
आपल्या शेट्टींच्या शिल्पाला आता नववा महिना सुरू आहे. मात्र आयपीएल सामन्यांसाठी आणि तिचे घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी ती अजूनही सतत प्रवास करते आहे. तिला अगदी वेळ नाही. पण बेबी शॉवरचा आनंद तिला घेता यायलाच हवा ना? म्हणून मग बहिणाबाई शमिता पुढे सरसावल्या आहेत. अर्थात त्यांना स्वतःला डोहाळजेवणाचा कांही अनुभव नाही पण बाकीच्यांना विचारून विचारून त्यांनी शिल्पाच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम ठरविला आहे, तयारीही केली आहे. ३ मे रोजी शिल्पाच्या मुंबईतल्या निवासस्थानीच हा कार्यक्रम साजरा केला जाणार असून शिल्पाला त्याची कल्पना देण्यात आलेली नाही. कारण शमिताला तिला सरप्राईज द्यायचे आहे म्हणे!
या कार्यक्रमासाठी पाहुण्यांची यादी आणि बोलावणीही झाली आहेत. फक्त महिलांसाठीच हा कार्यक्रम असल्याने पुरूषांना मज्जाव आहे. यादीत रविना टंडन, मान्यता दत्त, कृषिका लुल्ला यांची नांवे नक्की आहेतच.
कार्यक्रम ज्या हॉलमध्ये होणार आहे तेथे गुलाबी आणि निळ्या रंगातले डेकोरेशन करण्यात येत असून शिल्पासाठीचा ड्रेसही याच दोन रंगाच्या ककॉम्बिनेशन मधून तयार करण्यात आला आहे. शिल्पाला हा एकच दिवस मोकळा आहे आणि तिला राजकन्येसारखी ट्रीटमेंट द्यायची इच्छा असल्याचे शमिता सांगते आहे.
