भवाई

भवाई हा गुजरातमधील लोकनाटय प्रकार आहे. सतराव्या, अठराव्या शतकात गुजरातमध्ये षक्ती संप्रदायाचा प्रभाव होता. कालीमातेच्या नऊ तीर्थ क्षेत्रांपैकी तीन क्षेत्रे गुजरातमध्ये आहेत. पावागढ येथे महाकालीचे तीर्थक्षेत्र आहे. तर उत्तर गुजरातमध्ये बहुचरी तसेच अरासूरमध्ये अंबामातेचे तीर्थक्षेत्र आहे. भवाई हा प्रकार नवरात्रीत सादर केला जातो. अंबामातेसमोर सादर होणार्‍या या लोककला प्रकाराला धार्मिक अधिष्ठान आहे. ‘भव` शब्दाला अनेक अर्थच्छरा आहेत. ‘भव` म्हणजे भावना आणि ‘वाही` म्हणजे भावनांचे वहन करणारी बाब. ‘भवाई` चा दुसरा एक अर्थ म्हणजे जीवनचक्र भावनांचा आविष्कार भवाईच्या कलाकारांचा असा समज आहे की जेव्हा आम्ही रंगमंचावर येतो तेव्हा शक्तीदेवता आम्हाला प्रसन्न होते. शक्तीदेवता आमच्या मुखावर असते तर सरस्वती आमच्या जिभेवर असते. ‘भवाई` या कलाप्रकाराचा प्रारंभ पंधराव्या शतकाच्या पूर्वाधात झाला. असाईता ठाकर यांनी भवाईला जन्म दिला. सिधपूर शहरातील मंदिरात असाईता ठाकर यांनी भवाईच्या संहितेचे वाचन केले असाईता ठाकराने एका शेतकर्‍याच्या मुलीची मुस्लिम पुढार्‍याच्या तावडीतून सुटका केली. आपल्या गाण्याने त्या मुस्लिम पुढार्‍याला खुश केले व गंगा नावाच्या मुलीची सुटका केली त्यासाठी आपले ब्राम्हण बाटविले, पणाला लावले. असाईताला त्याच्या जातीने वाळित टाकले पुढे त्याच्या पुत्रांचे राम लाल, रतन लाल, मदन लाल या तीन घराण्यांची परंपरा निर्माण झाली. असाईता हा गायक आणि कवी होता. त्याने ३६० वेश प्रसंग रचले. ‘वेश` म्हणजे ‘वेश परिधान करणे`, ‘मुखवटे चढविणे` अथवा ‘प्रसंग` असे होय. असाईता नंतर अनेकांनी वेश म्हणजे प्रसंग लिहले पण ते केवळ अनुकरण होते.

भवाईच्या पथकांद्वारे आतापर्यंत सुमारे ५०० प्रसंगाचे म्हणजेच वेशांचे सादरीकरण झाले. असाईताच्या वेशांपैकी ‘जूठन मियाँ` हा वेश अतिषय लोकप्रिय आहे. जूठन मियाँ मध्ये नायक राजा वेशांतर करतो. आणि बेमालूम थापा मारतो. ‘कजोरा` नावाचा दुसरा एक वेश आहे त्यात एक गले लठ्ठ बाई एका मुलाशी लग्न करते आणि त्यातून विनोद निर्मिती होते. ‘मोहना बटाव` ही कथा देखील भवाईत सादर होते. ‘अंबा` म्हणजेच शक्तीदेवतेवर अगाध श्रध्दा असली तरी भवाई हा धर्मनिरपेक्ष कला प्रकार आहे. ‘नाईक` हा भवाईचा दिग्दर्षक असतो. भवाईतले विनोद, गीत, नृत्य, संवाद यांचा संबंध दैनंदिन जीवनाषी असतो. रंगभूशा, वेषभूशेनंतर नाईक दहा फूटाच्या व्यासाचे गोल रिंगण आपल्या तलवारीच्या पात्याने तयार करतो व रिंगणाला रंगमंच समजून भवाईचा खेळ सुरू होतो. पाच भक्तीपर गीते भवाई कलावंत सादर करतात. नंतर नाईक शक्तीदेवतेला आवाहन करतो व तिच्याकडून आशिर्वाद घेतो. पखवाज, नगारा, सारंगी, मंजिरी, भुंगल म्हणजेच रणशिंग सदृष्य वाद्य अशी वाद्ये भवाईत वाजविली जातात. भुंगल हे वाद्य एखाद्या दुर्बिणी सारखे दिसते. भुंगल हे वाद्य भवाई सादर होताना प्रारंभी वाजविले जाते त्यावेळी अन्य कोणतेही वाद्य वाजविले जात नाही. कारण अंबामातेच्या अवतरणाचा संकेत या वाद्याच्या रूपाने दिला जातो. भवाईची सर्व पात्रे प्रेक्षकांमधून प्रवेश करतात. प्रारंभी गणेशाचे आगमन होते. गणेशाचा मुखवटा घातलेल्या कलाकाराच्या निर्गमनानंतर गावाचा न्हावी येतो आणि तो कापसाची सरकी पेटत्या पलित्यावर फेकून ते पलिते अधिक प्रज्वलित करतो. भवाईतील प्रत्येक वेश म्हणजेच प्रसंग अथवा नाटूकली तीन-चार तास चालतात. गवाई कलावंतांचा संच हा साधारण १४ कलावंतांचा असतो. नायक, नायिका, सहनायक, सहगायिका, विदूषक सदृष्य पात्र रंगले, त्याची पत्नी ‘रंगली` भवाईत स्त्रिया काम करीत नाहीत. सर्व पात्रे पुरूषच करतात. जय षंकर भोजक सुंदरी, मूलचंद्र वलभ, ललाबाई छोकरी, प्राणसूखमर्ण लाल नाईक आदी पुरूष कलावंत हे संपूर्ण गुजरातमध्ये उत्तम स्त्री पात्र वठविणारे कलावंत म्हणून ओळखले जातात. भवाई मधील काही प्रमुख वेश म्हणजे प्रसंग अथवा नाटुकली खूप लोकप्रिय आहे. त्यातील एक म्हणजे जूथान मियाँ। जूथान हा मुस्लिम आणि त्याला दोन हिंदू बायका असतात. त्यांची नावे चटकी आणि मटकी दोन्ही बायका त्याच्या थटटा करतात. पण जूथान सतत धाडसी प्रयोग करीत असते. जूथान बोरवाराचा वेश पालटून आलेला राजा असतो. आणि तो सत्याच्या शोत निघालेला असतो. गझनीवर आक्रमण करण्यासाठी एकदा तो मोठे सैन्य घेऊन निघतो.एक उंट मोठे सामान घेऊन जात असता तो उंट मृत्यू पावतो. त्या रस्त्याने निघालेला राजा संतापतो. आपल्या बहुमूल्य वेळ दवडल्या बद्दल तो सर्वांची हजेरी घेतो. उंटाचा आत्मा आणि कुडी त्याला सोडून गेल्याचे राजाचा महामंत्री त्याला सांगतो. राजाचे मन पालटतो. उंटासारखे आपणही एकना एक दिवस जाणार अशी उपरती राजाला झाली तो. राज्यकारभार सोडून सत्याच्या शोधात बाहेर पडतो. भारतात आल्यावर तो राजा बदलून अनेक असत्य गोश्टी सांगतो. असत्याच्या मुखवटयातून राजा सत्याचा षोध घेतो अषी कथा भवाईत सादर होते. भवाईतील प्रत्येक कलावंत त्यांची स्वत:ची रंगभूशा करतो. सफेद, लाल आणि काळया रंगाचा वापर रंगभूशेत केला जातो. गणपती, अर्धनारीनेटेश्वर, राम-लक्ष्मण-तारका अशा दैवी कथा फार कमी प्रमाणात भवाईत सादर होतात. जस्मा-ओडन, षुरो राथौड, रामदेव आणि जयसिंह अषा ऐतिहासिक कथा भवाईत सादर होतात. त्रिगला समाज हा असाईत ठाकर यांचा समाज भवाईची परंपरा आजही टिकवून आहे.

  • डॉ.प्रकाश खांडगे
  • सौजन्य महान्यूज

    Leave a Comment