Your Friends' Activity

Loading...

पैसा बचत करायचीय? मग लग्न करा.

लंडन दि.२३- जगभरातील नागरिक महागाईने हैराण झाले आहेत ही आजची वस्तुस्थिती आहे. अशा वेळी बचत करणे किवा काटकसर करणे आणि पुढील काळासाठी पैशांची बेगमी करून ठेवणे हे उपाय सर्वांनाच माहितीही असतात. पण खर्च आटोक्यात कसे आणायचे हाच मोठा प्रश्न असतो. ब्रिटनमध्ये नुकत्याच केल्या गेलेल्या संशोधनात याचे उत्तर मिळाले आहे. या संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की रिलेशनशीपमध्ये असणारी जोडपी अथवा विवाहित जोडपी अधिक काटकसर करण्यास प्रवृत्त होतात. म्हणजेच पैसा बचत करायची असेल तर दोनाचे चार हात करणे किवा लग्नाच्या बेडीत अडकणे हा त्याचा खात्रीशीर मार्ग आहे असे म्हणायला हरकत नाही.

नॅशनल सेव्हींग्ज अॅन्ड इन्व्हेस्टमेंटस या संस्थेने हे संशोधन केले असून या संस्थेचे संचालक जॉन प्राऊट सांगतात की आम्हाला या संशोधनासाठी केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले की रिलेशनशीपमध्ये असलेली किवा विवाहित जोडपी एकमेकांसाठी त्याग करण्यास तसेच अन्य खर्च कमी करून बचत करण्यास अधिक प्राधान्य देतात. ही बचत घरासाठी असू शकते, मुलाबाळांसाठी असू शकते अथवा भविष्यकाळात येऊ शकणार्‍या अडचणींचे निवारण करण्यासाठीही असू शकते. रिलेशनशीपमधील जोडपी नेहमीच्या सरासरी बचतीपेक्षा महिन्याला सरासरी ६८ पौंडांची जादा बचत करतात. या जोडप्यांपैकी ५७ टक्के लोक मग ते पत्नी असो वा पती जोडीदाराला पैसा बाजूला टाकण्यास प्राधान्य देतात.

बरेचवेळा असेही आढळते की जोडीदारातील एकाचा दुसर्‍यावर इतका प्रभाव असतो की या नाट्यमय प्रभावामुळे असे लोक महिना २०० पौंडापर्यंत म्हणजे वर्षाला चक्क २४०० पौंडांपर्यंतही अधिक बचत करू शकतात. यात बायकांपेक्षा बचतीसाठी पुरूषांवर येणारे दडपण अधिक असते कारण पुरूष नाईट क्लब, मित्र यांच्यावर खर्च करत असतात. २५ ते ३४ वयोगटातील जोडप्यात पार्टनरचा प्रभाव अधिक असतो आणि या प्रभावामुळे ही जोडपी महिना १०० पौंडापेक्षा अधिक बचत करू शकतात.

पुरूषांच्या तुलनेत महिला अधिक काटकसरी असतातच पण त्यातूनही नवरा अधिक खर्चिक असेल तर त्यांच्या बायकांत काटकसर करण्याचे प्रमाणही अधिक असते. नवर्‍याच्या खर्चाच्या वाईट सवयींचा त्रास त्यांना अधिक होतो व अशा महिला नेहमीपेक्षा किमान १५ टक्के बचत अधिक करण्याकडे जादा लक्ष पुरवितात असेही या संशोधनात आढळून आले आहे.

संबंधित माहिती

 • कोणत्याही घरात मुलगी, सून गरोदर राहिली की  मुलगा होणार की मुलगी याची जशी उत्सुकता असते तसे बाळाचा जन्म नक्की कधी होणार याचीही आकडेमोड सुरू होते. मग त्या वेळात घरात कोणाकोणाचे वाढदिवस असतात याचाही आढावा घेतला जातो.

 • बनाना चोकलेट चीप केक

  केकसाठी लागणारी सामग्री -
  १ १/४ कप मैदा किवा गव्हाचे पीठ

 • अर्थसंकल्प २०१२ची वैशिष्ट्ये

  • विकासदर ७.६ टक्के राहण्याची शक्यता • शेतकर्‍यांना थेट सबसिडी मिळणार

 • लंडन दि.१६- स्त्री आणि पुरूष जगात आल्यापासूनच स्त्री श्रेष्ठ की पुरूष हा वाद सुरू झाला आहे. मात्र पुरूष प्रधान संस्कृतीमुळे महिलांना काय कळतंय, त्यांनी चूल आणि मूल सांभाळावे अशी अपेक्षाही सुरवातीपासूनच केली गेली आहे.

 • बॉलिवूडमधील आयटम गर्ल मल्लिका शेरावत हॉलीवुड स्टार एंटोनियो बंदेरस याच्यासोबत एका खासगी पार्टीत मस्ती करताना दिसली.