देशातील पहिले टॉयलेट कॉलेज म्हणून ओळख असणाऱ्या ‘हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेज’ने मागील एक वर्षात 3200 स्वच्छता कर्माचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. आता प्रशिक्षणानंतर त्यांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे असलेल्या या कॉलेजमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांची कार्यकुशलता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कार्यासंबंधी असलेला धोक्याबद्दल जागृक करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. ऑगस्ट 2018 मध्ये स्थापन करण्यात आलेले […]
स्वच्छता
जीभेवरील पांढरा थर दूर करण्याकरिता आजमावा हे उपाय
एखाद्या आजाराचे निमित्त होऊन डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्यावर डॉक्टर सर्वात आधी डोळे आणि जीभ पाहतात. जीभ पाहण्यामागे काही विशिष्ट कारण असते. आपली जीभ आपल्या आरोग्याचा आरसा म्हणता येऊ शकेल. आपल्या शरीराचे पचनतंत्र आणि लिव्हर व्यवस्थित काम करीत आहे किंवा नाही याचे सूचक आपली जीभ असते. अनेकदा आपल्या जिभेवर पांढरा, पिवळसर किंवा भुरकट रंगाचा थर दिसून येतो. […]
video ; या कावळ्याकडून घ्या स्वच्छतेचे धडे
सोशल मीडियावर सध्या एका कावळ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून तुम्हीही विचारात पडाल. हा कावळा किती समजुतदारपणे प्लॅस्टिकची बॉटल कचऱ्याच्या कुंडीत टाकत आहे. आजही अनेक लोक कचरा डस्टबिनमध्ये टाकण्याच्या ऐवजी कुठेही रस्त्यावर टाकून देतात. अनेक ठिकाणी कचऱ्यांचा ढिग जमा होतो. त्यातच आता हा कावळ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. If they can,We all can👍🏻 […]
या आयएएस अधिकाऱ्याची न्यारीच कथा
स्वच्छता ही सर्वाना हवीहवीशी वाटते फक्त ती दुसरा कुणी करत असेल तर. घर, ऑफिस सगळीकडे लोकांची हीच मनोवृत्ती दिसून येते. मात्र याला छेद दिला आहे डॉ. अजयशंकर पांडे या आयएएस अधिकाऱ्याने. अजयशंकर पांडे दररोज कार्यालयात दहा मिनिटे अगोदर येऊन स्वतःची केबिन झाडूनपुसून स्वच्छ करतात. द बेटर इंडियाशी बोलताना त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे. याची […]
स्वच्छता विक्रमासाठी गिनीज बुक नोंद करणार प्रयागराज कुंभ
येत्या १५ जानेवारी पासून सुरु होत असलेल्या जागतिक कीर्तीचा कुंभमेळा स्वच्छतेचे रेकॉर्ड गिनीज बुकमध्ये नोंदविण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठी तसा अर्ज केला गेला आहे. ३ मार्च पर्यंत सुरु राहणाऱ्या या मेळ्यात देशविदेशातून १२ ते १५ कोटी लोक उपस्थित राहतील असा अंदाज असून कुंभमेळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. उत्तरप्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थनाथ सिंह या संदर्भात […]
जोधपूर रेल्वे स्थानक देशात हे सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानक
नवी दिल्ली – केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देशातील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतेसंर्दभातला तिसरा सर्वेक्षण अहवाल जाहीर केला असून हा अहवाल भारतीय स्वच्छता परिषदने (क्यूसीआय) तयार केला आहे. जोधपूर रेल्वे स्थानक हे यात सर्वात स्वच्छ स्थानक म्हणून देशात अव्वल स्थानी आहे. या अहवालानुसार देशात स्वच्छतेच्या बाबतीत उत्तर-पश्चिम रेल्वे ही अव्वल आहे. त्याचबरोबर या अहवालात जोधपूर रेल्वे […]
स्वच्छता भांड्यांची
वर्षानुवर्ष आपली भांडी चांगली रहावी असे वाटत असल्यास त्याची योग्य स्वच्छता आणि योग्य निगा फारच महत्त्वाची आहे. रोजच्या स्वयंपाकाला लागणारी भांडी असो किंवा काचेची भांडी असोत. भांड्यांची स्वच्छता हे एक महत्त्वाचे काम आहे. क्रॉकरीची काळजी – रोज न वापरली जाणारी काचेची भांडी वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळू ठेवा. त्यामुळे भांड्यावर ओरखडे येणार नाहीत किंवा डागही पडणार नाही. […]
अॅल्युमिनियम फॉईलचा असाही करा वापर
आजकाल विविध पदार्थ गरम राहावेत म्हणून अॅल्युमिनियम फॉईलमध्ये ते पदार्थ गुंडाळून ठेवले जातात हे आपण सर्रास पाहतो. घरातून सकाळच्या वेळी बाहेर पडताना घेतलेल्या डब्यातील पोळ्या, पराठे, पुर्यांसारखे पदार्थ या फॉईलमध्ये गुंडाळून नेले तर बराच काळ गरम राहतात. हॉटेलमध्येही अनेक पदार्थ पॅक करून घेतले तर त्यासाठी ही फॉईल वापरली जाते. अनेकदा ओव्हन मध्ये अथवा मायक्रोव्हेव मध्ये […]
कार्यालयातील स्वच्छतागृहामुळे काँग्रेस होतेय पराभूत
मध्य प्रदेश राज्यात गेल्या 14 वर्षांत काँग्रेस पक्षाचा सातत्याने पराभव होतोय. मात्र यासाठी पक्षाची यंत्रणा कारणीभूत नसून पक्ष कार्यालयातील स्वच्छतागृह कारणीभूत आहे, असे अजब मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. भोपाळ येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयात तिसऱ्या मजल्यावर हे स्वच्छतागृह आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एका वास्तूतज्ञाला इमारतीचे सर्वेक्षण करण्यास बोलावले होते. त्याने दिलेल्या सल्ल्यानुसार हे स्वच्छतागृह पूर्वाभिमुख असून […]
सूर्यप्रकाशाने आपोआप स्वच्छ होणार कपडे
ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठीतील संशोधकांनी उन्हात अथवा बल्बसमोर मळलेले कपडे धरले असता ते आपोआप स्वच्छ होतील असे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. संशोधकांच्या या टीममध्ये भारतीय वंशाचे राजेश रामनाथन यांचाही समावेश आहे. या संशोधकांनी कपडे स्वच्छ करण्यासाठी नॅनो स्ट्रक्चर तयार करण्याची विशिष्ठ पद्धत विकसित केली आहे. रामनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार चांदी व तांब्याचा वापर करून नॅनो […]
आता नियमित धुतले जाणार रेल्वेतील अंथरूण-पांघरूण
नवी दिल्ली : यापूर्वी रेल्वेतील अंथरूण-पाघंरूण महिन्यातून एक किंवा दोनवेळा धुतले जात होते. परंतु रेल्वेने आता स्वच्छतेची काळजी घेण्याचे ठरविले असून, आता प्रवास संपल्याबरोबरच नियमित धुवून स्वच्छता पाळली जाणार आहे. त्यामुळे रेल्वेत अंथरूण-पांघरून आता एकदम चकाचक पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे सध्या रेल्वेत जाडे-भरडे अंथरूण-पांघरूणाची व्यवस्था आहे. परंतु यापुढे नरम कपड्यांनी बनविलेल्या नव्या डिझाईनच्या हलक्या […]
स्वच्छतेची ग्वाही देणाऱ्या ‘प्रभूं’ची गचाळ रेल्वे
नवी दिल्ली: रेल्वेमध्ये स्वच्छतेची ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली असली तरीही गाड्यांमधील प्रवाशांना दिली जाणारी ब्लँकेट्स दोन-दोन महिने धुतली जात नसल्याची माहिती देऊन रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनीच रेल्वेचा गचाळपणा उघड केला आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये देण्यात येणारी बेडशीट्स आणि उशांचे अभ्रे मात्र रोज धुतले जातात; अशी माहिती सिन्हा त्यांनी संसदेत बोलताना दिली. रेल्वे […]
जपानची बुलेट ट्रेन ७ मिनिटांत होते स्वच्छ
उत्तम टाईम मॅनेजमेंटचे उदाहरण पाहायचे असेल तर जपानच्या टेसेई या बुलेट ट्रेन साफ करण्याचे काम करणार्या कंपनीच्या कर्मचार्यांच्याकडे पाहावे लागेल. जपान जगात अनेकविध आश्चर्यकारक गोष्टींमुळे जसा प्रसिद्ध आहे तसाच तो तेथील हायस्पीड रेल्वे नेटवर्कमुळेही प्रसिद्ध आहे. येथील सर्वाधिक वेगाची बुलेटट्रेन शिन्कासेन हिचा वेग आहे तासाला २५० किमी. ही गाडी कधीही पाहिली तरी स्वच्छ, साफ सुथरीच […]
मंत्रालय स्वच्छता अभियानात कर्मचाऱ्यांचा पिट्टा
दिल्ली – केंद्रीय मंत्रालयांची कार्यालये साफसुथरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली १५ दिवसांची मुदत संपण्याअगोदर हे अभियान पूर्ण करण्यासाठी वरीष्ठ अधिकार्यांसह कर्मचार्यांचा कामाखाली अक्षरशः पिट्टा पडत असल्याचे दिसून येत आहे. एकट्या गृहमंत्रालयातच ९४ हजार फायली, ५० लोखंडी कपाटे आवरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून मंत्रायातील कार्यालयांच्या भिंतींवर झालेली पानांच्या पिचकार्यांची रंगरंगोटी, चहाचे रिकामे प्लॅस्टीक कप, पाण्याच्या […]