100 मीटरच्या कक्षेत कोरोनाग्रस्त आल्यावर हे अ‍ॅप करणार अलर्ट

कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी जेसी बोस विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, वायएमसीएच्या विद्यार्थ्यांनी एक खास अ‍ॅप तयार केले आहे.  विद्यापीठातील एमबीएचे विद्यार्थी ललित फौजदार आणि नितिन शर्मा यांनी  जिओ-फेसिंग तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे.

जर एखादी कोरोनाग्रस्त व्यक्ती 5 ते 100 मीटरच्या कक्षेत येत असेल तर तुम्हाला अ‍ॅपच्या माध्यमातून अलर्ट येईल. सोबतच जेथे मागील 24 तासात कोरोनाचा रुग्ण सापडला असेल, तेथे जाऊ नये असा दिला देईल.

विद्यापीठातील फॅकल्टी अजय शर्मा यांनी सांगितले की, या अ‍ॅपला ‘कवच’ असे नाव देण्यात आले आहे. विद्यापाठीच्या टीमने 10 दिवसांच्या मेहनतीनंतर हे मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे.

अजय शर्मा यांनी सांगितले की, अ‍ॅपचे प्रोटोटाईप तयार करून सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला पाठवण्यात आले आहे. अ‍ॅपला प्ले स्टोरवर उपलब्ध करण्यासाठी गुगल इंडियाला पाठवण्यात आले आहे.

Leave a Comment