कुस्तीसाठी जगणं – नरसिंग यादव

महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेले, वाढलेले हे विजेते आपल्या गाव नगरांचा अभिमान, राज्याची मान आणि देशाची शान जगात उंचावतायत. जोगेश्वरीत जन्मलेला आणि वयाच्या ११ व्या वर्षांपासून कांदीवलीतील साई अर्थात स्पोर्ट ऍथॉरीटी ऑफ इंडियाच्या स्पोर्ट ट्रेनिंग सेंटरमध्ये वाढलेला नरसिंग यादव. कुस्तीचे डाव त्यानं तिथंच गिरवले. वयाच्या दहा वर्षांपासून येथील प्रशिक्षक, कर्मचारी हेच सहकारी अन खेळाडू. त्याचं फक्त कुस्तीसाठी जगणं. मुंबई या महानगरातील एकमेव राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता नरसिंग यादव यांच्याशी किरण वाघ यांनी केलेली ही बातचित.

प्रश्न-कुस्तीची आवड कधी पासून निर्माण झाली?
उत्तर- पंचम यादव ३५ वर्षांपूर्वी मुंबईच्या जोगेश्वरी भागात स्थायिक झाले. वडीलांना कुस्तीची आवड असल्याने लहानशा नरसिंगला घेऊन कुस्तीच्या आखाडय़ात जायचे. तेव्हापासून नरसिंगच्या मनात कुस्तीने स्थान मिळवले. वडीलांची आकांक्षा पूर्ण केली आहे.

मुंबईत आल्यानंतर परिस्थितीमुळे वडीलांनी स्पोर्ट पोर्ट ऍर्थारीटीशं् ऑफ इंडियाच्या कांदिवली येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी दाखल केले. प्रशिक्षक जगमालसिंग यांनी गुण ओळखून एक यशस्वी कुस्तीगीर म्हणून घडवले.
कठोर मेहनत आणि खेळातील प्रशिक्षण देत घडवण्याचे काम जगमालसिंग यांनी प्रयत्नपूर्वक केले. या प्रयत्नांना आज झळाळणारं सुवर्ण यश प्राप्त झालंय.

प्रश्न – यापुर्वी कोण कोणत्या स्पर्धा जिंकल्या आहेत?
उत्तर- यशाची चव खरं तर पूर्वीच चाखलीय, आपलं कुस्तीतले कौशल्य जागतिक किर्तीच्या पैहलवानांना पाणी पाजणारे आहे हे सिध्द केले.
जिद्द आणि गुण यामुळे वयाच्या १७ व्या वर्षीच ज्युनिअर ऐवजी सिनिअर्स मध्ये खेळवण्याचा निर्णय प्रशिक्षकांनी घेतला. त्यांन् टाकलेला विश्वास सार्थ ठरवत कॅनडात झालेल्या कॉमनवेल्थ रेसलिंग चॉम्पिअनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशाची पताका फडकावत ठेवताना २००५ साली जपानमध्ये कांस्य पदक, २००९ कॉमनवेल्थ रेसलिंग चॉम्पिअनशिपमध्ये सुवर्णपदक, रशियातील बेलासस येथील वर्ल्ड रेसलिंग चॅम्पीअनशीप २०१० मध्ये रौप्यपदक प्राप्त केलंय. आजपर्यंत सहभागी झालेल्या आठ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोन सुवर्ण तीन रौप्य एक कास्य पदक मिळवलेय.

तर याचबरोबर ७ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तीन सुवण,व तीन रौप्य आणि दोन कास्य पदक माझ्या खात्यात जमा केली आहेत.

प्रश्न- पुढील ध्येय काय आहेत?
उत्तर- पुढील महिन्यात चीनमध्ये होणार्‍या आशियाई क्रीडा स्पर्धात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ऑलिम्पिक विजेता सुशीलकुमारने आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे कुस्तीतील पदकांसाठी भारतीयांच्या अपेक्षांचे उत्तरदायित्व माझ्याकडे येतेय.

पुढे येणार्‍या ऑलिंम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकताना खशाबा जाधव नंतर महाराष्ट्रासाठी अनमोल असं ऑलिंम्पिक पदकं जिंकून देण्याची किमया साधू शकेल, अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही.

प्रश्न- सरावासाठी किती वेळ देतो अन तुझ्या खेळाचे काय वैशिष्टय आहे?
उत्तर- मुंबईतील संकुलात असलो की सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ४.३० ते ७.३० कुस्तीच्या हॉलमध्ये सराव, टेक्नीक, व्यायाम यामध्येच गुंतून राहतो. संकुलात खेळाडूंसाठी असलेल्या वसतीगृहातील त्याच्या खोलीत साधेपणाने त्याचा वावर सुरु असतो. सर्वसामान्य कुटुंबातील गुणवान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने सूरु केलेल्या या संकुलात राहून सामान्य परिस्थितीशी झगडत हे घवघवीत यश संपादन करतांना आनंद होतो .

कुस्तीच्या मॅटवर प्रतिस्पर्ध्याला चित करताना दुहेरीपट काढण्यात तरबेज असून आपल्या प्रतिस्पर्ध्यावर हुकमत गाजवत लिलया आस्मान दाखवणे आणि विजयश्री खेचून आणणे हे माझ्या खेळाचे वैशिष्टय आहे असेही तो आर्वजून नमूद करतो.

 

सौजन्य- महाबात्म्या

Leave a Comment