बुद्ध्यांकात महिला पुरुषांना वरचढ

लंडन दि.१६- स्त्री आणि पुरूष जगात आल्यापासूनच स्त्री श्रेष्ठ की पुरूष हा वाद सुरू झाला आहे. मात्र पुरूष प्रधान संस्कृतीमुळे महिलांना काय कळतंय, त्यांनी चूल आणि मूल सांभाळावे अशी अपेक्षाही सुरवातीपासूनच केली गेली आहे. मात्र आता या वादाला नामवंत सायकॉलॉजिस्टने केलेल्या संशोधनामुळे ट्वीस्ट मिळाला असून महिलांचा बुद्ध्यांक पुरूषांपेक्षा अधिक असल्याचे या संशोधनातून सिद्ध झाले आहे.

या विषयीची अधिक माहिती अशी की शतकापूर्वी जेव्हा बुद्ध्यांक किवा आय क्यू मोजता येऊ लागला तेव्हा महिला पुरूषांपेक्षा पाच पॉईटने मागे होत्या. त्यानंतर हळूहळू ही गॅप कमी होत गेली आणि आता यावर्षी तर महिलांनी बुद्ध्यांकात पुरूषांवर मात केली असून त्यांना मागे टाकले आहे. जागतिक कीर्तीचे बुद्धयांक तज्ञ  जेम्स फ्लीन यांनी हे संशोधन केले आहे.त्यांच्या मते महिलांचा अनेक क्षेत्रात वाढत चाललेला सहभाग हे त्यामागचे एक कारण आहे.

फ्लीन सांगतात शतकापूर्वी बुद्ध्यांक मोजता येऊ लागला त्यानंतर पुरूष आणि महिलांच्या बुद्धयांकात वाढ होतेच आहे मात्र महिलांचा बुद्द्यांक अधिक वेगाने वाढताना दिसत आहे. जगभरात आधुनिकीकरणाचे वारे वेगाने वाहू लागले असताना जगण्यातील कॉम्प्लेक्सिटीही वाढते व पर्यायाने मेंदू अधिक तल्लख होत जातो. सर्व क्षेत्रात आता महिलांचा सहभाग वाढतो आहे मात्र ही अजून सुरवातच असल्याने भविष्यकाळात महिलांच्या बुद्ध्यांकात अजून वाढ होण्याची शक्यताही आहेच. जगभरातील बहुतेक सर्व देशात महिला कुटुंबाच्या जबाबदारीबरोबरच नोकरी व्यवसायाच्या जबाबदार्‍याही सांभाळू लागल्या आहेत. त्यातूनच त्यांना आपण हे करू शकतो हे स्वतःबद्दलचे आत्मज्ञान झाले आहे इतकेच नव्हे तर आपण पुरूषांच्या तुलनेत अधिक सरस आहोत याचीही जाणीव महिलांना झाली आहे.

फ्लीन आपले हे संशोधन त्यांच्या नव्या पुस्तकात समाविष्ट करणार आहेत मात्र त्यासाठी त्यांना अजून थोडा डेटा गोळा करायचा आहे. प.युरोप, यूएस, कॅनडा, न्यूझीलंड, अर्जेन्टिना आणि इस्टोनिया या देशातील महिलांचे आयक्यू त्यांनी तपासले असून त्यात ऑस्ट्रेलियात महिला पुरूषांच्या बरोबर आहेत तर न्यूझीलंड आणि इस्टोनियात महिला आघाडीवर आहेत. यातून फ्लीप यांना असेही आढळले आहे की आयक्यू हा जन्मजात जीन्सवर अवलंबून नसतो तर प्रयत्नाने तो वाढविता येतो.

Leave a Comment