तंत्रज्ञानाच्या मदतीने आता लवकरच हिऱ्यापासून बनविलेल्या डिस्प्लेचे स्मार्टफोन बाजारात दाखल होणार असल्याचे समजते. खान डायमंड ग्लासने यासंदर्भात घोषणा केली असून या फोनसाठी २०१९ सालची प्रतीक्षा करावी लागेल. हे फोन अर्थातच खिशालाही भारी असतील असा अंदाज आहे. आत्तापर्यंत अनेक मोबाईल कंपन्यांनी त्याच्या खास एडिशन बाजारात आणल्या आहेत. त्यावर सोने, चांदी, हिरे जडवून ते विकले गेले आहेत. […]