(सोर्स दैनिक भास्कर) जम्मू काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सांबा परिसरात शेतकरी बुलेटप्रुफ ट्रॅक्टरचा वापर शेतातील कामे करण्यासाठी करत असून या कामी त्यांना बीएसएफचे जवान सुरक्षा पुरवीत आहेत. यामुळे सिमेजवळची जमीन कसणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. या परिसरात पाकिस्तान कडून वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन करण्याच्या घटना होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यात अनेक अडथळे येत होते त्यावर हा […]
जम्मू काश्मीर
कारागृहातील कैदी आता फोनद्वारे साधू शकतील नातेवाईकांशी संवाद
जम्मू-काश्मीरचे कारागृह पोलिस महासंचालक वी. के सिंह यांनी बुधवारी सांगितले की, कैद्यांना लवकरच ‘कैदी कॉलिंग ‘सुविधा देण्यात येणार आहे. या सेवेद्वारे ते नातेवाईक आणि वकिलांशी फोनद्वारे बोलू शकणार आहेत. जम्मूमधील कारागृहात आधिकाऱ्यांच्या एका संमेलनात संबोधित करताना वी. के सिंह यांनी याबाबत माहिती दिले. मात्र गंभीर गुन्ह्यांचा आरोप असणाऱ्या कैद्यांना या सेवेचा लाभ मिळणार नाही. त्यांनी […]
धक्कादायक कबुली, काश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय समूहाने पाकला लाथडले
पाकिस्तानचे गृहमंत्री एजाज अहमद शाह यांनी काश्मीर मुद्यावर पाकिस्तानचे सरकार अपयशी ठरल्याचे वक्तव्य केले आहे. ब्रिगेडियर एजाज अहमद शाह हे इस्लामबाद येथे म्हणाले की, काश्मीर मुद्यावर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समूहात समर्थन मिळवण्यास अपयशी ठरले आहे. याचबरोबर देशाची प्रतिमा खराब करण्यास पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे सरकार जबाबदार असल्याचे देखील म्हटले आहे. एजाज एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या […]
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून वापरले जात आहेत ‘हे’ कोडवर्ड – अजित डोवाल
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी जम्मू-काश्मीरमधील 92.5 टक्के भूभागावरील निर्बंध हटवण्यात आले असल्याचे सांगितले आहे. तसेच राजकीय नेत्यांविषयी ते म्हणाले की, कोणतीही घटना घडू नये यासाठी त्यांना कोठडीत ठेण्यात आलेले आहे. त्यांनी सांगितले की, कोणत्याही नेत्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा देशद्रोहचे प्रकरण नाही. केवळ राज्यात शांतता राहावी यासाठी त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अजित […]
या रेस्टोरंटमध्ये जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना मिळते 370 रुपये सूट
जर तुम्ही जम्मू-काश्मीरचे नागरिक असाल तर दिल्लीच्या कनॉट प्लेस येथील एका रेस्टोरंटमध्ये एका सुपर साइज थाळीवर 370 रूपये डिस्काउंट मिळू शकते. या मोठ्या थाळीमध्ये प्रत्येक राज्यातील पदार्थांचा तुम्हाला आस्वाद घेता येईल. आडरेर 2.1 रेस्टोरंट हे हटके पदार्थांसाठी प्रसिध्द आहे. सध्या येथे जम्मू-काश्मीरचे ओळखपत्र दाखवल्यावर कलम 370 नावाच्या थाळीवर 370 रूपयांची विशेष सुट मिळत आहे. येथे […]
जम्मू काश्मीरमध्ये रिसोर्ट बांधणारे पहिले राज्य ठरणार महाराष्ट्र
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० मधील तरतुदी रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लदाख मध्ये जमीन घेऊन रिसोर्ट बांधणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य बनणार आहे. या निर्णयाला फडणवीस सरकार कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची महाराष्ट्रात अनेक रिसोर्ट आहेत. त्याच धर्तीवर काश्मीरच्या पहेलगाम येथे आणि लदाखच्या लेह मध्ये २ रिसोर्ट बांधली जाणार […]
महेंद्रसिंह धोनीने लद्दाखमध्ये फडकवला तिरंगा
महेंद्रसिंह धोनी सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सैन्यात कार्यरत आहेत. काही दिवसांसाठी क्रिकेटपासून विश्रांती घेत, सैन्यबरोबर कार्य करत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये धोनी इतर सैन्याप्रमाणे कार्य करत आहेत. आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी धोनी खास लद्दाखला पोहचला. लद्दाखमध्ये त्याचे शानदार स्वागत करण्यात आले. धोनी लद्दाखला पोहचल्यावर सैना अधिकाऱ्यांनी त्यांना सैल्युट करत त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. Indian cricketer MS Dhoni […]
या कारणामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन जम्मू काश्मीरसाठी असणार खास
येत्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक कोपऱ्यात तिरंगा फडकवण्साठी भाजपाच्या प्रदेश कार्यकर्त्यांनी दिल्लीवरून 50 हजार खास झेंडे मागवले आहेत. हे झेंडे ठिकठिकाणांच्या कार्यकर्त्यांना आणि पंचायतींना वाटले जातील. नवीन केंद्र शासित प्रदेशात येत्या 15 ऑगस्टला 4 हजार पेक्षा अधिक पंचायतींमध्ये झेंडे फडकावले जातील. याच बरोबर सर्व गावांमध्ये कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त एवढ्या मोठ्या […]
पाकिस्तानी कलाकार हवेतच कशाला?
काश्मिर मुद्द्यावर केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. त्यासाठी पाकिस्तानने उचललेल्या तथाकथित कठोर पावलांना तोडीस तोड उत्तर देण्याचीही तयारी भारत सरकारने केली आहे. मात्र भारतीय कलाकारांच्या संघटनेनेही त्यात आपला सहभाग नोंदवला असून त्याचे स्वागत करायला हवे. काश्मिरला विशेष दर्जा देणारे 370वे कलम भारताने रद्द केल्यावर पाकिस्तान बिथरणे स्वाभाविक होते. मग बिथरलेल्या पाकिस्तानने […]
‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’मुळे सोशल मीडियावर ट्रोल झाले मनीष तिवारी
सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाचे अनेक विरोधी पक्षांनी देखील स्वागत केले. मात्र काँग्रेस पक्ष या निर्णयाचे विरोधात असल्याचे दिसून आले. Manish Tiwari, Congress says "Not every issue is black and white, there is a book that says 50 shades of grey." Hehe! He says this in reply […]
पाकव्याप्त काश्मीरबद्दल संपुर्ण माहिती
भारताच्या फाळणीनंतर लगेचच पाकिस्तानने आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरूवात केली होती. काश्मीरला पाकिस्तानमध्ये घेण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र अखेर काहीच होत नसल्याने काश्मीरवर हल्ला करण्यात आला. जोपर्यंत राजा हरिसिंह विलिनिकरणाच्या कागदांवर सही करत होते तोपर्यंत पाकिस्तानने काश्मीरच्या मोठ्या भागावर ताबा मिळवला होता. आजही काश्मीरचा अर्धा भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. मीरपूर शहर – पाक व्याप्त […]
विनाश काले विपरित बु्द्धी, भारतावर हल्ला करण्याचे आदेश देऊ का ?
जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 हटवण्याचा व केंद्रशासित प्रदेश करण्याला दोन्ही संसदेने मंजूरी दिलेली आहे. मात्र भारताचा हा निर्णय पाकिस्तानला चांगला झोंबला असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानचे विरोधी पक्ष नेते आणि पीएमएल-एन नेता शहबाज शरीफ म्हणाले की, पाकिस्तान सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्यावरून कडक शब्दात उत्तर द्यायला हवे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी विरोधी पक्षांचे मागितले मत – […]
जम्मू काश्मीर मध्ये अमूल करणार गुंतवणूक
केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर या प्रदेशाच्या विकास आणि गुंतवणुकीचा रस्ता खुला झाला आहे. डेअरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी गुजरात को ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने सरकारला संपूर्ण सहकार्याची तयारी दर्शविली आहे. ही संस्था अमूल या नावाने देशभरात दुध आणि दुध उत्पादनांची विक्री करते. मिळालेल्या माहितीनुसार फेडरेशनच्या मुख्य सदस्यांनी जम्मू काश्मीरच्या […]
कलम 370 रद्द झाले, तरी या राज्यांमध्ये खरेदी करता येत नाही जमीन
सरकारने जम्मू-काश्मीर संबंधीत कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. राज्यसभेत याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घोषणा केली. याच निर्णयाबरोबर आता जम्मू-काश्मीरमध्ये भारतातील कोणताही नागरिक जमीन खरेदी करू शकणार आहे. मात्र असे असले तरी, असे कलम लागू आहे ज्याद्वारे तुम्ही तुम्ही अन्य काही राज्यांमध्ये जमीन खरेदी करू शकत नाही. अनेक राज्यांमध्ये कलम 371 लागू असल्याने तेथे […]
हे आहेत कलम 370 हटवण्यामागील मास्टरमाईंड
5 ऑगस्ट 2019 ला सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 हटवण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय घेतला. जम्मू-काश्मीर राज्याला दोन केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लद्दाख बनवण्याचे विधेयक देखील सादर केले. गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले. मात्र या निर्णयाला लागू करण्यासाठी पडद्यामागे अनेक लोकांचा हात आहे. सत्यपाल सिंह – सत्यपाल सिंह हे […]
ऑक्टोबरमध्ये जम्मूकाश्मीर मध्ये इन्व्हेस्टमेंट समिट
केंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून त्याला केंद्रशासित प्रदेश जाहीर केल्यानंतर येत्या ऑक्टोबर महिन्यात तेथे केंद्र सरकारतर्फे गुंतवणूकदार परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. यात देशातील नामवंत उद्योजक सहभागी होणार असल्याचे समजते. दसऱ्याच्या आसपास ही परिषद घेतली जाईल असे संकेत उद्योग मंत्रालयाकडून दिले गेले आहेत. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे काश्मीर विकासाचा मार्ग मोकळा […]
जम्मूकाश्मीरचा विशेष राज्य दर्जा संपल्याने होणार हे बदल
गृहमंत्री अमित शहा यांनी आज प्रथम राज्यसभेत आणि नंतर लोकसभेत अतिमहत्वाचे विधेयक मांडून जम्मू काश्मीरला विशेष राज्याच्या दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला. पंतप्रधान मोदी यांनी त्याच्या कारकिर्दीतला हा सर्वात महत्वाचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया देश विदेशात उमटली आहे. हे कलम रद्द झाल्याने जम्मू काश्मीरमध्ये नक्की काय बदलणार हे जाणून घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम […]
“कलम 370 हटवल्याने बाळासाहेब आणि वाजपेयींचे स्वप्न पुर्ण झाले”
गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव सादर केला. याचबरोबर राज्य पुनर्गठन प्रस्ताव देखील सादर करण्यात आला. यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज आपला देश पुर्ण स्वतंत्र झाला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. “आज आपला देश पूर्ण स्वतंत्र, विरोधकांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून देशाच्या सार्वभौमत्वाला […]