मुंबई – उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वाद काही केल्या शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. वयाने रामराजे नाईक निंबाळकर हे मोठे आहेत म्हणून त्यांचा मान राखला, ते जर का समवयस्क असते तर त्यांची जीभ हासडून हातातच दिली असती, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर आणि […]
रामराजे नाईक-निंबाळकर
रामराजेंची जीभ उदयनराजेंवर टीका करताना घसरली
सातारा – विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची जीभ खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका करताना घसरली आहे. रामराजेंनी उदयनराजेंवर टीका करताना साताऱ्यातील ३ कुत्री पिसाळलेली असून त्यांना आताच आवरा नाहीतर आपणही पिसाळलेले राजकारण करु असा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नीरा देवघर पाण्यावरुन रामराजे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. […]
रणजितसिंहच्या डीएनए वक्तव्याला रामराजे नाईकांचे प्रत्युत्तर
सातारा – विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना प्रत्युत्तर देताना सांगितले की फलटणचे घराणे जात-पात न मानणारे असून आमचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे हे प्रगल्भ विचाराचे होते. कुठे घेऊन आमच्या आई-वडिलांच्या लग्नाचा पुरावा येऊ, आपले हजार रुपये तयार ठेवा. आपले आव्हान खासदारसाहेब स्वीकारले असल्याचे प्रतिआव्हान दिले आहे. […]
रणजितसिंह नाईक निंबाळकरांची रामराजेंवर अत्यंत खालच्या पातळीवरील टीका
सोलापुर – सोलापुरातील माढा लोकसभा मतदाराचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार होताच वादग्रस्त वक्तव्य करत वाद निर्माण केला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जीभ विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकरांवर यांच्यावर टीका करताना घसरली असून त्यांनी रामराजे यांना बिनलग्नाची औलाद असे म्हटले आहे. माढ्यातून तब्बल ८५ हजारांच्या मताधिक्याने रणजितसिंह नाईक-निंबाळकर विजयी झाले आहेत. फलटण […]
उदयनराजे आणि रामराजे आमने-सामने
सातारा : काल उदयनराजे आणि रामराजे नाईक यांच्यात साताऱ्यात पुन्हा तणाव निर्माण झाला होता. साताऱ्यातील विश्रामगृहात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे बसलेले असतानाच त्या ठिकाणी खासदार उदयनराजे भोसले येताच काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण वेळीच जिल्हा पोलीसप्रमुख संदीप पाटील यांनी मध्यस्थी केल्याने मोठा संघर्ष टळला. सध्या सातारच्या राजकारणावरून या दोघांमध्ये वाकयुद्ध […]
लोकलेखा समितीला हवेत अधिक अधिकार : के. व्ही. थॉमस
मुंबई : संसदीय लोकलेखा समितीचे अध्यक्ष के. व्ही. थॉमस यांनी लोकलेखा समितीला अधिक अधिकार मिळायला हवेत जेणेकरून लोकशाहीची प्रक्रिया अधिक भक्कम होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केले. केंद्रीय तसेच राज्यांमधील लोकलेखा समित्यांमधील संवाद अधिक वाढविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. संसदीय लोकलेखा समिती आणि महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीची संयुक्त बैठक […]