बँकिंग

बँका म्हणजे व्यक्तिगत आणि सामुदायिक वित्ताची काळजी घेणाऱ्या संस्था परकीय चलनाची देवाण घेवाण , गुंतवणूक व विमासंबंधीत माहिती देणे घेणे , विश्वस्त म्हणून काम पाहणे अशा विविध सेवाही त्यातून पुरविल्या जातात . बँकिंग अभ्यासक्रमातून लोकांना संसाधन व्यवस्थापन योजना बनविणे , मनुष्य – व्यवस्थापन , वित्तऊभारणी , व्यवहार , कर्ज व नफा उत्पादनाची हाताळणी यांचे प्रशिक्षण दिले जाते .

माहिती तंत्रज्ञानाच्या बोलबाला झाल्या नंतर बँकिंग उद्योगाला नवीन आयाम लाभला. ग्राहकाला अधिक कार्यक्षम सेवा देण्यासाठी बँकांच्या व्यवहारांचे संगणकीकरण झाले दिवसाचे चोवीस तास रोख रक्कम काढण्यासाठी किंवा चेकद्वारे ठेवी ठेवण्यासाठी बहुतेक बँका ए.टी.एम कार्ड वापरण्याची सुविधा पुरवत आहेत . ग्राहकांना त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी प्रत्येक बँक क्रेडीट कार्डची सुविधाही पुरवीत आहे . इंटरनेटचे मोठे प्राबल्य निर्माण झाल्यावर बँका एवढ्यावरच न थांबता ग्राहकांना ऑन लाईन माहितीही देवू लागल्या . काही बँका गृह सेवाही देतात , ज्यात बँकेचे प्रतिनिधी ग्राहकाचे खाते उघडण्यासाठी ग्राहकांच्या घरी भेट देतात .

नाविन्यपूर्ण आणि ग्राहकाभिमुख योजनांसह येण्यासाठी बँकिंग विभागात प्रचंड स्पर्धा आहे .बहुतांश बँकांनी त्यांच्या शाखा संगणकजाळाच्या माध्यमातून जोडल्या आहेत . बँकिंग क्षेत्रात परिवर्तन घडविण्यात मोठा वाटा उचलणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापार व औदोयागिकरानातील उदारीकरणामुळे बँकिंग विभागात अधिक अधिक सुधारणा करण्याची गरज वाढते आहे या सर्वांमुळे बँकिंग मधील रोजगाराच्या संधी मध्ये वाढ झाली आणि आर्थिक पार्श्वभूमीऐवजी विपणनाचे आणि तांत्रिक कौशल्य असणाऱ्या लोकांची गरज वाढली. 

* शैक्षणिक मार्गदर्शन *

शैक्षणिक तपशील व पात्रता :- बँकिंग मधील अभ्यासक्रम करण्यासाठी कोणतीही पदवी पूर्ण करण्याची आवशकता आहे. विशेष अभ्यासक्रम शिकण्यासाठी कॉमर्स पदवीधारकांना, बँकिंग व वित्त कार्यकारीना आणि चार्टर्ड accountant प्राधान्य देण्यात येते. बँकिंग कौर्स मध्ये पुढील विषय शिकविले जातात. आंतरराष्ट्रीय वित्त पुरवठा, धोरणांची योजना, माहितीतंत्र ज्ञान , व्यवहार व्यवस्थापन, सुश्म व विकसित वित्त पुरवठा, विपणन, मानव संसाधन व्यवस्थापन.

शिषणक्रमाचा कालावधी – बँकेत उमेदवाराची भरती दोन स्तरावर केली जाते. कारकून व अधिकारी – राष्ट्रीय कृत व अंतरराष्ट्रीय बँकांमध्ये निवडीची पद्धत वेगळी असते. रिजर्व बँक ऑफ इंडिया ( RB I ) ची निवड प्रक्रिया – RB I हि भारतातील सर्व्वोच वीत्तिय संस्था असून ती ईतर सर्व बँकांसाठी धोरणे व नियम बनविते . हि बँक तीन प्रकारच्या स्तरावरील स्थानांसाठी परीक्षा आयोजित करते . कारकून स्तर , ए श्रेणी अधिकारी ,बी श्रेणी अधिकारी . कारकून कर्मचाऱ्यांचा प्रवेशबिंदू म्हणजे रोकड विभागातील नाण्यांचे व नोटांचे परीक्षक .५-१० वर्षांच्या सेवेनंतर सबंधित परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यावर त्यांना पुढच्या श्रेणीत बढती दिली जाते . प्रथम वर्गीय पदांसाठी आखिल भारतीय स्तरावर परीक्षा घेतली जाते . २१-२६ या वयो गटातील पदवीधारक , पदव्युत्तर , पदवीधारक , सी.ए . एम बीए. झालेले उमेदवार या साठी पात्र ठरतात .तर्कसंगत , युक्तिवाद , मानसिक क्षमता , संख्याकिक कल आणि सामान्य इंग्रजी या वरून उमेदवारांची परीक्षा घेण्यात येते .हि परीक्षा विभागून घेण्यात येते .

Leave a Comment