पुणे – पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने खंडणी प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची पत्नी आशा गवळी (५०) विरोधात गुन्हा दाखल केला असून ‘मम्मी’च्या नावाने गवळी गँगच्या सदस्यांनी एका व्यावसायिकाला धमकावून त्यांच्याकडे खंडणी वसुलीसाठी तगादा लावला होता. ही ‘मम्मी’ दुसरी तिसरी कोणी नसून आशा गवळी असल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे. आशा गवळी सध्या फरार असून […]
पुणे
पुणे
पुणे महापालिकेने जप्त केलेल्या २०० वाहनांची राखरांगोळी
पुणे – काल संध्याकाळी हांडेवाडी येथे जेएसपीएम कॉलेज जवळील मैदानात पावणेसातच्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त करून ठेवलेल्या सुमारे २०० वाहन जळून खाक झाली आहेत. अद्याप या आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. याबाबत पुणे महापालिकेचे प्रभारी अग्निशमन अधिकारी पंकज जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, हातगाडी, दुचाकी आणि चार चाकी गाड्या जप्त करून पुण्यातील हांडेवाडी सर्व्हे […]
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणतात; मोदी सरकार सर्वात भ्रष्ट
पुणे – राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राफेल विमान खरेदी हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असून मोदी सरकार या विमान खरेदीची माहिती दडवून ठेवत आहे. देशाच्या समोर ही माहिती आली पाहिजे. पण पंतप्रधान या प्रकरणावर चुप्पी साधून असल्याची टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाण २०१४ नंतर ‘भारताचा विकास किती खरा किती खोटा’ या विषयावर पुण्यात […]
सत्यशोधन समितीचा अहवाल; भीमा-कोरेगावमधील हिंसाचार पूर्वनियोजित
पुणे – सत्यशोधन समितीच्या अहवालात १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार हा माओवादी विचारांच्या संघटना आणि फुटीरतावादी गटांचा पूर्वनियोजित कट होता, असे मत मांडण्यात आले असून आंबेडकरी आणि हिंदुत्ववादी गटाचा यात काहीही संबंध नसल्याचेही अहवालात म्हटले आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी विवेक विचार मंच प्रणित विविध सामाजिक संघटनांनी सत्यशोधन समितीची स्थापना केली होती. या […]
देशातील लोकांना भाषणापेक्षा रोजच्या राशनची जास्त गरज – शत्रुघ्न सिन्हा
पुणे – भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा मोदींवर अली बाबा आणि चालीस चोरांचे दुकान चालणार नाही. परिवर्तन हा नियम आहे. त्यामुळे अहंकाराचा अंत हा होईल, अशी चौफेर टीका करत निशाणा साधला आहे. सिन्हा पुण्यात आयोजित वसंतदादा सेवा संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी यावेळी मोदींवर टीकास्त्र सोडले. भाजपचा २ वेळचा खासदार असल्यापासून या […]
अहमदनगर दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीला अटक
पुणे – पुणे जिल्ह्यातून अहमदनगरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल कोतकरला पोलिसांनी अटक केली असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व विभागप्रमुख वसंत ठुबे या दोघांची केडगाव उपनगरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एकूण ८ जणांना दुहेरी हत्या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आली होती. पण मुख्य आरोपी विशाल […]
प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन ऐक्याचे नेतृत्व स्वीकारावे- आठवले
पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा रिपब्लिकन ऐक्याची हाक दिली असून भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्याचे नेतृत्व स्वीकारावे. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. रिपब्लिकन ऐक्य झाले तरी लोकशाही आघाडीमधून बाहेर पडणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजप-शिवसेनेमध्ये […]
मिलिंद एकबोटेंना जामीन; तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा
पुणे – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना आज जामीन मंजूर झाला असून अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात एकबोटे यांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला असून दुसऱ्या प्रकरणातही जामीन मिळाल्याने त्यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे दोन गटात झालेल्या वादातून हिंसाचार झाला होता. वाहनांची हिंसाचारात तोडफोड तसेच वाहने पेटवून […]
एल्गार परिषदेच्या आयोजकांवर पोलिसांच्या धाडी
पुणे/नागपूर: कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालय आणि घरावर पुण्यातील एल्गार परिषदे प्रकरणी पोलिसांनी धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात एल्गार परिषद झाल्यानंतर भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी हिंसाचार उफाळला होता. दलित संघटनांनी त्याच्या निषेधार्थ ३ जानेवारीला राज्यभरात बंद पुकारला होता. या घटनेनंतर ७ जानेवारी २००८ रोजी पुणे पोलिसांनी […]
भुजबळांना चौकशीनंतरही तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा – प्रकाश आंबेडकर
पुणे – अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांना चौकशीनंतर जामीन मिळायला हवा. अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. संविधानाने त्यांना दिलेला तो अधिकार असल्याचे सांगत चौकशीनंतरही छगन भुजबळांना तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा असल्याचे म्हटले आहे. भुजबळांच्या सुटकेसाठी त्यांच्या समर्थकांनी यापूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तुरुंगात आमचा […]
पुण्याजवळ कोळवण येथे संघाचे चिंतन शिबीर सुरु
पुण्याजवळ मुळशी तालुक्यातील कोळवण या गावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाच दिवसांचे चिंतन शिबीर १७ एप्रिल पासून सुरु झाले असून या शिबिराला सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित आहेत. सिवाज देशाच्या विविध भागातून आलेले संघाचे प्रांतप्रमुखही हजर आहेत. संघाचे भविष्यातील नियोजन आणि आत्तापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी दर १० ते १२ वर्षांनी असे शिबीर घेतले जाते असे सरकार्यवाह […]
नगर दुहेरी हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा पुण्याच्या ‘ससून’मध्ये मृत्यू
अहमदनगर – पोलीस अधीक्षक कार्यालयात आमदार जगताप यांच्या समर्थनार्थ धुडगुस घातल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले नगरसेवक कैलास गिरवले यांचा पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल असल्याने त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांची सोमवारी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आमदार […]
सौरभ राव पुण्याचे नवे महापालिका आयुक्त; तर नवल किशोर राम जिल्हाधिकारी
पुणे – पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची बदली करण्यात आली असून पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची नियुक्त करण्यात आले आहे. मागील महिन्यात पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांचा साडेतीन वर्षांचा कालावधी झाल्याने त्यांची बदली झाली होती. आयुक्तपदाचा कार्यभार त्यांनी शासन आदेशानुसार दहा दिवसांपूर्वी सोडल्याने त्यांच्या जागी कोण येणार याकडे […]
माझ्या नादाला लागू नका; बापटांना अजित पवारांचा सज्जड दम
पुणे : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना अप्रत्यक्षपणे बापटांना दम भरला. मी शांत आहे, तोपर्यंत आहे, माझ्या नादाला लागू नका, असा इशारा अजित पवारांनी दिला. पुण्यात नारळ फोडण्याशिवाय अजित पवारांनी काहीच कामे केली नाहीत, अशी टीका बापटांनी केली होती. अजित पवारांनी या […]
पुण्यातील भाजप आमदारांनी सँडविच-मिठाईवर मारला आडवा हात
पुणे: काँग्रेसच्या देशव्यापी उपोषणाचा काही दिवसांपूर्वी फज्जा उडाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी भाजपकडून करण्यात आलेलेही उपोषणही इन्स्टंटच ठरले आहे. सँडविच आणि मिठाईवर भाजपच्या पुण्यातील बाळा भेगडे व भीमराव तापकीर या दोन आमदारांनी आडवा हात मारल्याचे व्हीडिओ सध्या व्हायरल झाले आहेत. अधिवेशनाचा अमूल्य वेळ काँग्रेसमुळेच वाया गेला, असा भाजपचा आरोप असून देशभरातील भाजपच्या खासदार आणि आमदारांकडून […]
दहावीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे गुणगान
पुणे : आता महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता असून दहावीच्या अभ्यासक्रमात यंदापासून राज्यशास्त्र हा विषय समाविष्ट करण्यात आला असून भाजप आणि शिवसेनेचे गुणगान करण्यात राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात आले आहे तर कॉँग्रेसवर तसेच कम्युनिस्ट पार्टीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राजकीय सद्यस्थिती, तसेच पक्षांबाबतचे उल्लेख या पुस्तकामध्ये आहेत. त्यातील काही […]
भाजपमुळे बदनाम झाले गाजर – अजित पवार
पुणे – पिंपरी चिंचवड येथील हल्लाबोल मोर्चातील जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेवर येण्याधीपासून आश्वासनांचे गाजर भाजपने दिले असून गाजर म्हणत आहे भाजपमुळे मी बदनाम झाले आता माझे नाव बदला असा टोला लगावला आहे. अजित पवारांची जीभ मात्र यावेळी गॅसदरवाढीवर बोलताना घसरली. गॅसचे दर किती असा प्रश्न पिंपरी […]
राष्ट्रवादी काँग्रेसमधील सडके आंबे भाजपमध्ये आणून, आपले आंबे सडवू नका
पुणे: पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मावळमध्ये बोलत असताना एक सडका आंबा सगळे आंबे सडवतो. त्यामुळे भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील सडके आंबे आणून, आपले आंबे सडवू नका, अशी खोचक टीका केली आहे. भाजपमध्ये मावळ तालुक्यातील कार्ला येथील अनेक शिवसैनिकांनी प्रवेश केला. बापट यांनी त्यावेळी बोलताना राष्ट्रवादीवर खोचक टीका केली. दुसरीकडे भाजपचा शिवसेना हा मित्र पक्ष असल्याने, […]