ब्रेक के बाद…

 खूप वर्षे मुंबईत घालवल्यावर मी सध्या बेंगलोरला स्थायिक झाले आहे. दोन्ही शहरे मला आवडतात पण कोणतेही एक शहर परिपूर्ण असू शकत नाही. दैनंदिन कामातुन विरंगुळा हवा असेल तर बेंगलोरमध्ये दोनच मुख्य पर्याय आहेत – सिनेमा पहा किंवा बाहेर कुठे तरी जेवायला जा!
सिनेमाचे प्रचंड वेड असल्याने मी नियमितपणे थिएटरमध्ये जाऊन सिनेमे बघते. याही वेळेस तसेच झाले. सलग दहा दिवस शोध घेऊन मी काल ‘ब्रेक के बाद’ ला जायचा निर्णय घेतला. सिनेमानंतर मला कायकाय वाटले असेल? फसल्यासारखे, अपमानीत झाल्यासारखे आणि हताश! भिकार सिनेमासाठी ३५० रुपये मोजल्यामुळे मला फसल्यासारखे वाटले. सिनेमा पाहुन मी ठार मूर्ख असल्याची भावना दाटल्याने मला अपमानास्पद वाटले. शिवाय एव्हढा वेळ, पैसा आणि ऊर्जा वाया घालवुन पदरी काय पडले तर दमणुक आणि वैताग – अर्थातच यामुळे मी हताश झाले.
‘ब्रेक के बाद’ भयानक आहे असे म्हणणे हे भयानक या शब्दाला कमी लेखल्यासारखे होईल. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, मी याआधी एवढे मोकळेपणाने लिखाण कधीच केले नव्हते. इतरांप्रमाणेच माझीही सतत वेळेशी लढाई सुरु असते. सिनेमा पहायला आलेल्यांपैकी बऱ्याच समजूतदार लोकांनी मध्यंतरानंतरच सिनेमाचा निरोप घेतला होता. पण मी मात्र आशावादी असल्याने, काही चांगले घडेल या आशेने शेवटपर्यंत जागा सोडली नाही.
सिनेमे बनवणारे आपल्याशी नेहेमी असे का खेळतात? का सारखे सारखे आमची थट्टा करतात? या घनघोर, समस्येला काहीच उत्तर नाही का? (विशेषतः बॉलीवुड प्रेमींसाठी?)
हताशपणे बसले असता लखकन एक विचार डोक्यात चमकला. नवीन व्यवसाय करण्याची ऊर्मी दाटुन आली : ‘आय वांट माय मनी बैक. कॉम’ या नावाची एक साईट कम चळवळ का सुरु करू नये. मी खरच खुप सिरियसली बोलते आहे. याची सुरुवात कशी करावी याच विचारात आहे सध्या. तुमचेही यावरील विचार ऐकायचेत मला…

-श्रद्धा शर्मा

Leave a Comment