२०१० चे लोकप्रिय अभिनेते

२०१० हे निर्विवादपणे अभिनेता सलमान खानच होत अस म्हणायाला काही हरकत नाही.सलमान खानच्या ‘ दबंग ‘ या चित्रपटाने चित्रपट जगात नवीन इतिहास रचला आहे.परत एकदा फ़क़्त सलमान खान या नावावर सिनेमागृहात प्रेक्षक आकर्षीत होतो हे सिद्ध झाले.अर्थात दबंगला सुरमय संगीत,मोठी पब्लिसिटी याची देखील साथ मिळाली परंतु चित्रपट सुपर हिट होण्याचे श्रेय सलमान खानलाच जाते !! या वर्षीचा सलमानचा दुसरा चित्रपट ‘वीर’ मात्र अपयशी ठरला.

अजय देवगणला देखील हे वर्ष लाभदायक ठरले.त्याचे ‘राजनीती’ , ‘गोलमाल ३ ‘ आणि ‘ once upon a time in mumbai ‘ हे तीनही चित्रपट हिट होते. अजय देवगणचा ‘ अतिथी तुम कब जाओगे ‘ हा चित्रपट साधारण चालला.पण ‘आक्रोष’ आणि ‘ तूनपूर चा सुपरहिरो’ मात्र साफ आपटले.

रणबीर कपूरने या वर्षी देखील आपली यशस्वी घोडदौड ‘राजनीती’ द्वारे सुरु ठेवली.राजनीती चित्रपटात अनेक अभिनेते असून देखील रणबीरच्या अभिनयाचे सर्वातजास्त कौतुक झाले.त्याचा ‘अंजना अंजनी’ हा चित्रपट देखील ठीकठाक चालला.

अक्षय कुमारच्या नावावर देखील या वर्षी दोन हिट आहेत, ‘हाउसफुल’ आणि ‘तीस मार खान’. ‘खट्टा मीठ’ काही ठिकाणी चांगला चालला.पण बिगबजेट ‘action replay’ मात्र चित्रपट खिडकीवर साफ आपटला.

शाहरुख खांचा ‘माय नेम इज खान ‘ चांगला चालला.परदेशात , अमेरिकेत आणि युरोप, चित्रपट सुपरहिट होता.स्टार पुत्र ह्रितिक रोशन आणि अभिषेक बच्चन साठी मात्र हे वर्ष अतिशय अपयशी ठरले.त्यांचे अनुक्रमे ‘काईटस्’ आणि ‘ रावण ‘ चित्रपट खिडकीवर पूर्णपणे अपयशी ठरले.

१. सलमान खान

     दबंग

२. अजय देवगण

   राजनीती , गोलमाल ३ , once upon a time in mumbai

३. रणबीर कपूर

   राजनीती,अंजना अंजनी

४. अक्षय कुमार

   हाउसफुल , तीस मार खान

५. शाहरुख खान

   माय नेम इज खान

Leave a Comment