ऑलिम्पिक स्पर्धेत जिकण्याचे लक्ष्य – कविता राऊत

दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या अथेलेटिक्सने पदक विजेती कामगिरी करून युरोपियन देशांना भारताची नवी ओळख करून दिली असून, आम्हीही ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिकू शकतो, असे दाखवून दिल्याचे धावपटू कविता राऊत हिने महान्यूजशी बोलतांना सांगितले. 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेती ठरल्यानंतर तुला काय जाणवले या प्रश्नाला उत्तर देतांना कवितान सांगितले की राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक मिळविल्यानंतर मला सर्वात अगोदर आठवण झाली ती माझ्या आई-वडिलांची. ज्यांच्या पाठिब्यामुळे मी घरापासून दूर राहून सराव करू शकले आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकले. प्रशिक्षक विजेंद्रसिग यांचे योगदानही मोलाचे असून, त्यांचीही आवर्जुन आठवण झाली. त्यांच्या मेहनतीमुळे मी विक्रमासह भारतासाठी पदक मिळवू शकले. 

आशियाई स्पर्धेतील कामगिरीबाबत माहिती देतांना कविता म्हणते, आशियाई स्पर्धेत प्रिजा श्रीधरन आणि मी अशा दोघीच स्पर्धा करीत होतो. पदक कोणीही जिको परंतु आपल्या उत्कृष्ट कामगिरीकडे लक्ष केंद्रित करा, असे त्यांनी सांगितले होते. स्पर्धेत मी थोडी दडपणात होतेच शिवाय पायाचा स्नायू दुखावल्यामुळे मला अपेक्षित कामगिरी करता आली नाही परंतु मिळविलेल्या पदकामुळे मला आनंदच झाला असे सांगून दहा हजार मीटर आपली आवडती स्पर्धा असून, यामध्ये मी अधिक सुधारणा करून सर्वत्तम कामगिरी करू शकते, असा विश्वास तिने व्यक्त केला. 

या एकूणच भारताच्या कामगिरीचा जागतिक पातळीवर काय परिणाम झाले असे तुला वाटते या प्रश्नाचा आनंद तिच्या चेह-यावर दिसत होता याला उत्तर देतांना कविताने सांगितले की या स्पर्धांमुळे भारतातील अथेलेटिक्समधील खेळाडू जगासमोर आले असून, भारतातील खेळाडू चांगली स्पर्धा करू शकतात असा संदेश इतर देशांना यानिमित्ताने पोहोचला आहे. आशियामध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा वाढत असून, भारताची खरी स्पर्धा युरोपियन खेळाडूंशी आहे.

नव्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कशाची आवश्यकता आहे याबाबत उत्तर देतांना कविताने सांगितले की प्रोत्साहन आणि मदतीची आवश्यकता आहे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुणवंत खेळाडू असून, असे खेळाडू शोधून त्यांना योग्य प्रशिक्षण आणि प्रशिक्षक मिळाल्यास भारताला चांगले अथेलेटिक्स मिळू शकतील.

लंडनमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिकण्याचे लक्ष्य असून, त्यादृष्टीने सरावावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे कविताने सांगितले.

Leave a Comment