थंडीने अख्खा विदर्भ गारठला

नागपूर, दि ०७ जानेवारी, (हि.स.) – थंडीमुळे संपूर्ण उत्तर भारत गारठला असतानाच विदर्भातही सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. दिवसाही थंडगार वारे वाहत असून रात्रीचे तापमान खूप खाली येत आहे. गेल्या पंधरवड्यापासून संपूर्ण विदर्भाला थंडीने गारठले आहे. दर दिवशी थंडीचे प्रमाण वाढत असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे सकाळी दवबिदूंचे बर्फझाल्याचे कुठेकुठे आढळून येत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्रीच्या सुमारास तसेच पहाटेला शहर आणि खेडोपाडी शेकोट्यांभोवती लोकांची गर्दी पहायला मिळत आहे. शुक्रवारी नागपूरमध्ये ५.६ अंश तापमानाची नोंद झाली. अकोल्यात ५.६, अमरावतीमध्ये ९.०, बुलडाण्यात ९.२, चंद्रपूरमध्ये ८.६, गोंदियात ८.४, यवतमाळमध्ये ६.६ आणि भंडार्‍यात ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Leave a Comment