मल्लिकाच्या डर्टी डान्सचा व्हिडीओ झाला लीक…

बॉलिवूडमधील आयटम गर्ल मल्लिका शेरावत हॉलीवुड स्टार एंटोनियो बंदेरस याच्यासोबत एका खासगी पार्टीत मस्ती करताना दिसली. मल्लिका आणि एंटोनियो यांचा एक डान्स व्हिडीओ सध्या यु-ट्युबवर खूप आवडीने पाहण्यात येत आहे.

’डेली मेल’ने मल्लिका आणि एंटोनियो यांच्या संबंधातील एक बातमीही प्रकाशित केली असून, या खासगी पार्टीचा व्हिडीओसुद्धा डेली मेलने वेबसाइटवर अपलोड केला आहे. असे सांगण्यात येते की, एंटोनियो त्या रात्री मल्लिकावर फिदा होते. त्यांनी मल्लिकाला डान्स फ्लोअरवर आणले आणि तिच्यासोबत डान्सही केला.

या प्रसंगी त्या दोघांमध्ये बॉलिवूड ते हॉलीवुडपर्यंत सर्व बाबतीत चर्चा झाली. एंटोनियो यांनी मल्लिकाला स्पेनला येण्याचे आमंत्रण दिले असून, बॉलिवूडच्या या बोल्ड आयटम गर्लने त्यांचे हे आमंत्रण स्वीकारले आहे.

Leave a Comment