कठोर परिश्रम यशाचा राजमार्ग – ममता प्रभु

दिल्लीत नुकताच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१० मध्ये भारताने ३८ सुवर्णपदकांसह १०१ पदकांसह घसघशीत कमाई करीत द्वितीय स्थानावर झेप घेतली. या विक्रमी कामगिरीमुळे सांगता समारंभात तिरंगा डौलाने फडकत होता.यामध्येच सहभाग आहे ठाणे येथील ममता प्रभूचा.या विजयाबाबत जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर मुराळकर यांनी तिच्याशी केलेली ही बातचीत.

खेळाबरोबरच तु तुझे शिक्षण कसे पुर्ण केले याबाबत ममता सांगते की, ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून मुलूंडच्या एमसीसी कॉलेजातून २००३-०४ मध्ये बी कॉम पूर्ण केले.त्यानंतर वेलिंगकर इंन्सिटयुटमधून एक्सपोर्ट इम्पोर्ट या विषयात एमबीए केल आहे. हे सारे करत असतांना माझा टेबल टेनिसचा सरावही नियमितपणे सुरू होता.

वयाच्या दहाव्या वर्षी टेबल टेनिसची बॅट हाती घेतलेल्या ममताने गेल्या १७ वर्षाच्या कारकीर्दीत आपल्या यशाचा आलेख सतत उंचावत नेला आहे.या बाबत माहिती देतांना सांगितले की सबज्युनिअर, ज्युनिअर, विद्यापीठ राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा एका पाठोपाठ एक असंख्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. सलग सहा वेळा राज्य अजिंक्यपद पटकावणारी मी देशातील एकमेव टेबलटेनिसपटू आहे.
२६ मार्च २००४ साली पाकिस्तान सेफ गेम्समध्ये गोल्ड मेडल, २००४ साली मलेशियात कॉमनवेल्थ चॉम्पियनशिपमध्ये महिला संघात ब्राँस मेडल, २००९ साली बांगला देशात साऊथ अशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल तर आता २०१० साली नवी दिल्लीत कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्वर मेडल पटकावले आहे. रशियात पार पडलेल्या वर्ल्ड रेल्वे चॉम्पियनशिपमध्ये एकेरी ,दुहेरी व मिश्र दुहेरी अशा तीनही प्रकारात रौप्यपदक जिंकले आहे. टेबल टेनिस खेळातील या कामगिरी बद्दल महाराष्ट्र शासनाने २००५ चा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरव ही केलेला आहे.

जेव्हा मला महाराष्ट्र शासनाचा २००५ चा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला तेव्हा मला ख-या अर्थाने शाबासकी मिळाली अन उत्साहही वाढल्याचे ममताने आर्वजून सांगितले.प्रारंभी मी सेंट्रल रेल्वेच्या क्लरिकल स्टॉफ स्पोर्ट डिपार्टमेंट मध्ये २००१ ते २००७ पर्यंत नोकरी के ले. खेळातले कर्तृत्व आणि शिक्षणातील गुणवत्ता पारखून देना बँकेने मार्केटींग ऑफीसर म्हणून आपल्या बँकेत सेवेत सामावून घेतले आहे.

शासनाकडून काय अपेक्षा आहेत असे विचारले असता शासन स्तरावर खेळाडूंसाठी ज्या सुविधा देऊ केल्या जातात, त्या कायमस्वरुपी सुरु रहाव्यात. खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी शासनाने खेळाडूंसाठी राज्य अथवा राष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षक नेमावेत. जेणेकरुन त्यांना चांगले प्रशिक्षण मिळेल व अधिकाधिक कसदार खेळाडू तयार होतील असे सांगितले.

नवोदित खेळाडूंना काय सल्ला देणार पण एक महत्वाची टिप देईन की सरावात सातत्य ठेवा. अपयशाला खचून न जाता जिद्दीने वाटचाल करा. प्रशिक्षकांच्या सूचनांचे काटेकोर पालन करा. ध्येय पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा, मग यश तुमचेच

Leave a Comment