Your Friends' Activity

Loading...

पॉर्नस्टार ही खरी ओळख-

पॉर्नस्टार सनी लिऑन आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाली आहे. पॉर्न चित्रपटानंतर सनीने आपलं करिअर बॉलिवूडमध्ये करण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे.पॉर्नस्टारपासून बॉलिवूडची स्टार इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगताना सनी लिऑन म्हणतेय, की पॉर्नस्टार असल्यामुळेच मला आज लोक ओळखत आहेत. आज मी जे काही आहे ते यामुळेच म्हणून आपल्याला एक पॉर्नस्टार असल्याबद्दल अजिबात खंत नाही, असेही तिने म्हटले आहे. सध्या सनी रुपेरी पडद्यावर आपलं नशीब आजमावत आहे. ती आता बॉलिवूडमध्ये आपलं करिअर बनवण्याच्या मार्गावर आहे. एक पॉर्नस्टार असल्यामुळे सनीला अनेकदा टीकांनाही सामोरे जावे लागले आहे. तिच्या या ओळखीमुळे अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी तिच्या बरोबर काम करणेही नाकारले आहे. एका मुलाखतीत तिने असंही म्हटल आहे की, त्यात काय झालं की मी एक पॉर्नस्टार आहे. माझी ओळखच त्यामुळे आहे. लोक जर मला ओळखतात तर ते केवळ पॉर्न चित्रपटांमुळेच. मला कधीच स्वत:ला पॉर्नस्टार म्हणवून घ्यायला लाज नाही वाटली. मी माझं काम ईमानदारीने करण्याचा प्रयत्न करते. मग, ते प्रेक्षकांवर अवलंबून आहे की, ते कितपत प्रतिसाद देतात. हल्लीच दिग्दर्शक अनीस बज्मी याने सनीला आपल्या चित्रपटात काम देण्यास नकार दिला होता परंतु, आपल्याला त्याबाबत काही फरक पडत नसल्याचेही तिने सांगितले.

संबंधित माहिती

  • पॉर्नस्टार सनी लिऑन सध्या खूप मेहनत घेतांना दिसतेय. आता ती रागिनी MMS-२मध्ये आपला जलवा दाखवणार आहे. बॉलिवूडमधला सनी लिऑनचा पहिला चित्रपट म्हणजे जिस्म-२, पण तो फ्लॉप ठरला. मात्र त्यानंतर आलेलं शूट आऊट अॅट वडालामधलं तिचं अॅटम साँग चांगलंच गाजलं. त्याच पावलांवर पुढं चालत आता रागिनी एमएमएस-२ मध्ये ती करत असलेल्या अॅटम साँगसाठी खूप मेहनत करतांना दिसतेय.

  • बॉलीवूडमधील तिन्ही खानांसोबत काम करण्याची संधी मिळावी अशी प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते. बॉलीवूडमध्ये करिअर करू इच्छिणार्या अभिनेत्रींना जर त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर त्यांचे भाग्य चमकते.तसेच काहीसे पॉर्नस्टार सनी लियोनसोबत होणार आहे. सलमान खानसोबत काम करण्याची सनीची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

  • बॉलिवूडमध्ये आल्यानंतर हिंदी शिकण्याचं वेड अनेकांना लागतं. किंबहूना इथं टिकून राहण्यासाठी ते करावंही लागतं. असंच काहीसं वेड सध्या लागलंय सनी लिऑनला. सनी आणि तिचा नवरा सध्या दोघंही हिंदी शिकण्याच्या मागे लागले आहेत.

  • जगाला दादरा देणारा आणि अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन हा पॉर्नस्टार सनी लियोनचा निस्सीम चाहता होता. तो सनीवर फिदा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. लादेन हे गुपीत अमेरिकेतील माध्यमांनी उघड केले आहे.

  • पोर्न स्टार सनी लिऑन ’जिस्म २’ या चित्रपटामुळे बरीच चर्चेत आली आहे. सनीने `जिस्म ˆ २' या चित्रपटाचे चित्रीकरण संपवून होताच. पुन्हा एकदा पॉर्न सिनेमा शूट केल्याचे समजते आहे. त्याचबरोबर अशीही माहिती समजते आहे की, सनी लिऑन यापुढेही आपले पॉर्न सिनेमा सुरूच ठेवणार असल्याचे कळते.