बारामती : राज्यातील सत्तासंघर्षामुळे मागील महिनाभर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यातच राजकीय नेत्यांच्या सभा आणि त्याबरोबरच बैठकांमुळे त्यांचे कुटुंबियांकडे दुर्लक्ष होते. पहिल्यांदाच विधानसभेत आमदार म्हणनू पोहचलेल्या रोहित पवार यांनी या सगळ्यावर एक भावनिक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून रोहित पवारांनी आपण रोजच्या कामातून वेळ काढून कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे, असा सल्ला दिला आहे. […]
रोहित पवार
रोहित पवारांसह शरद पवारांनी लिलावतीमध्ये घेतली संजय राऊतांची भेट
मुंबई – सत्तास्थापनेचा अभूतपूर्व पेचप्रसंग महाराष्ट्रात निर्माण झाला असून शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा फोल ठरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे राज्यपालांनी निमंत्रण दिले आहे. परिणामी, राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. आजचा दिवस सत्तास्थापनेसाठी निर्णायक मानला जात आहे. आज महत्त्वाच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या बैठका होणार आहेत. त्याच शिवसेनेचे प्रवक्ते, […]
रोहित पवार यांना राम शिंदेंनी बांधला ‘विजयी’ फेटा
अहमदनगर – रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर विरोधी उमेदवार राम शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांनी यावेळी राम शिंदे यांच्या मातोश्रींचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. राम शिंदे यांनी यानंतर रोहित पवार यांना फेटा बांधला. यापूर्वी स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सेनेच्या धर्यशील माने यांना विजयी फेटा बांधला होता. संपूर्ण […]
आदित्य ठाकरेपेक्षा जास्त श्रीमंत आहेत रोहित पवार
अहमदनगर – काल दिवसभरात जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारांनी त्या अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे असलेल्या स्थावर व जंगम संपत्तीची माहिती दिली आहे. उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे बारामतीचे असलेले व नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले रोहित पवार यांच्याकडे 24 कोटी 33 लाखांची संपत्ती आहे. 5 कोटी 62 लाखांची स्थावर […]
अमित ठाकरेंच्या भेटीला रोहित पवार
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू अमित राज ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मुंबईत खासगीरित्या भेट घेतली. राजकीय वर्तुळात पवार आणि ठाकरे घराण्यांच्या वारसदारांनी एकमेकांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. काल दुपारी दीडच्या सुमारास मुंबईच्या लोअरपरेल येथील फिनिक्स मिल कंपाऊंड मधील इंडिगो हॉटेलमध्ये […]
रोहित पवारांचे पूनम महाजनांना तीन उदाहरणे देऊन उत्तर
पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना ‘शकुनीमामा’ म्हणणाऱ्या भाजप खासदार पूनम महाजन यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता मैदानात उतरले आहेत. गिरीश महाजन, गिरीश बापट आणि राम कदम या भाजप नेत्यांच्या वक्तव्यांची उदाहरणे देऊन, रोहित पवार यांनी पूनम महाजन यांना प्रत्युत्तर […]
शरद पवारांचे नातू रोहित पवार यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
मुंबई : शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब ठाकरे अखेरच्या क्षणी आमच्या उद्धवला सांभाळा, असे का म्हणाले होते याचा अर्थ आता समजला. संपादकीय लिहिण्याऐवजी दोन ओळीचा राजीनामा लिहिला असता वडिलांप्रमाणे आपल्याला ताठ कणा आहे, हे महाराष्ट्राला पाहायला […]