आपण महागड्या ब्रँडचे घड्याळ बघितले असेल आणि वापरत देखील असाल. मात्र वरील चित्रात हे घड्याळ अनोखे आहे. हे जगातील सर्वात मोठे घड्याळ आहे. हे घड्याळ एका विद्यार्थ्याने बनवले असून याची चर्चा सर्वत्र होत आहे. आगरा येथील दयालबाग शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्या संपन्न सक्सेना याने 67 इंचाचे घड्याळ बनवले आहे. संपन्नने असा दावा केला आहे की, हे जगातील सर्वात मोठे घड्याळ आहे. यापूर्वी 57-इंचाचे घड्याळ बनविण्यात आला […]
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड
एका मुस्लिम मूर्तिकाराने साकारली जगातील सर्वांत उंच दुर्गामातेची मूर्ती
जगातील सर्वाधिक उंच दुर्गा मातेची मूर्ती साकारण्याचा विक्रम एका मुस्लिम मूर्तिकाराने केला आहे. त्यांचे नाव नुरुद्दीन अहमद असे असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. कलाकाराला कोणताही धर्म नसतो, असे सांगत उच्च कोटीचा सामाजिक संदेशही एका हिंदू देवतेची मूर्ती साकारणाऱ्या या मुस्लिम कलाकाराने दिला आहे. गुवाहाटीचे काहिलीपाडा भागातील अहमद हे […]
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मुरबाडमधील आजीबाईंच्या शाळेची नोंद
मुरबाडजवळील नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेल्या फांगणे गावातील ग्रामस्थांनी गावातील साठीनंतरच्या पिढीला शिक्षित करण्याचा संकल्प केला असून राष्ट्रीयच नाही तर आंतराष्ट्रीय पातळीवरदेखील दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या प्रयत्नांची दखल घेतली गेली. या शाळेबद्दल अनेकांना कुतूहल निर्माण झाले तर ग्रामस्थांच्या प्रयत्नांचे काहींनी कौतुक देखील केले. आता लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ६० हून अधिक वय असलेल्या या आजीबाईंच्या […]
वृद्धाच्या पोटात एक किलोचा मूतखडा
वसई : एका रुग्णाच्या पोटातून चक्क एक किलो वजनाचा मूतखडा वसईत डॉ. देवेंद्र पाटील यांनी ऑपरेशन करून बाहेर काढला असून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये या घटनेची नोंद व्हावी, म्हणून डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. वसईच्या नायगावमध्ये राहणारे एडवर्ड वॉर्नर हे ७२ वर्षाचे गृहस्थ लघवीच्या आजाराने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. एक्सरेमध्ये हा मूतखडा आढळून आला. अखेर सर्जरी […]
लिम्का बुकमध्ये महाराष्ट्रातील वृक्षारोपणाची नोंद
मुंबई- १ जुलै रोजी महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत २ कोटी ८० लाख रोपे लावण्याच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. हा विक्रम राष्ट्रीय विक्रम म्हणून लिम्का बुकमध्ये नोंदविण्यात आला असून हा उपक्रम महाराष्ट्र राज्याचे वन खाते आणि सामाजिक वनीकरण विभागाने संयुक्तपणे राबविला. यामध्ये १ जुलै रोजी केवळ बारा तासांमध्ये २ कोटी […]
दिल्लीतील १४४ फूट लांब वडापावची लिम्का बुकात नोंद
नवी दिल्ली : आज जागतिक वडापाव दिनाचा उत्साह राजधानी दिल्लीत पाहायला मिळत आहे. दिल्लीकरांनाही मुंबईकरांची भूक भागवणाऱ्या वडापावची भुरळ पडली असून येथे तब्बल १४४ फूट लांब वडापाव तयार करण्यात आला आहे. जगातला सर्वात मोठा हा वडापाव आहे. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या वडापावची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीतल्या स्ट्रीट फूड चेनने हा कार्यक्रम आयोजित […]
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’
नुकताच दोन हजार भागांचा टप्पा टीव्ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने पूर्ण केला असून या मालिकेने सर्वात जास्त दिवस चालणारी मालिका म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव कोरले आहे. सर्वात जास्त दिवस चालण्याचा विक्रम सब टीव्हीवरील या मालिकेने आपल्या नावावर केला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने […]
‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये दाखल झाला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’
‘बालिका वधू’ या मालिकेने नुकताच सर्वाधिक काळ सुरू असणारी मालिका म्हणून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये स्थान मिळवले. त्यात आता आणखी एका मालिकेने राष्ट्रीय रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले असून ‘सर्वाधिक काळ चालणारा कल्पनात्मक कॉमेडी कार्यक्रम’ म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने लिम्कामध्ये रेकॉर्ड कायम केला आहे. २८ जुलै २००८ पासून या मालिकेचे प्रसारण सब […]
लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये बालिका वधू’ची नोंद
सर्वाधिक २००० एपिसोड्सचा विक्रम कलर्स वाहिनीवरील ‘बालिका वधू’ या मालिकेने केल्यामुळे या मालिकेची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ही मालिका बाल विवाहावर भाष्य करत सुरू करण्यात आली होती. सुरुवातील लहानग्या आनंदीच्या आयुष्यातील चढ-उतार आणि तिचे जगदिशसोबतचे लग्न याभोवती मालिकेचे कथानक फिरते. आता या मलिकेत आनंदीची मुलगी, नंदिनीची कहाणी दाखवण्यात येत आहे. कलर्स […]
‘लिम्का बुक’मध्ये सचिनच्या ‘प्लेइंग इट माय वे’ची नोंद
मुंबई – क्रिकेटमधून जरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली असली तरी त्याची नवनवे विक्रम प्रस्थापित करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. फिक्शन आणि नॉन-फिक्शन वर्गवारीतील सर्वाधिक विक्रीचे पुस्तक सचिनचे ‘प्लेइंग इट माय वे’ हे आत्मचरित्र ठरले आहे. ६ नोव्हेंबर २०१४ साली सचिनचे ‘प्लेइंग इट माय वे’ हे आत्मचरित्र ‘हॅचे इंडिया’ने प्रकाशित केले होते. आजवर त्याच्या […]