मॅकबूक प्रो बॅटरी फ्री रिप्लेस करण्याची घोषणा अॅपलने केली असून आपल्या सपोर्टपेजवर कंपनीने म्हटले आहे की, १३ इंचीच्या नॉन टॉच बार ‘मॅकबूक प्रो’चे काही युनिट्स बॅटरीमुळे फेल झाले असल्यामुळे सुरक्षेला कोणताही धोका नाही. पण ज्यात मॅकबूकमध्ये ही अडचण आली आहे, असे मॅकबूक ऑक्टोबर २०१६ ते ऑक्टोबर २०१७ च्या दरम्यान बनवण्यात आले होते. तुमच्याकडे जर मॅकबूक […]
तंत्र – विज्ञान
तंत्र - विज्ञान
अफवा पसरवणाऱ्यांना दणका देणार व्हॉट्सअॅपचे हे फिचर
मुंबई : अफवा पसरवल्यामुळे होणारे नुकसान केवढे घातक ठरू शकते याचे उदाहरण नुकत्याच झालेल्या भारत बंद दरम्यान दिसून आले. पण आता व्हॉट्सअॅपचे अशा अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन फिचर येणार आहे. एखादा मेसेज व्हॉट्सअॅपवर जास्तवेळा फॉरवर्ड झाला, तर तो आता पकडता येणार आहे. अशा अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर व्हॉट्सअॅप घेऊन येत आहे. एखादा मेसेज जर २५ […]
इनफोकसचा व्हिजन ३ प्रो भारतात लाँच
इनफोकस कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन इनफोकस व्हिजन ३ प्रो भारतात लाँच केला असून त्याची किंमत आहे १०,९९९ रुपये. या फोनला दोन सीम वापरता येतात तसेच एक सीम आणि मायक्रोएसडी किंवा एक सीएम वापरण्याची सुविधा दिली गेली आहे. या फोनसाठी ५.७ इंची एचडी डिस्प्ले, अँड्राईड ७.० नगेत ओएस, ४ जीबी रॅम, ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज, मायक्रो […]
आता फेसबुकवरून करता येणार करा मोबाइल रिचार्ज
नवी दिल्ली: सोशल नेटवर्किंगमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या फेसबुकवरून आता मोबाइल रिचार्ज देखील करता येणार आहे. यासाठी तुमच्याकडे एंड्रॉईड फोन असेल तर फेसबुकचे मोबाइल रिचार्ज फीचर फोनवर उपलब्ध आहे. कोणत्याही कंपनीचे रिचार्ज फेसबुकच्या मोबाइल रिचार्ज फीचर वरून करता येणार आहे. पण फेसबुकचे हे नवीन मोबाइल रिचार्ज फीचर आयफोन वापरणाऱ्यांना मिळायला उशीर होणार आहे. लवकरच हे फीचर आयओएस […]
तीन वर्षात ५ जी युजर ११ कोटींवर जाणार
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार २०२१ पर्यंत ५ जी शिप्मेंत २५५ टक्क्यांनी वाढून युजरचा आकडा ११ कोटीवर जाणार आहे. ५ जीची प्रगती २०१९ मध्ये थोडी संथ असेल मात्र एकदा पायाभूत सुविधा वाढल्या कि हा व्यापार वेगाने गती घेईल असे संकेत मिळत आहेत. जगभर अनेक देशात ५ जी तंत्रज्ञानावर काम सुरु असले तरी अमेरिका, चीन जपान […]
अॅप डाऊनलोड करण्यात भारतीयांचा क्रमांक पहिला
मोबाईल वरील अॅप डाऊनलोड करण्याच्या बाबतीत भारतीय लोकांनी पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे. गूगल प्ले स्टोर आणि एप्पल मार्केटमधून डाउनलोड करणाऱ्या वापरकर्त्यांमध्ये भारतीय लोकांची संख्या सर्वाधिक आहे असे एका ताज्या अहवालातून समोर आले आहे. अॅप मार्केट क्षेत्रात संशोधन करणाऱ्या अॅप अॅनी या कंपनीने हा अहवाल दिला आहे. मार्च 2018 मध्ये संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने अहवाल […]
‘ट्राय’च्या नव्या वेबसाईटवर सर्व कंपन्यांचे प्लॅन
मुंबई : सर्व दूरसंचार कंपन्यांच्या टॅरिफ प्लॅनची माहिती ग्राहकांना आता एकाच ठिकाणी मिळणार असून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’ने यासाठी नवी वेबसाईट लाँच केली असल्याची माहिती सोमवारी देण्यात आली. वेगवेगळ्या टॅरिफ प्लॅन्सची माहिती ‘ट्राय’ची नवी वेबसाईट (http://tariff.trai.gov.in) वर डाऊनलोड करता येईल अशा फॉरमॅटमध्ये ती माहिती उपलब्ध आहे. ग्राहकांना यामुळे सर्व कंपन्यांच्या टॅरिफ प्लॅनशी तुलना […]
फेसबुकने आपल्या अॅपमध्ये केले महत्वपूर्ण बदल!
मुंबई : फेसबुक युजर्सच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेवर केम्ब्रिज अॅनालिटिकामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. ही विश्वासार्हता आता पुन्हा मिळवण्यासाठी फेसबुकने पावले उचलण्यास सुरुवात केली असून भारताचाही संबंध केम्ब्रिज अॅनालिटिका प्रकरणाशी जोडला गेल्यामुळे भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी फेसबुकने आपल्या अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. फेसबुकच्या माध्यमातून शेअर होणाऱ्या वैयक्तिक माहितीवर […]
सॅमसंगने विद्यार्थी वर्गासाठी आणला बेसिक स्मार्टफोन जे २ प्रो
सॅमसंगने डाटा अॅक्सीस शिवाय वापरता येणारा स्मार्टफोन बाजारात आणला असून हा फोन खास विद्यार्थी वर्गाला नजरेसमोर ठेऊन बनविला गेला आहे. यामुळे फोन वापरला तरी परीक्षा काळात विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होणार नाही असा कंपनीचा दावा आहे. गॅलेक्सि जे २ प्रो असे या फोनचे नाव आहे. या फोनसाठी वेगळी टेक्निकल फीचर्स दिली गेली आहेत. या फोनला ३ […]
व्हॉट्सअॅपवरून डिलीट झालेली फाईल पुन्हा डाऊनलोड करता येणार!
मुंबई : अँड्रॉईड युझर्ससाठी व्हॉट्सअॅपने नवे फीचर आणले असून फोनमधून डिलीट झालेली मीडिया फाईल पुन्हा डाऊनलोड न होणे ही सर्वात मोठी समस्या युझर्ससाठी होती. पण ही समस्या व्हॉट्सअॅपने आता दूर केली असून व्हॉट्सअॅपवर फोनमधून डिलीट झालेल्या फाईल्स पुन्हा डाऊनलोड करता येतील. मोबाईलमधील फोटो, जीआयएफ, व्हिडीओ, ऑडिओ किंवा एखादी डॉक्युमेंट फाईल एखाद्या युझरने डिलीट केली असेल […]
गुगलमध्ये मृत्युनंतरही कर्मचाऱ्यांना दिला जातो पगार
ज्या कंपनीत कर्मचाऱ्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जाते ती कंपनी नोकरीसाठी योग्य असे मानले जाते आणि अश्याच एखाद्या कंपनीत नोकरी मिळावी अशी जवळजवळ प्रत्येकाची इच्छा असते. अर्थात बहुतेक कंपन्या तुम्ही जोपर्यंत तेथे काम करता तोपर्यंत तुमची सर्वतोपरी काळजी घेतातही पण काही कारणाने कर्मचार्याला मृत्यू आला तर त्याच्या कुटुंबाची काळजी घेणाऱ्या किती कंपन्या असतील? जगभरात लोकप्रिय असलेली […]
फसवी आहे एअरटेलची जाहिरात, उच्च न्यायालयाचा निर्णय
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने एअरटेल कंपनीला चपराक लगावली असून एक विशिष्ठ प्लॅन एअरटेलच्या ग्राहकांना घेतल्यामुळे आयपीएलचे सामने मोबाईलवर मोफत पाहता येतील, अशी जाहिरात करणे चुकीचे असल्याहा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. जिओने एअरटेलच्या या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने त्यावर जिओच्या बाजूने निर्णय दिला असून आता […]
सलग तिसऱ्या वर्षी पगार नाही घेणार ट्विटरचा सीईओ
ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी सलग तिसऱ्या वर्षी पगार न घेण्याची घोषणा केली आहे. इतकेच नव्हे तर एक पैसाही घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. अमेरिकी सुरक्षा आणि विनिमय आयोगापुढे (एसईसी) ट्विटरने नियमानुसार आपले विवरण सादर केले आहेत. त्यात कंपनीने म्हटले आहे, की “ट्विटरच्या दीर्घकालीन मूल्य सृजनाच्या क्षमतेबाबत आपली प्रतिबद्धता आणि भरवशामुळे […]
आर्कुटचे भारताला पुन्हा हॅलो
आर्कुट डॉट कॉम या एके काळी भारतात अतिलोकप्रिय झालेल्या सोशल नेटवर्किंग साईटने भारताला पुन्हा आपलेसे केले असून हॅलो अॅपसह भारतात प्रवेश केला आहे. ऑर्कुटचे संस्थापक आर्कुट बुयुरखोकेन यांनी हे अॅप भारतात बुधवारी लाँच केले असून ते व त्यांची टीम भारतात मुंबई, दिल्ली, बंगलोर, चेन्नई, हैद्राबाद शहरांना भेटी देणार आहे. डेटा लिक प्रकरणात फेसबुक बदनाम झाल्याचा […]
सॅमसंगचा ड्युअल रिअर कॅमेरा स्मार्टफोन लॉन्च
भारतीय बाजारपेठेत दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने आपला नवा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी जे ७ ड्यूओ लॉन्च केला असून या फोनची खासियत म्हणजे यात ड्युअल कॅमेरा सेटअप आणि अँड्रॉईड ओरियो देण्यात आले आहे. हा सॅमसंग कंपनीचा सर्वात स्वस्त ड्युअल कॅमेरा सेटअप असलेला स्मार्टफोन आहे. रिअर ड्युअल कॅमेरा सेटअप या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला असून त्यामध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी […]
शाओमीचा मी ए २ येतोय २५ एप्रिलला
चीनी स्मार्टफोन कंपनीने २५ एप्रिलला एक इवेन्ट आयोजित केला असून यात मी ६ एक्स म्हणजेच मी ए २ हा स्मार्टफोन सादर केला जाईल असे संकेत दिले आहेत. कंपनीच्या अधिकृत विबो साईटवर याचा एक टीझर जारी केला गेला आहे. अर्थात यावर हँडसेटच्या नावाचा खुलासा केला गेला नसला तरी शाओमिच्या तीन स्मार्टफोन संबंधी माहिती दिली गेली आहे. […]
सिम असलेला लॅपटॉप सादर करणार रिलान्यस जिओ!
मुंबई : स्वस्त इंटरनेट सेवा आणि स्वस्त मोबाईल सेवा देऊन इतर टेलीकॉम कंपन्यांच्या नाकी नऊ आणणाऱ्या रिलायन्स जिओ कंपनीने अजून एक धमाका केला आहे. सिमकार्ड असलेला लॅपटॉप आता कंपनी लॉन्च करणार आहे. आपला अॅव्हरेज रेव्हून्यूवर युजर वाढवण्याचा प्रयत्न कंपनी करत असून त्यासाठी हा सिम कार्ड असलेला लॅपटॉप फायदेशीर ठरेल. गेल्या वर्षी ४ जी फिचर फोन […]
गुगल असिस्टंटशी लग्न करण्यास ४.५ लाखांहून अधिकजण तयार
गुगल असिस्टंटचा आवाज अँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांनी कधी ना कधी ऐकलाच असेल. सध्या जगभरात गुगलची ही सुविधा मोठ्या प्रमाणात वापरली जाते. कोणतीही गोष्ट आपण बोललो की गुगलवर त्याबद्दलची सगळी माहिती एका महिलेच्या आवाजात आपल्याला मिळते. भारतीयांसाठी या महिलेचा आवाज अतिशय खास आहे. कारण भारतीयांना या महिलेचा आवाज खूप आवडतो असे नुकतेच समजले आहे. त्याचबरोबर एक दोन […]