पुन्हा एकदा आयपीएल

आयपीएलच्या चौथ्या मोसमासाठी सुमारे ६२ भारतीय खेळाडुंची पुन्हा एकदा बोली लावली जाईल. भारतीय कप्तान महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर (१.८४ कोटी) आपल्या पूर्वीच्याच संघात राहतील असा अंदाज आहे. विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांच्यासाठी देखील १.८४ कोटींची बोली झाली होती.
दुसऱ्या गटाची किंमत १.३ कोटी एवढी असुन त्यात टी २० स्पेशालिस्ट युसुफ पठाणबरोबरच वेगवान झहीर खान आणि प्रतिभाशाली सुरेश रैनाचा समावेश होतो.
तिसऱ्या गटाची पायाभुत बोली ९२ लाखांची असुन त्यात पूर्वकप्तान सौरव गांगुली, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण ही नावे येतात. गौतम गंभीरबरोबरच विराट कोहली, इरफान पठाण, रॉबीन ऊथापा, आशिष नेहरा, इशांत शर्मा आणि प्रविण कुमार हे चेहेरेही या गटात दिसतील. चौथ्या गटाची पायाभुत बोली आहे ४६ लाख. यात वृद्धिमान साहा, मनोज तिवारी, अशोक दिंडा, चेतेश्वर पुजारा, अशी देशांतर्गत आणि काठावरील खेळाडुंची नावे येतात. पाचव्या आणि अंतिम गटात मनप्रीत गोनी, संदीप त्यागी, श्रीधरन श्रीराम अशा भारतीय संघातुन वगळलेल्यांचा समावेश होतो. 

लिलावात भाग घेणारे खेळाडु असे आहेत :

आंध्रप्रदेश : येलाक्का वेणुगोपाळ राव.

आसाम : श्रीधरन श्रीराम.

बडोदा : युसुफ पठाण, इरफान पठाण, अंबती रायुडु, मुनाफ पटेल.

बंगाल : सौरव गांगुली, मनोज तिवारी, वृद्धिमान साहा, अशोक दिंडा.

दिल्ली : विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, शिखर धवन, आशिष नेहरा, ईशांत शर्मा.

गुजरात : पार्थिव पटेल, सिद्धार्थ त्रिवेदी.

हरियाणा : जोगिंदर शर्मा, अमित मिश्रा.

हैदराबाद : व्हीव्हीएस लक्ष्मण, टी सुमन, प्रज्ञा ओझा.

झारखंड : महेंद्रसिंग धोनी, सौरव तिवारी.

कर्नाटक : अनिल कुंबळे, राहुल द्रविड, मनिष पांडे, अभिमन्यु मिथुन, आर विनायक कुमार, रॉबिन ऊथापा.

केरळ : एस श्रीनाथ.

मुंबई : सचिन तेंडुलकर, झहीर खान, वासिम जाफर, अभिषेक राऊत, रोहित शर्मा, अभिषेक नायर, रमेश पोवार.     

मध्यप्रदेश : नमन ओझा.

पंजाब : युवराज सिंग, हरभजन सिंग, मनप्रीत गोनी, व्हीआरव्ही सिंग.

रेल्वे : मुरली कार्तिक.

राजस्थान : पंकज सिंग.

सौराष्ट्र : रविंद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा.

तामिळनाडू : दिनेश कार्तिक, एस बद्रिनाथ, आर सतिश, आर अश्विन, एम विजय, एल बालाजी.

उत्तरप्रदेश : महंमद कैफ, सुरेश रैना, प्रविणकुमार, संदीप त्यागी, पियुष चावला, रुद्र प्रतापसिंग.

विदर्भ : उमेश यादव. 

Leave a Comment