दोन विश्वकप जिंकण्यात महत्वाचे योगदान दिलेला टीम इंडियाचा सलामीवीर गौतम गंभीर याने त्याचे पहिले प्रेम भारतीय सेना हे होते आणि ते न मिळाल्याची खंत आयुष्यभर राहील अशी मन कि बात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना बुधवारी व्यक्त केली. तो म्हणाला १२ वी झाल्यानंतर मी रणजी सामना खेळलो नसतो तर नक्कीच एनडीए मध्ये गेलो असतो. मात्र […]
क्रिकेट
VIDEO: धोनीने केलेले काम पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमानच वाटेल
हॅमिल्टन (न्यूझीलंड): भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 वन डे सामन्यात 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताने या पराभवामुळे टी-20 मालिका 1-2 ने गमावली. भारतीय क्रिकेटप्रेमींना या पराभवाचे शल्य असले, तरी क्रिकेटप्रेमींचा उर टीम इंडियाचा आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनीचं देशप्रेम पाहून देशप्रेमाने भरुन आला. 213 धावांचे लक्ष्य भारताला या सामन्यात देण्यात आले होते, मात्र भारताला 20 […]
भारत आणि इंग्लंड विश्वचषकाचे प्रबळ दावेदार – रिकी पाँटिंग
भारत आणि इंग्लंड यावर्षी होणाऱ्या विश्वचषकाचे प्रबळ दावेदार असल्याचे मत माजी दिग्गज फलंदाज आणि सध्या ऑस्ट्रेलिया संघाचा साहाय्यक प्रशिक्षक रिकी पाँटिंगने व्यक्त केले आहे. तर, विश्वचषक जिंकण्याची संधी ऑस्ट्रेलियाच्या संघालाही आहे. This bloke knows a thing or two about winning the @cricketworldcup… https://t.co/xOUo1jBHpm — cricket.com.au (@cricketcomau) February 10, 2019 ऑस्ट्रेलियाच्या संघाबद्दल पाँटिंगला विचारले असता तो […]
शेन वॉर्न राजस्थान रॉयल्सचा ब्रँड अॅम्बेसेडर
मुंबई – आयपीएलच्या आगामी हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. २००८ साली झालेल्या आयपीएल पहिल्या सत्रात राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्नच्या नेतृत्वात विजेतेपद पटकावले होते. .@ShaneWarne talks about the new season, the new challenges and the significance of Pink 💗 pic.twitter.com/ThFWXDQKuR — Rajasthan Royals (@rajasthanroyals) February 10, 2019 […]
माही बनला ३०० टी २० खेळणारा पहिला खेळाडू
टीम इंडियाचा माजी कप्तान, विकेटकीपर आणि फलंदाज महेंद्रसिंग धोनी याने रविवारी त्याच्या क्रीडा करियर मधील आणखी एक विक्रम नोंदविला. धोनी न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात ३०० वा सामना खेळणारा भारतीय क्रिकेटपटू बनला. ३०० अथवा त्याहून अधिक टी २० खेळणारा धोनी जगातला १२ वा खेळाडू आहे. अर्थात हा विक्रम करताना धोनी केवळ २ धावा […]
रणजी विजेता विदर्भ संघाला 5 कोटींचे इनाम
मुंबई – विदर्भ क्रिकेट असोसिएशनने आणि बीसीसीआयने सलग दुसऱ्यांदा रणजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या विदर्भाला त्यांच्या धडाकेबाज कामगिरीसाठी रोख रकमेचे इनाम घोषित केले आहे. त्यानुसार क्रिकेट असोसिएशनने ३ तर बीसीसीआयने विदर्भासाठी २ कोटी रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. विदर्भाने अंतिम फेरीत सौराष्ट्रावर ७८ धावांनी मात करत सलग दुसऱ्यांदा रणजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विदर्भाने पहिल्या हंगामात दिल्लीवर […]
विश्वचषकात धोनीचा अनुभव कामी येईल – युवराज सिंह
नवी दिल्ली – मे महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठीच्या संघात महेंद्रसिंह धोनीचा अनुभव कामी येईल त्यामुळेच त्याचे संघात असणे गरजेचे असल्याचे भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने म्हटले आहे. धोनी संघात असल्यास तो विराटला निर्णय घेण्यासाठी चांगली मदत करतो. धोनीच्या एकदिवसीय संघातील स्थानावरुन गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक माजी खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या […]
तामिळनाडू संघाचे नेतृत्व करणार आर.अश्विन
मुंबई – मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीत तामिळनाडू संघाचे भारतीय कसोटी संघाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन नेतृत्व करणार आहे. २१ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान ही मालिका होणार आहे. नुकतीच या संघाची घोषणा करण्यात आली. पण त्या संघात मुरली विजयला स्थान देण्यात आले नाही. त्याचा पत्ता खराब फॉर्ममुळे कट करण्यात आला आहे. संघात युवा अष्टपैलू खेळाडू […]
ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकण्यासाठी घेतली ‘पंटर’ची मदत
सिडनी – इंग्लंडमध्ये मे-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून माजी कर्णधार रिकी पाँटिंगला नियुक्त करण्यात आले आहे. त्याच्यावर संघाची फलंदाजी मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गोलंदाजी प्रशिक्षक डेविड साकेर यांच्या जागेवर ५ विश्वचषक खेळून ३ विश्वचषक जिंकून देणाऱ्या पाँटिंगची नियुक्ती झाली आहे. नुकताच साकेर यांनी राजीनामा दिला होता. याबाबत बोलताना क्रिकेट […]
दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहितची विश्वविक्रमाला गवसणी
ऑकलंड : एक नवा विश्वविक्रम भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने रचला आहे. रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्धशतकी खेळी साकारत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात रोहितने 29 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 50 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. रोहितच्या या खेळीसह आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा झाल्या आहेत. यापूर्वी न्यूझीलंडच्या मार्टीन गप्तीलच्या […]
दुस-या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 7 गडी राखून विजय
ऑकलंड : भारताने न्यूझीलंड विरुद्धचा दुसरा टी-20 सामना गोलंदाजांचा भेदक मारा आणि दमदार सलामीच्या जोरावर जिंकला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 158 धावा केल्या होत्या. रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने या आव्हानाचा सहज पाठलाग केला. त्याचबरोबर शिखर धवन (30), ऋषभ पंत (40), विजय शंकर (14) आणि महेंद्र सिंह धोनीने (14) धावांचे योगदान दिले. भारताच्या कृणाल पंड्याने […]
चहल तु माझ्यासाठी आणि संघासाठी प्रेरणादायक – स्मृती मंधाना
ऑकलंड – भारतीय महिला आणि पुरुष संघ सध्या न्यूझीलंड दौ-यावर आहेत. भारतीय पुरुष संघाने एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता न्यूझीलंड विरुध्द 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरु आहे. पहिल्या टी-20 सामन्यात भारताच्या महिला आणि पुरुष संघाचा पराभव झाला आहे. आज दुसरा टी-20 सामना ऑकलंड येथे खेळवला जात आहे. याआधी चहल टीव्हीवर भारतीय महिला संघाची धडाकेबाज सलामीवीर स्मृती […]
६ महिन्यानंतर वेस्ट इंडिज संघात ख्रिस गेलची वापसी
मुंबई – वेस्ट इंडिजच्या संघात जगातील सर्वाधिक विस्फोटक फलंदाजांपैकी एक असलेल्या ख्रिस गेलचे पुनरागमन झाले आहे. वेस्ट इंडिजच्या संघाची इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या २ एकदिवसीय सामन्यांसाठी घोषणा झाली आहे. ख्रिस गेलचा यात समावेश करण्यात आला आहे. त्याचसोबत राष्ट्रीय संघात डाव्या हाताने फलंदाजी करणारा निकोलस पूरन याचीही निवड झाली. २० फेब्रुवारीला दोन्ही संघात पहिला एकदिवसीय सामना […]
टी२० सामन्यात सर्व बाद १० रन्सचे रेकोर्ड
द. ऑस्ट्रेलियात महिला क्रिकेट टीमने स्थानिक टी २० स्पर्धा सामन्यात नवीनच विक्रम नोंदविला, नॅशनल इंडीजीनस क्रिकेट चँपियनशिप स्पर्धेत बुधवारी साउथ ऑस्ट्रेलिया महिला टीमला १० रन्सवर औट केले. विशेष म्हणजे या १० धावांपैकी ६ वाईड बॉलवर मिळाल्या होत्या आणि सलामीला आलेल्या फेबी मन्सेल हिने चार धावा काढल्या. त्याही ३३ चेंडू खेळून. बाकी सर्व खेळाडूना भोपळा फोडता […]
विदर्भाने सलग दुसऱ्यांदा जिंकला रणजी चषक
सलग दुसऱ्या हंगामात मानाच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद कर्णधार फैजल फजलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाने पटकावले आहे. विदर्भाने अंतिम सामन्यात सौराष्ट्रावर 78 धावांनी मात केली. विदर्भाचे हे दुसरे रणजी विजेतेपद ठरवले. विदर्भाने विजयासाठी दिलेले 207 धावांचे आव्हान पार करताना सौराष्ट्राचा संघ 127 धावांपर्यंतच मजल मारु शकला. विदर्भाच्या विजयात फिरकीपटू आदित्य सरवटेने मोलाची भूमिका […]
विश्वचषक स्पर्धेला मुकणार स्टीव्ह स्मिथ
मेलबर्न – यावर्षी होणा-या विश्वकरंडक स्पर्धेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपूर्वी स्टीव्ह स्मिथच्या कोपऱ्याला दुखापत झाली होती. आता त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे तो विश्वचषक स्पर्धेपर्यंत तंदुरुस्त होण्यावर प्रश्नचिन्ह आहेत. याबाबत माहिती देताना स्मिथचा व्यवस्थापक वॉरेन क्रेग यांनी सांगितले, लवकरच स्मिथवर शस्त्रक्रिया होणार आहे. परंतु, यानंतर त्याला शारीरिक […]
पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा दारूण पराभव
वेलिंग्टन : जगातील सर्वोत्तम फलंदाजांची फळी असलेल्या भारतीय संघाला न्युझीलंड संघाने दिलेल्या 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयश आले. पाहुण्या भारताला न्यूझीलंडने 139 धावांवर रोखले आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. हा सामना न्यूझीलंडने 80 धावांनी जिंकला. न्यूझीलंडला कॉलीन मुन्रो आणि टीम सेइफर्ट यांनी शानदार सुरुवात करून दिली. सुरुवातीपासूनच दोघांनी आक्रमक खेळ […]
विश्वचषकात बुमराह भारताचा हुकमी ‘एक्का’ – सचिन तेंडुलकर
मुंबई – सध्या क्रिकेटच्या सर्वच प्रकारात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया चमकदार कामगिरी करत असल्यामुळे २०१९ विश्वचषक स्पर्धेचा भारताचा संघ प्रबळ दावेदार असल्याचे मत माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले. आता काही महिनेच विश्वचषकाला उरले आहेत. सचिनला त्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला, की या विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी कोणता खेळाडू निर्णायक ठरेल? सचिनने त्यावर […]