ऑलिम्पिंक हेच उद्दीष्ट – मधुरिका पाटकर

अथक परीश्रम आणि जिद्दीच्या बळावर राष्ट्रकुल क्रिडास्पर्धेत रौप्यपदक पटकावणारी मधुरिका पाटकर आणि ममता प्रभू. सुवर्णपदक थोडक्यात निसटले हे शल्य मनात असलेतरी फारशा न खचता त्या नव्या दमाने तयारीला लागल्या आहेत. आता ऑलिम्पिंक हेच उद्दीष्ट असल्याचे मधुरिका पाटकरने स्पष्ट केले. प्रभाकर मुराळकर जिल्हा माहिती अधिकारी ठाणे यांनी महान्यूजसाठी मधुरिकाची मुलाखत घेतली. राष्ट्रकुलच्या एकूणच रोमहर्षक वाटचालीची माहिती तिने यावेळी दिली.

 

प्रश्न- या खेळाची आवड कधी निर्माण झाली?

उत्तर-लहानपणापासूनच या खेळाची आवड होती. गेली १७ वर्षे शैलजा गोहाड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. मुलूंडच्या एमसीसी कॉलेजमधून बी कॉम पदवी घेतली आहे. सध्या एम कॉम करीत असून वेलिंगकर इन्स्टिटयुटमधून हयुमन रिसोर्स या विषयातला डिप्लोमा केल्यानंतर आज ओएनजीसीत फायनान्स ऑफीसर म्हणून नोकरी करीत आहे.

प्रश्न- साऊथ अशियन गेम्समध्ये विक्रम करणारी भारतातील एकमेव खेळाडू आहे , याबरोबरच आणखी कोणते विक्रम तुझ्या नावावर आहे?

उत्तर- टेबल टेनिसच्या विविध स्पर्धामध्ये शंभरहून अधिक पदके पटकाविली आहेत. बांगला देशातील ढाका येथे नुकत्याच पार पडलेल्या साऊथ अशियन गेम्समध्ये वैयक्तिक ,सांघिक, दुहेरी व मिश्र दुहेरी या चार ही क्रिडा प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केलेली आहे. असा विक्रम करणारी भारतातील मी एकमेव खेळाडू ठरली आहे. मॉस्कोत पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेतच्या आठ पैकी आठ मॅच जिंकल्या होत्या. त्यामुळे टेबल टेनिसमधने इंटनॅशनल रँकींग ३०० वरून थेट २१९ वर पोहचले आहे.

प्रश्न- कॉमनवेल्थमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी काय तयारी केली?

उत्तर – कॉमनवेल्थमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी सातत्यपूर्व खेळ करत होते . गेल्या दीड वर्षापासून आमची टीम कठोर परिश्रम घेत होती. स्पेशल ट्रेनिंगसाठी चीनलाही पाठविण्यात आलं होत. कॉमनवेल्थ मधील या यशामुळे टेबल टेनिस संघाचा व माझा आत्मविश्वास वाढला आहे. टेबल टेनिसला चालना मिळेल ऑलंम्पिकमध्ये भारतासाठी पदक मिळविणं हे आता आमचं स्वप्न असून त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा विश्वासही व्यक्त केला.

सौजन्य- महाबात्म्या


Leave a Comment