दोन्ही विश्वयुद्ध पाहणाऱ्या या आजीबाईंची आता कोरोनावरही मात

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून आतापर्यंत लाखो लोकांना याची लागण झाली आहे. मात्र या आजारातून काहीजण बरे देखील होत आहेत. असेच एक उदाहरण 106 वर्षीय वृद्ध आजीबाईंचे आहे. त्या कोरोनावर मात करत, बऱ्या झाल्या आहेत.

कॉनी टिचेन नावाच्या या वृद्ध महिला इंग्लंडच्या बर्मिंघम येथे राहतात. ब्रिटनमध्ये कोरोनावर मात करणाऱ्या त्या सर्वात वयोवृद्ध महिला आहेत. तीन आठवडे हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्यांनी या आजारावर मात केली.

विशेष गोष्ट म्हणजे टिचने यांनी दोन विश्वयुद्ध देखील पाहिली आहेत. टिचेन यांचा जन्म वर्ष 1913 मध्ये झाला आहे. मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

टिचेन म्हणाल्या की, मी नशीबवान आहे की कोरोना व्हायरसवर मात केली. आता मला आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवायचा आहे.

त्यांच्या काळजी घेणाऱ्या स्मिथ म्हणाल्या की, कॉनी यांना बरे होताना पाहणे शानदार आहे.  त्या आता कोरोना व्हायरसच्या धोक्यापासून पुर्णपणे बाहेर आहेत.

टिचेन यांच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की, 100 वर्ष पुर्ण झाले असले तरी त्या खूपच अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यांना डान्स आणि गोल्फ खेळायला आवडते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांच्या पाठीची शस्त्रक्रिया झाली, मात्र 30 दिवसातच त्या पुन्हा चालू लागल्या.

टिचेन यांची नात एलेक्स जोन्स म्हणाली की, त्या 5 जणांच्या आजी आणि 8 जणांच्या पणजी आहेत. त्यांनी खूपच सक्रिय जीवन जगले. आजीला सायकल चालवायला खूप आवडते.

Leave a Comment