वंध्यत्व टाळण्यासाठी..

सध्या एका शास्त्रीय संशोधनाने सगळ्या जगातच खळबळ उडवून दिली आहे. या संशोधनात प्रजनन क्षमतेवर काही प्रयोग करण्यात आलेले आहेत. साधारणपणे प्रजनन क्षमता हा महिलांचा गुणधर्म असतो असे मानले जाते. परंतु महिलांच्या प्रजनन क्षमतेशी पुरुषांच्या प्रजनन क्षमतेचा संबंध असतो ही गोष्ट विसरली जाते आणि सध्या पुरुषांची प्रजनन क्षमता घटायला लागली आहे. येत्या २०-२५ वर्षात ती कमालीची घटलेली असेल, असे काही लोकांच्या संंशोधनाचे निष्कर्ष आहेत आणि त्यामुळे लोकांत खळबळ माजली आहे. लंडनमध्ये केलेल्या काही प्रयोगांमध्ये असे दिसून आले आहे की, मुले न होण्यास महिलांमधील दोष केवळ १/३ एवढाच कारणीभूत असतो. २/३ दोष पुरुषांचा तरी असतो किंवा अनाकलनीय असतो. त्यामुळे मुले न झाल्यास केवळ महिलांवरच प्रयोग केले जातात. त्यांना नानातर्‍हेची औषधे तरी दिली जातात किंवा प्रजनन क्षमतेमध्ये बाहेरचा हस्तक्षेप करून शरीराबाहेर प्रजनन घडवले जाते.

हा सगळा त्रास स्त्रिलाच सोसावा लागतो. पुरुषात दोष असला तरीही या सगळ्या त्रासाला स्त्रियांनाच सामोरे जावे लागते. म्हणून लंडन मधल्या काही संशोधकांनी प्रजनन क्षमतेच्या बाबतीत पुरुषांवर अनेक प्रयोग सुरू केले आहेत आणि पुरुषांच्या शुक्राणूंच्या हालचाली गतीमान करणारी औषधे शोधून काढली आहेत. पुरुषांचे शुक्राणू संख्येनेही जास्त असले पाहिजेतच पण त्यांच्या हालचाली आणि गती अधिक असली पाहिजे तरच अपत्य संभव होत असतो आणि म्हणून पुरुषांना द्यावयाची काही साधी औषधे या तज्ज्ञांनी विकसित केली आहेत. या औषधांनी खर्चही कमी होतो आणि स्त्रीला भोगाव्या लागणार्‍या अडचणी आणि त्रास हेही कमी होतात. या औषधांच्या चाचण्या सुरू असून त्या यशस्वी झालेल्या आहेत. मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुषांची प्रजनन क्षमता आहे. स्त्री प्रजननक्षम असूनही पुरुष अक्षम असेल तर मुले होणे अशक्य असते.

प्रजनना मध्ये स्त्रियांचा हिस्सा मोठा असतो ही गोष्ट खरी. परंतु प्रजननाचे मूळ पुरुषांचे शुक्राणू हे असते. मात्र याकडे दुर्लक्ष करून जगातले तज्ज्ञ महिलांनाच त्रास देत आहेत. म्हणून बर्मिंगहॅम येथील युनिर्व्हसिटी ऑङ्ग बर्मिंगहॅम या विद्यापीठातील ह्यूमन रिप्रोडेक्टिव्ह सायन्सेस् या विभागाचे प्रमुख जॅक्सन किर्कमन ब्राऊन यांनी संशोधनाला नवी दिशा देण्याचे ठरवले. प्रजनन क्षेत्रातील अडचणींमुळे अस्वस्थ झालेल्या जगाला किर्कमन ब्राऊन यांचा असा संदेश आहे की, मानवतेपुढच्या एवढ्या मोठ्या संकटाने ङ्गार घाबरून जाण्याची गरज नाही. शुक्राणूंना गती देण्याची साधी साधी औषधे वापरली तरी या छोट्या उपायाने हा मोठा प्रश्‍न सहज सुटणार आहे. या औषधाचे ङ्गारसे गंभीर साईड इङ्गेक्टस् सुद्धा नाहीत आणि हे औषध ङ्गार स्वस्तात उपलब्ध होणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment