ट्विटर हाताळण्याचे तंत्र

विदेशमंत्री शशी  थरूर यांनी आपल्या ब्लॉगवर  केलेल्या टिप्पणीमुळे फार  मोठा हंगामा होऊन त्यांना मंत्रीपदाला मुकावे लागले. ट्विटरची लोकप्रियता प्रचंड असून त्याभोवती अनेक व्यावसायिकांनी आपले जाळे उभे केले आहे. ट्विटरचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. काय आहेत या गोष्टी?

    * ट्वीटर अकाउंट  आणि ब्लॉग या खासगी बाबी असुन त्यातुन फक्त तुमचेच विचार व्यक्त होतात. यातुन तुमच्याविषयी काही पूर्वग्रह निर्माण होऊ शकतात. त्यामुळे  स्वतःविषयी  आणि तुमच्या कंपनीविषयी मते मांडताना सावधगिरी बाळगा.
    * तुमचे सहकारी काय लिहित आहेत यावरही लक्ष ठेवा. कंपनीविषयी निष्ठा व्यक्त करण्याच्या भरात त्यांच्याकडुन फायद्याऐवजी नुकसानच होण्याची शक्यता अधिक आहे.
    * कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन लेखणी-युद्धात सहभागी होऊ नका. एखाद्या विषयावर अनेकांनी वादविवादास सुरुवात केल्यावर असे युद्ध पेटते. असे युद्ध तुमच्या प्रतिष्ठेला बाधा आणु शकते.
    * ट्वीटरवरून इतरांना फार उपदेश करण्याच्या फंदात पडु नका. तुम्ही इतरांची निंदा करत आहात असा सूर यातुन व्यक्त होतो.
    * एखादी गमतीशीर गोष्ट तुम्हाला ट्वीटरवर किंवा ब्लॉगवर शेअर करावीशी वाटली तरी काही हरकत नाही. पण तशीच बातमी इतरत्र प्रसिद्ध झाली असल्यास ती लोकांना कंटाळवाणी वाटु शकते.
    * वेगवेगळी सोशल नेटवर्कस वेगवेगळ्या हेतूंसाठी आहेत. लिंकडइन व्यावसायिक संपर्कासाठी आहे, तर फेसबुक मित्रांसाठी. तुमचे विचार काय आहेत, तुम्ही काय करताहात हे जाणण्यासाठी ट्वीटर आहे. केवळ ओळख आहे एवढ्याच कारणासाठी लोक एकमेकांना ट्वीटरवर एड करत नाहीत.
    * परिस्थितीची निकड असेल तरच ट्वीटरवरून फॉलोअप ठेवला जातो. फक्त बातम्या किंवा स्वतःविषयी अतिरंजीत मते असणाऱ्यांचा सहसा फॉलोअप ठेवला जात नाही.

ट्वीटर  टिप्स :

    * ट्वीटर वापरताना वेबची जागा वापरू नये. त्याऐवजी ट्विटडेक, ट्विटी किंवा ट्विटरिफी अशा सुविधांचा वापर करावा.
    * ट्वीटरवर एकापेक्षा अधिक अकाउंटस ऑपरेट करायची असल्यास हुटसुट (Hootsuite) चा वापर करावा.
    * ट्वीटरवर चित्रे पोस्ट करण्यासाठी ट्वीटपीक (Twitpic) आणि व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी ट्वीडीओ (Twideo) या सुविधांचा वापर करावा.
    * ट्वीटरवरचे सगळ्यात लोकप्रिय लोक जाणुन घ्यायचेत? यासाठी Twitterholic.com ही लिंक चेक करा.

Leave a Comment