Your Friends' Activity

Loading...

रूपयाची ऐतिहासिक घसरण

मुंबई - शेअर बाजार सुरू झाल्यानतर सोमवारी सकाळी काहीवेळातच दणका बसला. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. रुपयाच्या घसरणीचा परिणाम सेंसेक्सवरही झाला. शेअर बाजार सकाळच्या पहिल्या सत्रात तब्बल २०० अंशांनी घसरला. दरम्यान, याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरवाढीवर झाला आहे. सोन्याचा दर ३१ हजारांवर गेला आहे.

तीन दिवसापूर्वीच म्हणजे शुक्रवारी सेन्सेक्स आणि रुपयात जोरदार घसरण झाली होती. त्यानंतर शनिवार, रविवार बाजार बंद होता. मात्र सोमवारी सकाळी बाजार सुरू होताच बाजाराला चांगलाच दणका बसला आहे. सुरूवातीच्या. काळात रूपया कोसळला. रुपयाचे दर प्रति डॉलर ६२.३५ इतका झाला आहे. त्याचा परिणाम आता शेअर बाजारावरही पडला आहे.

सोमवारी सकाळी लगेचच शेअर बाजारही कोसळला असून शेअर बाजार सकाळच्या पहिल्या सत्रात तब्बल २०० अंशांनी घसरला. तर निफ्टीतही ८५ अंशांनी घसरण झाली आहे. या सर्व घटनाक्रमामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या सर्वाचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरवाढीवर झाला आहे. सोन्याचा दर ३१ हजारांवर गेला आहे.

संबंधित माहिती

  • मुंबई, - आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकी डॉलर अधिक मजबूत होत असल्यामुळे जगभरातील अनेक चलनांना याचा फटका बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून डॉलरपुढे घसरणारा रुपया मंगळवारी सकाळी ६४ रुपयांपर्यंत घसरला. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने मंगळवारी ऐतिहासिक नीचांक गाठला. सोमवारी सकाळी एका डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य थेट ६४ रुपये ११ पैसे इतके झाले आहे.

  • मुंबई - केंद्र सरकारने वित्तीय तूट कमी करण्याच्या हेतूने सोने, चांदी आणि प्लॅटिन यांच्यावरील आयात शुल्क वाढविल्याने सोने दरात विक्रमी वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी १०९४ रूपयांनी वाढ होऊन सोने ३० हजार ४१२ प्रति तोळा झाले आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात रूपयाची घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रूपया ६२ रूपयांवर पोहोचला आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर झाल्याने बाजार कोसळला आहे.

  • मुंबई, दि. २४ - रूपयाच्या अवमूल्यनाचा फटका केवळ सरकार व स्थानिक गुंतवणूकदारांनाच बसत नसून, शेअर बाजारातील महत्वाचा घटक असलेल्या विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचेही (एफआयआय) चांगलेच हात पोळले आहेत. रूपयाच्या घसरणीने ‘एफआयआय’ चे बाजारातील नुकसान दुपटीने वाढले आहे.

  • मुंबई- बाजारात भांडवलाची आवक वाढल्याने व निर्यातदारांनी डॉलरची विक्री वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरबँकीय विदेशी चलन विनिमय बाजारपेठेत (फॉरेक्स) शुक्रवारी रुपयाच्या किमतीत २९ पैशांनी सुधारणा झाली. त्यामुळे एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत आता ६१.१० इतकी झाली आहे. गेल्या काही दिवसानंतर रुपयाच्या किमतीत २९ पैशांनी सुधारणा झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

  • मुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपयाची गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली घसरण केंद्र सरकारने काही उपाय योजिले असूनही सुरूच राहिली आहे. मंगळवार दि. ३० जुलै रोजी रुपया आणखी घसरला आणि डॉलरची किंमत ६१ रुपये १२ पैसे अशी झाली. ही घसरण अशीच जारी राहिल्यास महागाई वाढण्याची भीती आहे. येत्या एक-दोन दिवसातच या घसरणीचा परिणाम म्हणून पेट्रोलचे दर वाढण्याचा संभव आहे.