युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांनी तोंडाचा उपयोग ओरल सेक्ससाठी केला जाऊ नये. कारण तोंड हे खाण्यासाठी असते, असे वक्तव्य केले असून ओरल सेक्ससाठी तोंडाचा उपयोग केला जाऊ नये. कारण तोंड हे खाण्यासाठी असते, असे वक्तव्य युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांनी केले आहे. ओरल सेक्सवर आपल्याला देशात बंदी घालायची असल्याचे त्यांनी म्हटले. सध्या मुसेवेनी यांचा एक […]
आंतरराष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
जर्मनीला भेडसावतेय लांडग्यांची समस्या
जर्मनीत अनेक दशकांनतंर लांडग्यांची संख्या वाढल्यामुळे पर्यावरणवाद्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र शेतकऱ्यांनी या लांडग्यांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. रानडुकरे आणि हरणांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी लांडगे आवश्यक आहेत. परंतु ते कधी कधी शेतकऱ्यांच्या गोठ्यात शिरून शेळ्या-मेंढ्या फस्त करतात. हा मुद्दा एवढा तीव्र बनला आहे, की जर्मन संसद बुंडेसटागमध्येही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. […]
सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचे चाळे केल्याबद्दल जोडप्यांना फटक्यांची शिक्षा
सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचे चाळे केल्याबद्दल इंडोनेशियात अनेक जोडप्यांना सर्वांसमक्ष कटके मारण्याची शिक्षा देण्यात आली. त्यांच्यासोबत दोन महिलांना देहविक्रय केल्याबद्दल शिक्षा देण्यात आली. आसेह या प्रांतातील अशा प्रकारची ही शेवटचीच शिक्षा होती, कारण या प्रांतात यापुढे सर्वांसमोर फटके मारणार येणार नाहीत. ही शिक्षा बंद दाराआडच दिली जाईल, असे या प्रांताच्या गव्हर्नरनी जाहीर केले आहे. शरिया कायद्यानुसार […]
होय, लैंगिक गैरवर्तन घडले! नोबेल समितीची कबुली
नोबेल पुरस्कारांच्या साहित्यविषयक समितीमध्ये लैंगिक गैरवर्तन झाल्याची कबुली या समितीने दिली आहे. “अस्वीकारार्ह वर्तन घडले आहे आणि यामुळे साहित्यातील नोबेल पुरस्काराचे प्रतिष्ठा गंभीरपणे डागाळली गेली आहे,“ असे समितीने म्हटले आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार जीन क्लॉड अर्नॉल्ट यांनी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप 18 महिलांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये जाहीरपणे केला होता. जीन क्लॉड हे या समितीचे सदस्य असलेल्या कॅटरिना […]
पर्यटकांनी केलेल्या दगडफेकीत कांगारूचा मृत्यू
प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी आलेल्या उपद्रवी पर्यटकांनी केलेल्या दगडफेकीत त्या प्राणीसंग्रहालयातील मादी कांगारूचा मृत्यू झाला. तसेच एक कांगारू जखमीही झाली. चीनमध्ये ही घटना घडली आहे. चीनच्या आग्नेय भागात असलेल्या फुजियान प्रांतातील फुजू प्राणिसंग्रहालयात मार्च महिन्यात ही घटना घडली होती. अधिकाऱ्यांनी तपास केला तेव्हा अनेक पर्यटकांनी एकाच वेळेस या कांगारूला दगड मारल्याचे दिसून आले. या पर्यटकांनी या कामगारांचे […]
कतारमध्ये भारतीय घेऊ शकणार स्वतःचे घर
कतार सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विदेश नागरिकांसाठी एक चांगला निर्णय घेतला आहे. सरकारने विदेशी लोकांना संपत्ती अधिग्रहण कायदा संमत केला असून त्यामुळे येथे राहणारे विदेशी आता स्वतःच्या मालकीची घरे, इमारती घेऊ शकतील तसेच अन्य मालमत्ता करू शकतील. अर्थात त्यासाठी काही नियम ठरविले गेले असून नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. यापूर्वी कतारमधील महिलेशी विवाह करणाऱ्या […]
किम जोंगच्या ‘या’ निर्णयाचे अमेरिकेने केले स्वागत
वॉशिंग्टन – नेहमीच अमेरिकेबरोबर युद्धाची भाषा करणाऱ्या उत्तर कोरियाला काही प्रमाणात लगाम घालण्यात अमेरिकेला यश आले असून आपण यापुढे अण्वस्त्र परीक्षण करणार नाही अशी घोषणाच उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग यांनी केली आहे. अमेरिकेने यावर प्रतिक्रिया देत या भूमिकेचे स्वागत केले आहे. यापुढे आंतरखंडीय माऱ्याच्या क्षेपणास्त्रांची उत्तर कोरिया चाचणी करणार नाही. तसेच अण्वस्त्रांचीही चाचणी करणार […]
पंतप्रधानांच्या दौऱ्यात तिरंग्याचा अपमान – ब्रिटनकडून माफी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंग्लंड दौऱ्यात तिरंग्या ध्वजाच्या झालेल्या अवमाननेबद्दल ब्रिटनने माफी मागितली आहे. मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान काही कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती, तेव्हा ही अवमानना झाली होती. भारतातील लैंगिक अत्याचारांच्या कथित घटनांच्या विरोधात लंडनमधील पार्लमेंट स्क्वायर येथे काही कार्यकर्त्यांनी ही निदर्शने केली होती. त्यावेळी भारताने तिरंग्याच्या अवमाननेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हा झेंडा […]
फेसबुकवर खोटे लाईक करणे इस्लाममध्ये हराम – मुस्लिम धर्मगुरुचा फतवा
मुस्लिम धर्मियांच्या दृष्टीने हराम असलेल्या विविध गोष्टींमध्ये आता आणखी एकाची भर पडली आहे. अन्य बाबींसोबतच फेसबुकवरून खोटे लाईक करणे हेही इस्लामच्या दृष्टीने निषिद्ध असल्याचा फतवा एका धर्मगुरुने काढला आहे. शकवी अल्लाम असे या धर्मगुरुचे नाव असून तो इजिप्तमध्ये राहतो. त्याने यापूर्वी व्हर्च्युअल चलनावरही एक फतवा जारी केली होता. बिटकॉईनचा वापर करणे हे जुगार खेळण्यासारखे असल्याचे […]
पाकिस्तानातील गावाला दिले चक्क ‘मलाला’चे नाव
रावळपिंडी (पाकिस्तान) – सर्वात तरुण वयाची नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफजाईचे नाव पाकिस्तानच्या रावळपिंडी जिल्ह्यातील एका गावाला देण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्ते बशीर अहमद यांनी ट्विटरवरुन दिली आहे. मलाला २०१२ मध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात थोडक्यात बचावली होती. ती त्यानंतर परदेशात स्थलांतरित झाली होती. मलाला हिला २०१४ साली वयाच्या सतराव्या वर्षी […]
शीख महिला यात्रेकरूंचे पाकिस्तानात बळजबरीने धर्मांतर, लग्न
पाकिस्तानातील गुरुद्वाऱ्यांमध्ये दर्शन घेण्यासाठी गेलेल्या महिला यात्रेकरूंचे अपहरण करून व बळजबरीने् धर्मांतर करून तिचे लग्न लावून देण्याची घटना समोर आली आहे. किरण बाला असे या महिलेचे नाव असून ती पंजाबमधील राहणारी आहे. मागील आठवड्यात 13 एप्रिल रोजी शीख यात्रेकरूंचा एक जत्था पाकिस्तानातील पंजाब साहिब गुरुद्वारा आणि नानकाना साहिब गुरुद्वारा येथे दर्शनासाठी गेला होता. मात्र या […]
रोज २ किलो शिव्यांचा खुराक हे माझ्या आरोग्याचे रहस्य- पंतप्रधान मोदी
तुमच्या आरोग्याचे आणि उत्साहाचे रहस्य काय, जमलेल्या समुदायातील एका व्यक्तीकडून प्रश्न येतो आणि थोडे हसून उत्तर मिळते, गेली २० वर्षे रोज किमान दोन किलो शिव्या खाणे. टाळ्यांच्या गडगडाट होतो हे सांगायला नकोच. ही आणि अशीच प्रश्नोत्तरे रंगली होती भारत कि बात, सबके साथ या गीतकार प्रसून जोशी यांनी कम्पेरिंग केलेल्या लंडनच्या सेन्ट्रल हॉल वेस्टमिन्सटर मध्ये. […]
बलात्काराच्या घटनांवर मोदींनी लंडनमध्ये सोडले मौन
लंडन- देशभरातून जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला असून आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी बलात्काराच्या घटनांचे राजकारण करू नये असे त्यांनी लंडनमधील वेस्टमिंस्टर सेंट्रल हॉलमध्ये आयोजित केलेल्या ‘भारत की बात सबके साथ’ या कार्यक्रमात म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील ८ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे राजकारण करू […]
पाकिस्तानला कसे उत्तर द्यायचे ते मला चांगले कळते – नरेंद्र मोदी
लंडन – दहशतवादाची निर्यात करणारा पाकिस्तान कारखाना असून आम्ही २०१६ मध्ये उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक केला भारत आता असे हल्ले खपवून घेणार नाही हा संदेश देण्याचा त्यामागे त्यावेळी उद्देश होता. आम्हाला शांतता हवी आहे पण त्यासाठी दहशतवादाला खतपाणी घालणे, दहशतवादाची निर्यात अजिबात सहन करणार नाही. ज्या भाषेत त्यांना समजते त्यांना त्याच भाषेत उत्तर […]
किम जोंग उन अमेरिकेला जाणार नसल्याचा दावा
उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याच्या भेटीची तयारी जोरात सुरु असल्याच्या कितीही बातम्या आल्या तरी किम जोंग कोरिया सोडून ट्रम्प याच्या भेटीसाठी कोरीयाबाहेर जाणार नाही असा दावा केला जात आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्था सीआयए चे संचालक माईक पोम्पियो यांनी किम जोंग याची नुकतीच भेट घेतली आहे तरीही हा दावा […]
डॉलर्सच्या मोबदल्यात मुशर्रफनी विकले पाकिस्तान्यांना
पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेज मुशर्रफ यांनी डॉलर्सच्या मोबदल्यात अमेरिका आणि अन्य देशांना तब्बल चार हजार पाकिस्तानी नागरिक विकले असा आरोप खुद्द पाकिस्तानमधील सरकारी संस्थेने केला आहे. पाकिस्तानच्या हरवलेल्या व्यक्तीबाबत शोध घेणाऱ्या संस्थेने हा आरोप केला आहे. या नाहीशा झालेल्या व्यक्तींपैकी 70 टक्के व्यक्ती दहशतवाद गुंतलेल्या होत्या, असेही संस्थेने म्हटले आहे. नॅशनल कमिशन फॉर एन्फोर्स्ड डिसअॅपिअरन्सेस […]
पाकिस्तानची शीख दहशतवाद्यांना भारतात कुरापती करण्यासाठी फुस
लाहोर – शीख दहशतवाद्यांचा प्रमुख असलेल्या गोपाल सिंग चावला याच्यासोबत जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईद हा दिसल्यामुळे शीख दहशतवाद्यांना पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि जमात-उद-दावा या भारतात कुरापती करण्यास पाठिंबा देत असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानच्या सूचनांनुसार गोपाल सिंग चावला याने भारताच्या राजदूतांना पंजा साहिब या गुरुद्वारेत जाण्यापासून रोखले होते. राजदूत व भारतातून आलेल्या शीख बांधवांची […]
चीनमध्ये बनला पॉवर हाउस रोड- कार अपोआप होणार चार्ज
जगभर प्रदूषणाच्या समस्येवर उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहने वापराचे प्रमाण वाढविले जात आहे. मात्र हि वाहने अचानक रस्त्यातच चार्ज संपल्याने बंद पडली तर काय यावर फारसा विचार झालेला दिसत नाही. या अडचणीवर चीनने संशोधनातून मात केली असून त्यांनी वाहने रस्त्यातून जात असताना रस्त्यामुळेच चार्ज होतील असा रस्ता तयार केला असून त्याला पॉवर हाउस रोड असे नाव […]