आपली खास गुंतवणूक योजना स्वतःच आखा

समूहाने राहणारा आदिमानव केवळ आजपुरते पाही.जंगलातून गोळा केलेली कंदमुळे, पशुपाशांचे मांस कच्चे किंवा भाजून खायचे आणि जलाशयातील पाणी पिऊन तृप्तीची ढेकर द्यायची.पोट भरले की आभाळाची शाल पांघरुन भूमातेच्या शय्येवर खुशाल ताणून द्यायची ! आधुनिक काळातील मानव मात्र आजपुरते पाहणारा नाही.बुद्धीमत्येच्या बळावर तो पिढ्यान्पिढ्यांची ची तरतूद करून ठेवू शकतो.ह्यालाच तर म्हणतात वित्त्योजना. इच्छाशक्ती असेल तर बाजारपेठेचे ज्ञान मिळवून कोणीही आपल्या वित्ताचे व्यवस्थापन करू शकतो.स्थावर व जंगम असे मालमत्तेचे दोन प्रकार यासाठी उपयोगी पडतात.एक किवां एकापेक्षा अनेक घरे शेतीवाडी करून आपण स्थावर गुंतवणूक करू शकतो.मुचुअल फंडातील गुंतवणूक हल्ली गुंतवणूकदारांना आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित करते आहे.योग्य ती काळजी घेतल्यास ही गुंतवणुकीची पद्धत आदर्श ठरू शकते. बरेचसे लोक निर्देशांक उच्च पातळीवर असतांना गुंतवणूक करू इच्छितात;तर ही पातळी खालावल्यावर गुंतवणूक मोडू इच्छितात.शेअर मार्केट च्या स्थितीनुसार आपले नुकसान कमीत कमी व्हावे हा आपला त्यामुळे साध्य होत नाही.एखाद्या वेळेस असा अनुभव आल्यास पुढच्या वेळेपासून अधिक जवाबदारीने वागावे.ज्या फंडाची नेट असेट net asset value(NAV) जास्त तो फंड महागडा अशी बऱ्याच जणांची समज असते.हे मात्र खरे नाही.कारण , कमी NAV असणाऱ्या फंडाचे मूल्यही शेअर मार्केटच्या स्थितीनुसार कमी-जास्त होत असते. शेअर मार्केटच्या जोखीमेनुसार गुंतवणूकदारांना जोखीमेचा सामना करावा लागेल असा इशारा प्रत्येक फंडातून जाहिर केलेला असतो. म्हणजेच आपली धारणा किवां अंतप्रेरणा यावर फारसे विसंबून न राहता फंडातील दस्तांचे तपशीलवार वाचन केल्यास संभाव्य अपेशाभंग टाळू शकेल.या विषयातील तज्ञ सल्लागाराचा सल्लाही घेऊ शकतात,पण आधी त्याची पडताळणी करायला हवी.नाहीतर परिस्थीती अधिक बिघडण्याची शक्यता असते. ज्या मुचुअल फंडात आपण गुंतवणूक करू इच्छीतो,त्याच्यापासून भविष्यात कोणते फायदे मिळणार याची खातरजमा आधीच केलेली बरी.एखाद्या घरातल्या वस्तूची खरेदी करतानाही आपण चारचौघांशी बोलून,खात्री पटल्यावर खरेदी करतो.तर गुंतवणूक म्हणजे अतिशय महत्वाची बाब.त्यामुळे आपल्या गरजा,हेतू आणि उपलब्ध निधी याला अनुसरून मुचुअल फंडाची निवड करावी.काही गुंतवणूक योजनांमधून खूप मोठ्या लाभाचे आमिष दाखविले जाते.ही गोष्ट विसरू नये. कोणत्याही खेळात हारजीत असते.प्रत्येक सामन्यात विजय मिळण्याची खात्री नसते.पण धीराने खेळत, अनुभव गोळा करत राहिल्यास भविष्यातील विजयाची शक्यता निश्चित वाढते.त्यामुळे कमी वेळात अधिक लाभ देणाऱ्या मुचुअल फंडापेक्षा दीर्घकालीन मुचुअल फंडाची निवड करणे अधिक योग्य ठरू शकते.

Leave a Comment