रियाध : सौदी अरेबियात मुर्तझा कुरेसिस ज्याचे वय सध्या 18 वर्षे आहे, तो वयाच्या 10 व्या वर्षीच तेथील हिरो बनला होता. मुर्तझाची अरब स्प्रिंग म्हणजेच सौदी क्रांतीच्या वेळी राजकीय समज मोठी होती. मुर्तझाने 2011 मध्येच मानवाधिकाराच्या मागणीसाठी त्याच्या 30 मित्रांसह सायकल रॅली काढली होती. पण सरकारचा शिया कुटुंबातील असलेल्या मुर्तझाच्या आंदोलनाने संताप झाला आणि त्याचा […]
फाशी
मागील वर्षात देशातील 162 लोकांना सुनावण्यात आली फाशीची शिक्षा
नवी दिल्ली – मागील वर्षात म्हणजेच 2018 साली देशातील 162 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा गेल्या 20 वर्षातील सर्वाधिक असून सर्वाधिक मध्य प्रदेशमधील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्राचा यामध्ये दुसरा तर कर्नाटकचा तिसरा क्रमांक लागतो. याबाबतची आकडेवारी दिल्लीतील राष्ट्रीय कायदा विद्यापीठाने एका अभ्यासाअंतर्गत जाहीर केली आहे. या […]
मृत्यूदंडाची संविधानिक वैधता सर्वोच्च न्यायालयाकडून कायम
नवी दिल्ली – मृत्यूदंडाची तरतूद सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय पीठाने कायम ठेवली असून २ न्यायाधीश हा निर्णय घेताना वैधता कायम ठेवण्याच्या बाजूने तर १ न्यायाधीश याच्या विरोधात होते. त्यामुळे मृत्यूदंडाची तरतूद बहुमताने कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा कायदा गंभीर गुन्हे रोखण्यासाठी किती परिणामकारक ठरतो, यावर मते व्यक्त करण्यात आली. या तरतूदीच्या विरोधात असणाऱ्या सदस्यांनी […]
आमच्या वडिलांना फाशी द्या – द. कोरियातील बहिणींची मागणी
आपल्या आईला निर्दयपणे मारणाऱ्या वडिलांना फाशी द्या, अशी मागणी दक्षिण कोरियातील तीन बहिणींनी केली आहे. त्यांच्या या मागणीला सुमारे 150,000 दक्षिण कोरियन नागरिकांना पाठिंबा दिला आहे. या तीन बहिणींच्या आईला तिच्या माजी पतीने गेल्या आठवड्यात कार पार्कमध्ये जीवे मारले होते. त्यापूर्वी अनेक वर्षे तो तिचा छळ करत होता, असे पोलिसांनी सांगितले. या व्यक्तीचे केवळ कीम […]
१४ दहशतवाद्यांना पाकिस्तानने सुनावली फाशीची शिक्षा
इस्लामाबाद – १४ दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असून या निर्णयावर पाकिस्तानचे सेना प्रमुख जनरल कमर जावेद यांनी शिक्कामोर्तब केले आहे. दहशतवादी कारवायांमध्ये हे १४ जण सहभागी होते. पेशावरमध्ये या दहशतवाद्यांनी डिसेंबर २०१४ साली एका शाळेवर हल्ला केला होता. १५० मुलांची या हल्ल्यात हत्या करण्यात आली होती. याच बरोबर सशस्त्र दलांवरती हल्ला करणे, […]
प्रिती बारिया हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी
भंडारा : भंडारा जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजय देशमुख यांनी बहुचर्चित प्रिती बारिया हत्या प्रकरणातील दोषी आमीर शेख आणि सचिन राऊत यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. प्रिती बारिया यांचा एसी दुरुस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश घुसून तिघांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात जागीच मृत्यू झाला होता, तर दोन मुलांना कायमचे अपंगत्व आलं. ही घटना तीन वर्षांपूर्वी म्हणजेच ३० […]
इसीसचा सूड उगविला जातोय त्यांच्या बायकांवर
इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी इराक मध्ये मांडलेल्या आतंकाचा सूड या दहशतवाद्यांच्या बायका मुलांवर उगविला जात असून ईराकी न्यायालयाने अश्या ४० महिलांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या दहशतवाद्यांचे सर्व उद्योग माहिती असतानाही त्यांनी त्यांच्या जोडीदारांना साथ दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला आहे. आज मितीला या दहशवाद्यांशी संबंधित सुमारे १ हजार महिला मुली इराकी तुरुंगात असून त्यातील बहुतेक […]
राज्यात पॉक्सोअंतर्गत फाशीच्या तरतुदीनंतरचा पहिला गुन्हा परभणीत दाखल
परभणी : बारा वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारे बदल पॉक्सो कायद्याअंतर्गत लागू झाल्यानंतर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या आई-वडिलांसह गावातून सात वर्षांची चिमुरडी परभणी शहरात आली. त्यांच्या ओळखीचा ३० वर्षीय तरुण सय्यद बबलू सय्यद अश्रफ बाजारात भेटला. आई-वडिलांची नजर चुकवत त्याने या चिमुरडीचे अपहरण केले आणि पूर्णा […]
अल्पवयीन मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, अध्यादेश जारी
नवी दिल्ली : आज एक मोठा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून पॉस्को कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बारा वर्षाखालील मुलांच्या लैंगिक शोषणातील आरोपीला मृत्युदंड देण्यासंदर्भात अध्यादेश जारी केला आहे. आता १२ वर्षांखालील मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होणार आहे. केंद्र सरकारने अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या बलात्कारासंबंधी […]
हरियाणा ; अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशी
चंदिगढ : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोषीला हरियाणामध्ये थेट फाशीची शिक्षा होणार आहे. हरियाणा हे बलात्काऱ्याला फाशीची शिक्षा सुनावणारे देशातील तिसरे राज्य ठरले आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले, तर दोषीला सर्वोच्च शिक्षा सुनावली जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी व्यथित होऊन हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर हरियाणा विधानसभेने या […]
राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना मिळणार फाशी
जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा देणाऱ्या राजस्थान विधानसभेने विधेयकाला सर्वानुमते मंजुरी दिली आहे. राजस्थान हे विधेयक मंजूर करणारे मध्यप्रदेशनंतर दुसरे राज्य बनले आहे. हे विधेयक आता केंद्र सरकारकडे पाठवले जाईल. विधेयकाला राष्ट्रपतींनी संमती दिल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. मागील वर्षी डिसेंबर २०१७ मध्ये मध्यप्रदेशच्या शिवराजसिंह चौहान सरकारने दंड विधी (मध्यप्रदेश संशोधन) […]
फाशी सुनावल्यानंतर जज का मोडतात पेनाची निब?
भारतीय कायदा व्यवस्थेत फाशी सर्वात मोठी शिक्षा मानली जाते. या शिक्षेविषयी आपल्याला फारशी माहिती नसते मात्र हिंदी सिनेमातून फाशीची शिक्षा सुनावली कि जज पेनाची निब मोडतात हे आपण पाहिलेले असते. असे करण्यामागे खास कारण आहे. ते म्हणजे एकदा फाशी सुनावल्यावर ती रद्द करण्याचा अधिकार त्या न्यायाधीशांना राहत नाही अथवा ते शिक्षेत बदल करू शकत नाहीत. […]
सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा
नाशिक : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी ६ दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील आणि दोषींच्या वकीलांमध्ये गुरुवारी शिक्षेवर युक्तीवाद करण्यात आला होता. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दोषींना कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. नेवासा तालुक्यातील सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे २०१३च्या […]
चीनमध्ये १० जणांना सार्वजनिक फाशी
चीनच्या गुआंगडोंग प्रांतात गेल्या शनिवारी न्यायालयाच्या आदेशावरून १० जणांना स्टेडियममध्ये सार्वजनिक फाशी दिल्याची घटना सध्या चर्चेत असून ही फाशी पाहण्यासाठी नागरिकांना खास निमंत्रण दिले गेले होते व हजारोंच्या संख्येने लोकांनी दहा जणांना फासावर लटकविताना पाहिल्याचे सांगितले जात आहे. या प्रेक्षकांपैकी कांही जणांनी या फाशीचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केल्यानंतर या घटनेची चर्चा सूरू […]
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मर्चंटच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती
नवी दिल्ली – १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ताहीर मोहम्मद मर्चंटच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुंबईच्या टाडा न्यायालयाने ७ सप्टेंबर रोजी मर्चंटला फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयात मर्चंटने धाव घेतली होती. मर्चंट सोबत फिरोज अब्दुल, रशीद खान यांच्यासह अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम यांना मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा […]
कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणातील तीनही आरोपींना फाशीची शिक्षा
अहमदनगर : संपूर्ण राज्याला हादरुन टाकणाऱ्या कोपर्डी अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बलात्कार, बलात्काराचा कट रचणे आणि हत्या अशा वेगवेगळ्या कलमांखाली त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी साठी जितेंद्र बाबुलाल शिंदेला (आरोप क्रमांक १) पीडित तीन […]
सूर्योदयाच्या वेळी का दिली जाते कैद्यांना फाशी?
एखाद्या आरोपीला कायद्याने मृत्युदंड तेचाच दिला जातो, जेव्हा त्याने केलेला गुन्हा हा अतिशय अमानवी, भयंकर आणि अक्षम्य स्वरूपाचा असतो. निरनिराळ्या देशांमध्ये ही मृत्युदंडाची शिक्षा देण्याच्या निरनिराळ्या पद्धती अवलंबल्या जातात. काही देशांमध्ये इंजेक्शनच्या मदतीने शरीरामध्ये हानिकारक रसायन टोचून मृत्युदंड दिला जातो, तर काही देशांमध्ये विजेच्या खुचीवर आरोपीला बसवून अतिशय तीव्र विजेचे झटके आरोपीला दिले जाऊन त्याला […]
पारनेर सामूहिक बलात्कार, खून प्रकरणातील दोषींना मृत्युदंड
अहमदनगर – जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी पारनेर तालुक्यातील अल्पवयीन शालेय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या तिन्ही आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपींची नावे संतोष विष्णू लोणकर, मंगेश दत्तात्रय लोणकर आणि दत्तात्रय शंकर शिंदे अशी आहेत. पारनेर तालुक्यातील आळकुटी येथील शाळकरी मुलगी २०१४ सालच्या ऑगस्टमध्ये परीक्षा देऊन घरी जात असताना सायंकाळच्या सुमारास […]