉलीवूड’च्या चित्रपटांची मक्तेदारी मोडीत निघाली असून इतर देशांच्या चित्रपटानाही तिकडे चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मत ‘वाईन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक दिएगो फ्राईड यांनी व्यक्त केले.
     ‘वाईन हा चित्रपट पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जागतिक गटात प्रदर्शित करण्यात आला. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
     हॉलीवूडपट हे चाकोरीबद्ध असतात; असे मत व्यक्त करून फ्राईड पुढे म्हणाले की आपण होलीवूड्चा चित्रपट, किंवा भारतीय, अर्जेन्तिनाचा चित्रपट असा भेदभाव करीत नाही. प्रत्येक चित्रपटाकडे केवळ एक चित्रपट याच दृष्टीने पहातो.
     आपल्या ‘वाईन’ या चित्रपटाबाबत बोलताना फ्राईड म्हणाले की; हा चित्रपट अधिकाधिक वास्तववादी व्हावा यासाठी त्यात केवळ दोनच पात्रांची योजना केली आहे. त्यात आपण स्वत: एका आचार्याची भूमिका केली असून चित्रपटात एकही संवाद नाही. असा चित्रपट बनविणे हे माझ्यासाठी एक मोठे आव्हान होते; मात्र कलाकारांची निवड योग्य असेल तर ९० टक्के काम पूर्ण होते; असेही त्यांनी नमूद केले. स्त्री-पुरुष संबंधांवर आधारित कथानकावर हा चित्रपट बेतलेला आहे.  या चित्रपटाचे चित्रीकरण केवळ एका केमेर्याने एका आठवड्यात पूर्ण केल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment