आयसीसी क्रमवारीत संगकारा पहिल्या क्रमांकावर

आयसीसी टेस्ट क्रमवारीतील  सचिन तेंडुलकरचे  अव्वल स्थान श्रीलंकेचा फलंदाज कुमार संगकारा याने जिंकले. भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खान याने मात्र याच क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकापर्यंत बढत घेतली. कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर वेस्ट इंडीजविरुद्ध तडाखेबंद १५० धावा फटकावल्यामुळे संगकारा पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. एक दिवसीय सामन्यातील द. आफ्रिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडु एबी डी व्हिलिअर्स आणि इंग्लंडचा जोनाधन ट्रौट हे दोघेही प्रथमच आयसीसी क्रमवारीत पहिल्या दहात पोहोचले आहेत. डी व्हिलिअर्स आठ जागांची आघाडी घेत पाचव्या स्थानावर आहे तर ट्रौट आठव्या स्थानावर न्युझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टम्याचमध्ये (testmatch) ४-९० अशी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे झहीर खान टेस्ट गोलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या आजवरच्या कारकिर्दीतील हे सर्वोच्च स्थान आहे. पहिल्या एशेस (ashes) टेस्टच्या स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलियाचा हेटट्रिक हिरो पिटर सिडल आणि इंग्लंडचा स्टीव्हन फिन दोघेही जण वरच्या स्थानावर आले आहेत. गब्बा येथील टेस्टम्याचमध्ये ६-१४४ अशी कामगिरी केल्याने तो चौदाव्या क्रमांकावर आला. आयसीसीचा तरुण खेळाडु फिनने ६ विकेट घेतल्याने त्याला एकोणीसाव्या स्थानापर्यंत मजल मारता आली. अष्टपैलु खेळाडुंच्या आयसीसी क्रमवारीत मात्र काही बदल झालेला नाही. द. आफ्रिकेच्या जेक्स (Jacs) केलीसने येथील आपले अव्वल स्थान टिकवुन ठेवले आहे. मात्र या यादीतील ऑस्ट्रेलियाच्या शेन वैटसनची पाचवी जागा इंग्लंडच्या ग्रीम स्वैनने हिरावुन घेतली. पहिल्या एशेस टेस्टमध्ये या एकोणतीस वर्षीय खेळाडुने ७७ धावांबरोबरच १-९६ अशी कामगिरी करून हे स्थान मिळविले.                  

Leave a Comment