यशाचा मंत्र

तुम्ही बऱ्यापैकी करियरपेक्षा अधिक कशाच्या तरी शोधात आहात ? तुमची कौशल्य, रुची, मूल्य, आणि भवीतव्यातील योजना यांच्याशी सुसंगत व्यवसायाच्या शोधात आहात ?

असे असेल तर विचारमंथनाला आणि योजनाबदल आखणीला पर्याय नाही. भवीतव्यातील करियर निश्चित करण्यापूर्वी त्यातील संभवता आणि परिणाम काय असतील याकडे पुरेशा गांभीर्याने पाहणे महत्वाचे आहे. आपले करियर नियतीनेच ठरविले आहे. यावर आपल्यापैकी बहुतेकाचा विश्वास असतो. हे अगदीच नाकारता येणार नाही; पण म्हणून आपल्या हातात असलेल्या गोष्टीना कमी लेखून चालणार नाही. यशाच्या महामार्गावरून प्रवास करायचा असेल, तर आपले सगळे लक्ष्य आपल्या कामगिरीवर एकवटले पाहिजे. निर्णय, योजना, दृढ निश्चय, शिस्त, आणि स्थिरता हे घटक यशस्वी करियर मिळविण्यात महत्वाची भूमिका बजावतात. निर्णय घेणे : आपल्या प्रत्येक कृतीचे काही निश्चित परिणाम असतात. म्हणजेच सोप्या शब्दात, प्रतेयक कृतीला बरी – वाईट बाजू असते. आत्म – विश्लेषण मोठ्या प्रमाणात करून त्यानतरच काळजीपूर्वक एखादा निर्णय घ्यावा निर्णय चुकला तर अपेषित परिणाम कधीच मिळणार नाहीत. अशा चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यात अपयशाला सामोरे जाण्याची वेळ येते.

समजा, तुम्हाला विज्ञान शाखेत रुची नाही, पण पालकांच्या दबावामुळे तुम्ही त्या शाखेत प्रवेश घेतलात. बारावीची परीक्षा जेमतेम गुणांनी उतीर्ण झालात, तर भवीतवयात चांगली कामगिरी करू शकणार नाही. यासाठी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच योग्य शाखेची निवड करणे गरजेचे आहे. हा निर्णय घेण्यात पालकांची आणि शिक्षकांची भूमिका फार महत्वपूर्ण ठरते.

योजना : यशस्वी करियरमध्ये महत्वाची भूमिका असणारे आणखी एक महत्वाचे साधन म्हणजे योजनाबद्ध आखणी. योजना सुव्यवस्थित नसल्यास अनअपेषित परिणामांना आणि घटनांना सामोरे जावे लागते. योजनाब्दल रीतीने केलेले काम अपयशी ठरतच नाही असे नसून, एखाद्या कारणाने ते अपयशी ठरल्यास, त्यातून होणारे नुकसान फार मोठे नसते. समजा, एखाद्याने ईजीनियरिंगची प्रवेश परीक्षा देण्यासाठी उत्तम योजना आखली आणि त्यानुसार तयारी केली. या परीक्षेत त्याला नाही चांगले गुण मिळवण्याची तरी संबंधीत क्षेत्रातील एखाद्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची संधी त्याला मिळू शकते.

चांगल्या योजनेमुळे नुक्सानातील धोका कमी होण्याबरोबरच वळेची आणि पैश्यांची बचतहि मोठ्या प्रमाणात होते. कोणत्याही परीक्षेची तयारी करताना ती योजनाबद्ध असल्यास, त्यात यशस्वी होण्याची शक्यता फार मोठी असते. साहजिकच पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्याने दुसऱ्यांदा तयारी करण्यासाठी वेळ व पैसा व्यर्थ जात नाही.

दृढनिश्चय : बुद्ध, येशूख्रीस्त, आलेक्झादर, महात्मा गांधी, आईन – स्टाइन न्यूटन हे सगळेजण एवढे श्रेष्ट का ठरेल ? कोणतीही किमत मोजून आपल्या हवे ते मिळवायचेच या दृढ संकल्प. दृढ निश्चयाच्या बळावर यश आपल्याकडे वाहून आणले जाते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

शिस्त : जीवनाला शिस्त नसेल तर सगळे परिणाम व्यर्थ जातील. शिस्तीच्या अभावी केवळ तो प्रयासच नाही तर सगळे आयुष्याच अपयशाची होऊ शकते. विशिष्ठ अभायास्क्र्माचा प्रवेश घेऊन समजा तुम्ही रोज पाच तास अभ्यास करू शकला नाहीत तर थोड्याच काळात तुमची योजना कोलमडून जाईल.

स्थिरता : तुमच्या व्यक्तीमत्वात स्थिरता असणे आवश्यक आहे. तुमच्या योजनेच्या भाग असलेली कामे सातत्याने पार पाडलीत तरच अपेक्षित परिणाम मिळतील आणि तुम्ही यशाचा मार्ग गाठू शकाल. आखलेल्या योजनेनुसार दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत, तर घेतलेल्या निर्णय आखलेली योजना आणि बनवलेली शिस्त टाचा बिंदूवर पोहचतील.

तेव्हा करियरमध्ये यशस्वी होण्यासाठी या सगळ्या घटकांचा योग्य समन्वय साधने आवश्यक आहे

Leave a Comment