नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महत्वकांक्षी विधेयक असलेले नागरिकत्व कायदा सुधारणा विधेयक लोकसभेत 293 मतांनी मंजूर झाल्यानंतर आसाममध्ये याचे पडसाद उमटू लागले आहेत. या विधेयकाचा अनेक विद्यार्थी संघटना आणि लोकांनी निषेध केला. हे आंदोलन मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. या विधेयकाविरोधात नॉर्थ ईस्ट विद्यार्थी संघटनेने (NESO) ईशान्येकडील राज्यांत १२ तासांच्या बंदची घोषणा केली आहे. […]
केंद्र सरकार
तीन महिन्यांपूर्वीच केंद्राला दिले होते कांद्याच्या दरवाढीचे संकेत
मुंबई – देशात कांद्याचा वांदा झाला असल्याचे म्हटले तर वावगे ठरु नये. त्यातच संसदेसह देशभरात सध्या कांद्याच्या दरवाढीवरून गदारोळ सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मुद्यावर प्रथमच भाष्य केले आहे. केंद्र सरकार कांद्याच्या दरवाढीला जबाबदार असून दर नियंत्रणात आणण्यासाठी तुर्कीतून कांदा आयात करण्यात आला. ही चूक केंद्र सरकार करत असल्याचा सूचक सल्ला देत […]
वीरप्पनला यमसदनी धाडणाऱ्या अधिकाऱ्याला केंद्राकडून मोठी जबाबदारी
नवी दिल्ली : गृहमंत्रालयात वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून निवृत्त आयपीएस अधिकारी के. विजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंदन तस्कर वीरप्पनचा आयपीएस के. विजय कुमार यांनी खात्मा केला होता. विजय कुमार वीरप्पनचा खात्म केल्यापासून चर्चेत आले होते. गृहमंत्रालयाने सध्या त्यांच्यावर नवीन केंद्रशासित प्रदेश जम्मु-काश्मीरच्या सुरक्षेसंबंधी सल्ला देण्याची जबाबदारी सोपवली आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचे सल्लागार […]
बंदीनंतरही याद्वारे पॉर्न पाहणाऱ्यांच्या प्रमाणात ४०० टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारसाठी इंटरनेटवरील अश्लील मजकूर किंवा व्हिडिओवर बंदी घालणे एक आव्हान बनले आहे. भारत सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पॉर्नहबसह एकूण ८५७ पॉर्न साइट्सवर बंदी घातली होती. पण लोकांना सरकारचा हा निर्णय आवडला नाही. तथापि, यावर नामी शक्कल वापरकर्त्यांनी शोधून काढली आहे. आता व्हीपीएनच्या (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) माध्यमातून आंबटशौकिन पॉर्न वेबसाइट पहात असल्याचे […]
फास्टॅगला 15 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ
नवी दिल्ली – 1 डिसेंबरपासून सर्व वाहनांचा टोल हा केवळ फास्टॅगनेच घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केले होते. पण आता फास्टॅगच्या सक्तीला केंद्र सरकारने 15 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्याचा शुक्रवारी निर्णय घेतला. त्यानंतर महामार्गावारील टोलनाक्यांवर फास्टॅगचा पास असणे सर्व वाहनांना बंधनकारक असणार आहे. टोल भरण्याची प्रीपेड सुविधा असलेला फास्टॅग ही […]
नुकसान भरपाई म्हणून राज्यपाल बदलीचे पाऊल उचलणार भाजप
नवी दिल्ली – अवघ्या 70 तासात स्थापन केलेले सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. भाजपची प्रतिमा महाराष्ट्रात सत्तासंघर्षाच्या स्थापनेच्या नाट्यात मलीन झाली असून भाजप त्याची नुकसान भरपाई म्हणून राज्यपाल बदलीचे पाऊल उचलणार असल्याचे वृत्त आहे. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र कोश्यारी यांची जागा […]
आधारशी जोडले जाणार नाही सोशल मीडिया अकाऊंट – केंद्र सरकार
सोशल मीडिया अकाऊंट आधार कार्डशी जोडण्याची कोणतीही योजना नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोशल मीडिया अकाऊंट आधारशी जोडण्यासंबंधी लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला लिखित स्वरूपात उत्तर दिले. रविशंकर प्रसाद म्हणाले की, नीति आणि डिझाईननुसार, यूआयडीएआय आधारद्वारे केवळ नागरिकांची माहिती एकत्र केली जाऊ शकते, त्यांच्या पाळत ठेवली जाऊ शकत नाही. […]
सावरकरांच्या ‘भारतरत्न’ला कायमच विरोध
नवी दिल्ली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करणे म्हणजे महात्मा गांधी यांच्या विचारांची हत्या करणे आहे, अशी प्रतिक्रिया दिली. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. कालच्या पत्रकार परिषदेत या मागणीचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुनरुच्चार केला. ही मागणी भाजपच्याही अनेक नेत्यांची आहे. […]
शिफारस केल्यास सावकरांना दिला जाऊ शकतो ‘भारतरत्न’
नवी दिल्ली – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात राज्य सरकार सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपूरावा करेल असे आश्वासन दिले होते. केंद्र सरकारने आता यासंदर्भात एक मोठे वक्तव्य केले आहे. केंद्र सरकारने संसदेत सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासंदर्भातील एका प्रश्नावर उत्तर दिले आहे. […]
राष्ट्रीय चिन्ह, राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या फोटोचा वापर केल्यास होणार कारवाई
नवी दिल्ली – अनेकजण सोशल मीडियावर मान्यवर व्यक्ती, नेते, सेलिब्रिटी यांच्यासोबतचे फोटो काढून पोस्ट करतात. तसेच काहीवेळा या फोटोंचा गैरवापरही केला जातो. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीसोबत फोटो काढून त्याचा वापर करून इतरांची फसवणूक करण्याचे प्रकारही घडतात. आता याविरुद्ध सरकारकडून कठोर पावले उचलण्यात येणार असून पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यासह मान्यवर व्यक्ती किंवा राष्ट्रीय चिन्ह यांचा चुकीचा तसेच व्यावसायिक […]
गेल्या दोन दिवसांपासून आधारच्या नियमांबद्दल सुरु असलेली चर्चा निव्वळ अफवा
नवी दिल्ली : बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्डच्या केवायसी नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर यासंदर्भात इतर काही बदल केले नसल्याचे अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आधार कार्डचा पत्ता बदलण्यासाठी नियम सोपे करण्यात आल्याचे गेल्या दोन दिवसांपासून म्हटले जात होते. अर्थ मंत्रालयाने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. मनी लाँड्रिंगला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या आदेशानंतर […]
महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीला केंद्राची मंजुरी
मुंबई: राज्यात सत्तेचा दावा करण्यात भाजपपाठोपाठ शिवसेनेलाही अपयश आल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे. तसे पत्रच राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले आहे. आता या शिफारसीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा केली जाऊ शकते. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर […]
सरकारने काढली गांधी कुटूंबियांची एसपीजी सुरक्षा
केंद्र सरकारने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांची एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन फोर्स) सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पुर्ण गांधी कुटूंबाला एसपीजी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. गृहमंत्रालयाच्या सुरक्षा समिक्षा कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
दोन दिवसात बीएसएनएलच्या २२ हजार कर्मचाऱ्यांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज
नवी दिल्ली – केंद्र सरकारने आर्थिक टंचाईत असलेल्या भारत संचार निगम लिमिटेडला (बीएसएनएल) आर्थिक मदतीची घोषणा केल्याच्या आठवड्याभरात कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणारी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली होती. योजनेत बीएसएनएलचे ७० ते ८० हजार कर्मचारी पात्र ठरण्याची शक्यता असून, कंपनीला त्यातून वर्षांला ७,००० कोटी रुपयांच्या वेतन खर्चात बचत शक्य होणार आहे. त्यातच आता केवळ दोन दिवसांच्या […]
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी झाली होती नोटबंदी
नवी दिल्ली – देशाच्या अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील आठ नोव्हेंबरचा दिवस एक महत्त्वाचा दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच दिवशी तीन वर्षांपूर्वी रात्री आठ वाजता दूरदर्शनवरून देशाला संबोधित केले होते. मोदींनी या दिवशी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. देशातील काळा पैसा आणि नकली नोटांची समस्या संपवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले. […]
कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवणार केंद्र सरकार
नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना आता आठ ऐवजी नऊ तास काम करावे लागेल. यासाठी सरकार लवकरच नियमांमध्ये बदल करणार आहे. केंद्र सरकारने वेतन संहिता नियमही तयार केला आहे. सरकारी कर्मचार्यांच्या कामाचा कालावधी एक तासाने वाढवण्याची शिफारस यात करण्यात आली आहे. आठ तास कामकाजाच्या नियमाखाली पगाराच्या 26 दिवसांच्या कामानंतर निश्चित केले जाते. तथापि, मसुद्यामध्ये राष्ट्रीय […]
2021 च्या जनगणनेनंतर देशभर लागू होईल एनआरसी
नवी दिल्ली – 2021च्या राष्ट्रीय जनगणनेनंतर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनआरसी) टप्प्याटप्प्याने देशभरात लागू केली जाईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत सहाय्यक संस्था, सरकारी प्रतिनिधी आणि भाजप नेत्यांच्या मॅरेथॉन बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. छतरपूर येथे झालेल्या या बैठकीत भविष्यातील नवीन लोकसंख्या धोरण, कलम 370 रद्द झाल्यानंतरची परिस्थिती आणि अयोध्या वादाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही दीर्घकाळ चर्चा […]
हेरगिरी प्रकरणी व्हॉट्सअॅपचे सरकारला उत्तर
नवी दिल्ली : देशभरात व्हॉटसअॅपच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली असून याप्रकरणी व्हॉटसअॅपला नोटीस पाठवून सरकारने उत्तर देण्यास सांगितले होते. कंपनीने यावर म्हटले आहे की, कंपनीने सरकारला हेरगिरीबाबत यावर्षी मे महिन्यात कल्पना दिली होती. अनेक देशांमधील अधिकारी, पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांचे फोन एका इस्रायलच्या स्पायवेअरच्या मदतीने हॅक करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर […]