टीचरवौल (Teacherwall)

भारतीय शिक्षणव्यवस्था आज खुपच विकसित झाली आहे. आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यावर मागे वळुन पाहता आपल्या मनात अनेक भावना उचंबळतात.  मनातील एका कोपऱ्यात आपले शिक्षकही असतात, आणि वेळोवेळी आपल्याला निरपेक्ष सल्ला देणारे मित्र कम समुपदेशकही असतात. यापैकी प्रत्येकाचा आपल्या जीवनावर बरावाईट परिणाम झालेला असतो. काही शिक्षकांनी, मित्रांनी आपल्याला खुप पुंजी दिलेली असते. आणि त्यांचे आभार मानायचे राहुन गेलेले असतात. काही शिक्षकांनी स्वतःमध्ये काय बदल, सुधारणा कराव्यात याची यादीही आपल्याकडे तयार असते. पण हे नेमके कुठे मांडायचे हे मात्र सुचत नाही. टीचरवौल कम्युनिटीने आपल्यापुढील हा प्रश्न सोडवला आहे. आपले शिकण्याचे, शिकवण्याचे अनुभव आपण या व्यासपीठावरून मांडू शकतो. या व्यासपीठावरून आपण शिक्षकांविषयी कृतज्ञताही व्यक्त करू शकतो. तसेच, त्यांच्यावर रचनात्मक टिकाही करू शकतो. इमेजेस, व्हिडीओ वापरून या व्यासपीठावरून आपण आपल्या अविस्मरणीय क्षणांची वाटणीही करू शकतो. आजी-माजी विद्यार्थ्यांची, सहकार्यांची स्वतंत्र कम्युनिटीही येथे तयार होऊ शकते. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होऊ शकते. टीचरवौल कम्युनिटीची गुणवैशिष्ट्ये अशी आहेत :

    * शिक्षकांविषयी, मित्रांविषयी अभिप्राय देणे.
    * एकाच शिक्षकांच्या हाताखाली शिकलेल्या विद्यार्थ्यांची कम्युनिटी तयार करणे.
    * संभाषणाद्वारे सर्वाधिक लोकप्रिय शिक्षकांची निवड.
    * निरनिराळ्या विषयांना, शेऱ्यांना अनुसरून.
    * विरंगुळ्याचे क्षण एकत्रितपणे उपभोगणे.
    * कम्युनिटी अद्ययावत करणे.
    * आपल्या शिक्षकांविषयी इतरांची मते ऐकणे.

तेव्हा ताबडतोब Teacherwall.com ला लॉग ऑन करून लिहायला सुरुवात करा.

Leave a Comment