महाराष्ट्रात मतदानाचा टक्का वाढला

मुंबई राज्यातील लोकसभेच्या १९ मतदारसंघात सरासरी ५५.३३ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. गुरुवारी झालेल्या अंतिम टप्प्यात राज्यातील मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि विद्यमान खासदार मिलिंद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड यांच्यासह ३३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.आता फैसला काय हे १६ मे ला कळणार आहे. दिग्गज तारले जातात की नवखे बाजी मारतात याकडेच सर्वांचे लक्ष राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या राज्यात झालेल्या तिस-या टप्प्यात प्राथमिक माहितीनुसार सरासरी ५५.३३ टक्के मतदान झाले आहे. मात्र राज्यातील सर्व १९ मतदारसंघात २००९च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढल्याचे चित्र आहे.दिंडोरीमध्ये सर्वाधिक ६४ टक्के तर कल्याणमध्ये सर्वात कमी ४२ टक्के मतदान झाले आहे.मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे नंदुरबार -६२ टक्के ,धुळे -५९ टक्के ,रावेर -५८ टक्के ,जळगाव -५६ टक्के ,नाशिक -५८ टक्के ,दिंडोरी -६४ टक्के ,जालना -६३ टक्के ,औरंगाबाद -५९ टक्के ,रायगड -६४ टक्के ,पालघर-६० टक्के ,भिवंडी -४३ टक्के,कल्याण -४२ टक्के ,ठाणे -५२ टक्के ,दक्षिण मुंबई -५४ टक्के ,दक्षिण मध्य मुंबई -५५ टक्के ,उत्तर मुंबई-५२ टक्के , उत्तर मध्य मुंबई -५५ टक्के ,ईशान्य मुंबई -५३ टक्के ,उत्तर पश्चिम मुंबई -५० टक्के

Leave a Comment