पगारवाढीच्या वाटाघाटी

महामंदीचे सावट दुर सारून हळूहळू तेजी आपला प्रभाव दाखवु लागली आहे. त्यामुळे नोकऱ्यांमधील संधीही वाढु लागल्या आहेत. व्यवस्थापनाशी सुसंवादी चर्चा करून चांगले पैकेज पदरात पाडुन घेण्यासाठी काही सूचना जरूर अंमलात आणाव्यात.

  • पूर्वतयारी : नोकरीसंबंधी वाटाघाटी करताना आपल्या कौशल्याचे, ज्ञानाचे बाजारूमुल्य आणि नोकरी देणारी कंपनी याबद्दल शक्य तितकी माहिती मिळवा. यातुन यश मिळण्याची शक्यता वाढते. ही माहिती इंटरनेट, वाचनालये, व्यावसायीक गट आणि नेटवर्कींग गट या माध्यमातुन उत्तम प्रकारे मिळते. लक्षात ठेवा, चर्चेची कला शिकण्यात खर्ची घातलेला वेळ ही सगळ्यात मोठी गुंतवणुक आहे.  
  • स्व-प्रतीमा सांभाळा : नोकरीसंबंधी चर्चा संपल्यानंतर त्याच व्यक्तीबरोबर तुम्हाला काम करायचे असते. तुमचे भविष्यकालीन यश यावरच अवलंबुन आहे. त्यामुळे या वाटाघाटींमधुन तुमच्या प्रतिमेला धक्का लागणार नाही याकडे कटाक्षाने पहा. तुमची सकारात्मक प्रतिमा निर्माण झाल्यावर, तुम्ही ही नोकरी स्वीकारावी यासाठी समोरील व्यक्ती उत्सुक बनेल.
  • तुमच्या आणि व्यवस्थापनाच्या गरजा जाणा : तुमच्या प्राथमिकता काय आहेत, तुम्हाला खरोखरी काय हवे आहे याचे काटेकोर परीक्षण करा. यामुळे कोणत्या कंपनीबरोबर काम करून आपल्याला समाधान लाभेल याची तुम्हाला जाणीव होईल. कंपनी आपल्या वेतनधारकांसाठी काय करू शकते आणि काय करू शकत नाही याचा अंदाज आल्यास चर्चेतुन कोणत्या मुद्यांवर अधिक भर द्यावा हे स्पष्ट होते.
  • वाटाघाटींचे सामर्थ्य जाणा : काही वेळेस तुमच्याकडे असाधारण कौशल्ये असल्याने त्यांना फार मागणी असते, तर काही वेळेस सामान्य कौशल्ये असणारे बरेच उमेदवार उपलब्ध असतात. अशा वेळी कम्पनीचा आणि परिस्थितीचा आढावा घेऊन आपले मुद्दे मांडावेत.
  • नेहेमी सत्याला धरून रहा : खोटे बोलण्याऐवजी खरे बोलण्यानेच अधिक फायदा होतो. नोकरीसाठी बोलणी करताना असत्य बोलणे चुकीचे आणि परिणामशुन्य ठरते. खोटेपणा उघड झाल्यास नोकरी तर हातची जातेच, पण तुमची विश्वासार्हता कायमची धोक्यात येते. शिवाय, फार स्पष्टवक्तेपणाही फायदेशीर ठरतोच असे नाही. तुम्हाला ठाऊक असलेली प्रत्येक गोष्ट आक्रस्ताळेपणाने सांगीतलीच पाहिजे असे नाही. उलट, काय सांगावे आणि ते कशा पद्धतीने सांगावे हे आधीच ठरवलेले चांगले. या चर्चेतील मुलभूत मुद्दा म्हणजे, संबंधीत क्षेत्राची परिपूर्ण माहिती मिळवणे आणि योग्य वेळ येताच तिचा यथार्थ उपयोग करणे.
  • प्रामाणीकपणाने वागा : नोकरीसंबंधीत चर्चेतील महत्वाचे मार्गदर्शक तत्व म्हणजे प्रामाणीकपणा, निष्पक्षपातीपणा! कंपनीच्या अंदाजपत्रक आणि एकुण संरचना यांच्या मर्यादेत राहुनच वेतनधारकांच्या योग्य व न्याय्य मागण्या मान्य केल्या जातात. अशा वेळी प्रामाणीकपणा हे तुमचे सगळ्यात शक्तिशाली शस्त्र ठरते. म्हणजेच, तुम्ही मांडलेल्या प्रत्येक मुद्याचे समर्थन तुम्हाला प्रामाणीकपणे करता आले पाहिजे  
  • तुमच्या फायद्यासाठी अनिश्चिततेचा वापर करा : तुमच्या नोकरीसंबंधीत सगळ्या अपेक्षा एकदम व्यक्त केल्याने मिळणाऱ्या पैकेजवर नक्कीच मर्यादा येतात. तुमच्यापुढे प्रस्ताव ठेवण्यापूर्वी कंपनी तुमच्या अपेक्षांचा अंदाज घेत असते. या माहितीच्या आधारे तुम्हाला कमीत कमी पैकेज कसे देता येईल हे पहिले जाते. स्तःच्या अपेक्षांविषयी फार माहिती देणे येथे धोकादायक ठरू शकते.                     
  • सृजनशील रहा : तुमची ध्येये पूर्ण करण्याचे सगळे मार्ग विचारात घेऊन दिलेल्या प्रस्तावाचे एकुण मुल्य जाणुन घ्या. हे मुल्य कसे वाढवता येईल याचाही विचार करा. लवचिक धोरण स्विकारून संबंधीत बोलणी अधिकाधिक सफल करण्यासाठी प्रयत्नशील रहा.  
  • तुमच्या ध्येयावर नजर ठेवा : नोकरीची बोलणी करताना त्यात जिंकण्याऐवजी तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. बोलण्यात आपण हरलो अशी भावना मुलाखतकर्त्याच्या मनात येऊ देऊ नका. वरिष्ठ यातुन दुखावले गेल्यास बोलणी यशस्वी होण्याची शक्यता उणावते.  
  • मागणीची मर्यादा निश्चित करा : अति लोभापायी मिळालेले सर्व काही हरण्याची शक्यता वाढते. चर्चेदरम्यान अशी एक वेळ येते, जेव्हा तुम्ही अपेक्षित असलेले सगळे काही मिळवता. त्याहीपेक्षा अधिक मिळवण्याचा प्रयत्न केल्यास बोलणी फिस्कटु शकतात. तुमच्या करियरचीही अपरिमित हानी होते तेव्हा अतिलोभ टाळा. 
  • नातेसंबंधांचे महत्व जाणा : नोकरी म्हणजे सतत चालु राहणारी नातेसंबंधांची प्रक्रिया! नोकरीसंबंधीत चर्चा म्हणजे या नातेसंबंधांचा आरंभबिंदु. या बिंदुपाशीच सावधानतेने वागल्यास संपुर्ण करियरला याचा फायदा होऊ शकतो. 

नविन नोकरीतील मुद्यांवर परिणामकारक बोलणी करण्यासाठी या सूचना फायदेशीर ठरतात. त्यानुसार वागुन उत्तम पगाराची संधी पदरात पाडुन ह्या आणि नवनविन आव्हानांचा सामना करण्यास सज्ज रहा. अधिक जबाबदाऱ्या स्विकारून नविन कौशल्ये शिकत राहिल्यास त्यातूनही अनेक संधी नव्याने निर्माण होतील.

Leave a Comment