सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी आसाम नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) वरून माध्यमांना चांगलेच फटकारले आहे. ‘पोस्ट कॉलोनियल आसाम’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात गोगोई यांनी माध्यमांना चांगलेच सुनावले. ते म्हणाले की, एनआरसी लागू केल्याच्या दरम्यान बिघडलेल्या परिस्थितीला माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने केलेले रिपोर्टिंग जबाबदार आहे. CJI Ranjan Gogoi: Irresponsible reporting by a few media […]
आसाम
माझ्या बकरीचा समद्यास्नी लागलय लळा…
आसाममध्ये एका बकरीचा सर्वांना लळा लागला असून या बकरीला पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे कारण आपण आजवर दोन डोके असलेले प्राणी जन्माला आल्याचे तुम्ही पाहिले किंवा ऐकले असेलच. पण चक्क एक डोळा असणारी बकरी आसाममध्ये जन्माला आली आहे. या बकरीने मुखरी दास यांच्या घरात जन्म घेतला आहे. या बकरीला एक डोळा असला […]
दोनपेक्षा जास्त मुले असलेल्यांना मिळणार नाही सरकारी नोकरी
गुवाहाटी – सोमवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय आसामच्या मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयानुसार, दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना एक जानेवारी 2021 पासून कोणतीही सरकारी नोकरी दिली जाणार नाही. हा निर्णय सोमवारी सायंकाळी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत झाला. नव्या भूमी कायद्यालाही मंत्रिमंडळाच्या या बैठकीत मंजुरी देण्यात आली. भूमिहीन लोकांना यामुळे तीन गुंठे शेतजमीन आणि एक घर बांधण्यासाठी अर्धा गुंठा जमीन […]
यामुळे लष्कराचा ‘जारी’ कुत्रा सोशल मीडियावर झाला हिरो
भारतीय सैन्याच्या बाहदुरीचे किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असतील. देशासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांचे कितीही कौतूक केले तरीही कमीच आहे. मात्र भारतीय सैन्यातील एका कुत्र्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर भारतीय सैन्यातील एक कुत्रे हिरो ठरले आहे. भारतीय सैन्यातील ट्रॅकर कुत्रा ‘जारी’ने आसामच्या पनबारी रिझर्व्ह फॉरेस्ट येथे लपवण्यात आलेला हत्याराचा साठा, स्फोटके […]
19 लाखांपेक्षा अधिक लोक एनआरसीच्या अंतिम यादीतून बाहेर
गुवाहाटी – शनिवारी आपली अंतिम यादी नॅशनल सिटिझनन रजिस्टरने (एनआरसी) जारी केली आहे. एनआरसीचे राज्य समन्वयक प्रतिक हजेला यांनी सांगितल्याप्रमाणे, 19 लाख 6 हजार 657 लोक शेवटच्या यादीतून बाहेर काढण्यात आले आहेत. बाहेर काढलेल्यांमध्ये प्रामुख्याने ज्या लोकांनी कुठलाही दावा सादर केला नाही, त्यांचाच समावेश आहे. 3 कोटी 11 लाख 21 हजार 4 लोकांना वैध ठरवण्यात […]
आसाममधल्या या कामधेनुच्या दुधासाठी लांब रांगा
आसामच्या बारपेटा या मुस्लीम बहुलभागातील कलगछियाच्या खिल्ली गावात सध्या एक गाय प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. फजर अली यांच्या घरातील या गाईचे दुध पिण्यासाठी दररोज त्यांच्या घरासमोर मोठ्या रांगा लागल्याचे दृश्य दिसत आहे. एकही वेत न झालेली ही गाय दररोज १३ लिटर दुध देतेच पण हे दूध प्यायल्याने अनेक रोग बरे होत असल्याचा अनुभव लोक घेत […]
या दुर्मिळ प्राण्याला वाचवण्यासाठी त्याने नाकारली 20 लाखांची ऑफर
वरिष्ठ पत्रकार आणि वन्यजीव कार्यकर्ते जयंत के दासने काही दिवसांपुर्वीच नष्ट होत चाललेली टोके गेको ही पालीची प्रजाती वाचवली आहे. ही प्रजाती आसाम आणि पुर्वेत्तर राज्यात सापडते. याबाबतची माहिती त्याने ट्विट करत दिली. या सरपटणाऱ्या प्राण्याला शिकाऱ्यांपासून वाचवले. शिकाऱ्यांनी त्याला 20 लाख रूपये देण्याचे देखील मान्य केले, मात्र तो तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. जयंतने […]
महाकाय अजगरला बघुन लोकांची वळली बोबडी
आसामच्या नागाव येथे अशी घटना घडली की, ज्याने सर्वच जण हैराण झाले आहेत. पाऊस आणि पुरामुळे अनेक जनावरं जंगल आणि नदीसोडून शहराकडे येत आहेत. यामुळे लोकांच्या जीवाला देखील धोका निर्माण होत आहे. पुराच्या पाण्यात मगरी, गाई असे प्राणी वाहून आल्याचे तर आपण अनेकवेळा ऐकले असेल. मात्र आसामच्या नागावमध्ये 14 फुटांपेक्षा अधिक लांब अजगरच आला आहे. […]
एक किलो चहापावडरसाठी लागली तब्बल 50 हजारांची बोली
आसामची दुर्मिळ मनोहरी गोल्ड चहापावडरवर विक्रमी बोली लागली आहे. गुवाहाटी टी अक्शन सेंटरवर मंगळवारी एक किलो मनोहारी गोल्ड टीची 50 हजार रूपयांमध्ये विक्री झाली आहे. मागील वर्षी याच चहा पावडरची 39 हजार रूपयांमध्ये विक्री झाली होती. याआधी 2014 मध्ये अरूणाचल प्रदेशच्या डोनी पोलो टी एस्टेटची गोल्डन नीडव वैरायटी 40000 रूपये प्रती किलो विक्री झाली होती. […]
कोट्याधीश माकड राहणार महालात
कुणाचे नशीब कधी उजळेल हे सांगणे अवघडच. मग तो माणूस असो वा प्राणी. २८ फेब्रुवारी २०१७ ला जन्मलेल्या म्हणजे आता २ वर्षाचे झालेल्या एका माकडाला असाच जॅकपॉट लागलाय. म्हणजे त्याने लॉटरी खेळून बक्षीस कमावलेले नाही तर एका दयाळू माणसाने या माकडाला कोट्याधीश केले आहे. या माणसाचे नाव आहे शुभ्रान्षु शेखरनाथ आणि माकडाचे नाव आहे मिंटू. […]
भाजपच्या आयटी सेलच्या सदस्याला जातीयवादी पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक
मोरिगाव – फेसबुकवर जातीयविरोधी पोस्ट भाजपच्या आयटी सेलचा सदस्य असलेल्या नीतू बोराने टाकल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करताना त्याला अटक केली असून नुकतेच त्याला नोटीस देवून सोडण्यात आले आहे. याबद्दल माहिती देताना मोरीगाव जिल्ह्यातील पोलीस आयुक्त स्वप्निल डेका यांनी सांगितले, की बोराने फेसबुकवर एका जातीविरोधात पोस्ट टाकली होती. त्याच्याविरोधात याबद्दल राजु महंता याने गुन्हा दाखल केला होता. […]
या ठिकाणी पैसे न देताच करता येते खरेदी
कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर त्याचा दाम मोजावा लागतो. मग भले ते रुपये असतील, डॉलर असतील, पौंड असतील नाहीतर युरो असतील. भारतातील एका राज्यात मात्र एक ठिकाण असे आहे जेथे खरेदीसाठी पैसे मोजावे लागत नाहीत. हे ठिकाण आसाम राज्यातील मोरीगाव जिल्ह्यात असून त्याचे नाव आहे जुनबील. येथे दरवर्षी माघ महिन्यातल्या तिसऱ्या आठवड्यात तीन दिवसांची […]
शिवसागर- अमूल्य वारसा जतन केलेले पर्यटनस्थळ
पूर्वोत्तर राज्यातील आसामची राजधानी गोहाटी पासून ३६० किमीवर असलेले शिवसागर हे आपल्या अमूल्य इतिहासाचा वारसा जतन केलेले एक सुंदर ठिकाण आहे. ऐतिहासिक वारसा स्थळांबाबत पुस्तकात वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्यांनी ती पहिली हा इतिहास अधिक जिवंत होतो याचा अनुभव या ठिकाणी भेट दिल्यास नक्कीच येऊ शकेल. अहोम राज्वानाशाच्या अनेक खुणा येथे आजही आहेत. शिवाय नैसर्गिक सौंदर्य तर […]
पहिल्याच दर्शनाने प्रेमात पाडणारे धेमाजी
आसाम हे मुळातच निसर्गाने नटलेले राज्य. या राज्यात अरुणाचल सीमेजवळ वसलेले ऐतिहासिक आणि प्राचीन धेमाजी पर्यटकांना पहिल्याच दर्शनाने प्रेमात पडणारे स्थळ आहे. चोहोबाजूने दिसणारी हिरवीगार लुसलुशीत भात शेते, भाताचा दरवळणारा विशिष्ट सुगंध तर रब्बी हंगामात गेलात तर पिवळ्या सुंदर फुलांनी मोहरलेली सरसो म्हणजे मोहरीची शेते तुम्हाला सर्व चिंता, त्रास विसरायला लावतील. येथील प्राचीन कला संस्कृती […]
आसाम मध्ये पर्यटनाबरोबर लुटा खरेदीची मजा
भारताच्या ईशान्येकडील राज्यातील एक महत्वाचे आणि निसर्गसंपन्न राज्य म्हणजे आसाम. उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवासाचा बेत ठरत असेल तर आसामचा विचार नक्की करा. कारण येथे तुम्ही पर्यटनाचा आनंद मनमुराद लुटू शकालच पण येथील बाजारात खरेदीची मजाही अनुभवू शकाल. मुळात चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले हे राज्य. इथला चहा देशातच नाही तर परदेशात सुद्धा प्रसिद्ध. त्यामुळे सर्वप्रथम येथील चहाचे […]
आसाममधील ‘या’ शाळेत एकाच कुटुंबातील तब्बल ६५ मुले शिकतात
दिसपूर – आपल्या देशात एक अशी शाळा आहे जिथे एकाच कुटुंबातील एक-दोन नव्हे तर तब्बल ६५ मुले जातात, एकाच शाळेत शिकतात आणि सोबतच प्रार्थनाही म्हणतात. कदाचित, आपण कधीही असे चित्र बघितले नसेल. पण आम्ही आज अशाच एका शाळेचा परिचय आपल्याला करून देणार आहोत. ही शाळा आसाममधील बिस्वानथ विचलन गावात अजलाशुती प्राथमिक शाळा आहे. दोन वर्ग […]
आसाममध्ये बंगाली गाणे म्हटल्याबद्दल गायक शानवर हल्ला!
बॉलीवुडमधील प्रसिद्ध गायक शान (शांतनु मुखर्जी) याला आसाममधील एका कार्यक्रमात प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. बंगाली गाणे म्हटल्याबद्दल शान याच्यावर नुकताच हल्ला झाला. मात्र प्रेक्षकांनी केवळ कागदी गोळे फेकल्यामुळे त्याला फारशी इजा झाली नाही. गुवाहाटी येथे सोमवारी शान याचा एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात त्याने बंगाली गाणे म्हणायला सुरूवात केली. तेव्हा प्रेक्षकांचा पारा चढला. त्यांनी […]
आसाममध्ये नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयकाच्या निषेधार्थ १२ तासांचा बंद
आसाम – आज (२३ ऑक्टोबर) १२ तासांचा बंद राज्यातील ४६ संघटनांनी पुकारला असून हा बंद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१६च्या निषेधार्थ पुकारण्यात आला आहे. लोकांच्या मनात या विधेयकाबाबत मोठा संताप आहे. बंदला केएमएसएस, आसाम जातीयताबादी युबा छात्र परिषद यांनी पाठिंबा जाहीर केला असून बंद दरम्यान संपर्काची सर्व साधने बंद राहतील. तसेच, लोकांना खासगी वाहने न वापरण्याचेही […]