मायक्रोसॉफ्ट संचालक मंडळाला 44.5 अब्जांचा दंड

वॉशिंग्टन – मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाला एका खटल्यात सुमारे 44 अब्ज 5 कोटी रुपयांचा (731 मिलियन डॉलर) दंड सोसावा लागणार आहे. युरोपियन कॉम्प्युटर्सच्या इंटरनेट एक्स्प्लोरर ब्राऊझरमध्ये उद्भवलेल्या एका समस्येप्रकरणी कंपनीविरोधात फेडरल न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला.

मायक्रोसॉफ्टचे शेअरधारक असलेले किम बॅरोविक यांनी याची तक्रार केली होती. यात मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, माजी सीईओ स्टीव्ह बामरसह संचालक आणि अन्य काही कर्मचार्‍यांचीही नावे होती. संचालक मंडळ तसेच अधिकार्‍यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनी व्यवस्थितपणे हाताळली नाही, असाही त्यांचा आरोप होता. सूत्रांच्या मते, युरोपियन कॉम्प्युटर्समध्ये आलेली समस्या ही अपडेटेड विंडोज सॉफ्टवेअरशी संबंधित होती. याबाबतचा खुलासा होताच कंपनीने सीईओ बामर आणि विंडोज युनिटचे प्रमुख स्टीव्हन सिनोप्स्की यांच्या 2012 च्या बोनसमध्ये कपात केली होती.

Leave a Comment