#MeToo – दिग्दर्शकावर अभिनेत्री स्वरा भास्करचा लैंगिक शोषणाचा आरोप

swara-bhaskar
#MeToo चे बॉलिवूडमध्ये आलेले वादळ अद्याप शांत झालेले नसून एका दिग्दर्शकावर अभिनेत्री स्वरा भास्करने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. माझे त्या दिग्दर्शकाने लैंगिक शोषण केले हे समजायलाच मला सहा ते सात वर्षे लागली असेही ती म्हणाली. स्वराने एका कार्यक्रमात पुन्हा एकदा #MeToo च्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराविरोधात वाचा फोडली आहे.

मला एका दिग्दर्शकाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. बऱ्याच वर्षांपूर्वी ही घटना घडली आहे. महिला समोर येऊन आता जेव्हा #MeToo मोहिमेअंतर्गत अन्यायाविरोधात बोलू लागल्या आहेत. तेव्हा मला समजले की काही वर्षांपूर्वी माझ्यासोबत हेच घडले होते. मला ही गोष्ट समजण्यासाठी सहा-सात वर्षे लागल्याचे ती म्हणाली. स्वरासोबत या कार्यक्रमात अभिनेत्री दिया मिर्झा आणि आनंद पटवर्धनसुद्धा उपस्थित होते.

स्वराने दिग्दर्शकाचे नाव न घेता लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. मुलींना त्यांचे लैंगिक शोषण होत आहे हे कसे ओळखावे किंवा त्याची जाणीव व्हावी याबाबत आपल्या देशात कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन केले जात नाही. त्यांना याबाबतचे मार्गदर्शन केल्यास कदाचित त्या स्वत:ला अशाप्रकारच्या शोषणापासून वाचवू शकतील, असेही मत तिने यावेळी मांडले.

Leave a Comment